Posts

Showing posts from 2019

केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाकडून अमरावती जिल्ह्याचा गौरव

Image
रोजगारनिर्मितीसह मुलभूत सुविधांच्या निर्मितीवर भर     मनरेगांतर्गत रोजगारनिर्मितीची दखल अमरावती, दि. 26   :     रोजगारनिर्मितीसह मुलभूत सुविधांच्या उभारणीचे उद्दिष्ट ठेवून अचूक नियोजन व अंमलबजावणीमुळे गत वर्षात मनरेगाअंतर्गत जिल्ह्यात जलसंधारण, वृक्षारोपण, स्वच्छता आदी मुलभूत सुविधांची शेकडो कामे पूर्ण झाली. जिल्ह्याच्या या योगदानाची दखल घेऊन केंद्र शासनाकडून राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.     दीनदयाल अंत्योदय राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियानातील उमेद अभियानाच्या कृषी आजीविका क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत(मनरेगा) जलसंधारणाच्या उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्राला राष्ट्रीय पुरस्काराने, तर अमरावती जिल्ह्याला मनरेगांतर्गत रोजगार निर्मितीत उल्लेखनीय कार्यासाठी सन्मानित करण्यात आले.             नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री     नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी शैलेश नवाल ,   धारणी प्रकल्प अधिकारी मिताली सेठी ,   उपजिल्हाधिका

विविध योजनांची काटेकोर अंमलबजावणी करा - जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत निर्देश

Image
अमरावती, दि. 11 – जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित क्षेत्राचे सर्वेक्षणात सुधारणेसह प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामसडक योजना, पेयजल योजना आदी विविध योजनांची प्रशासनाकडून काटेकोर अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. त्यानुसार विहित वेळेत कार्यवाही करण्याचे निर्देश आज विविध आमदारांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत देण्यात आले.               विधीमंडळ अधिवेशनात होणा-या जिल्हा बैठकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील विविध विषयांचा आढावा घेण्यासाठी ही बैठक झाली. आमदार श्रीमती यशोमती ठाकूर, सुलभाताई खोडके, रवी राणा, राजकुमार पटेल, प्रताप अडसड, बळवंत वानखडे, देवेंद्र भुयार, जिल्हाधिकारी संजय पवार, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, महापालिका आयुक्त संजय निपाणे यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. अतिवृष्टी परिस्थितीच्या प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणात सुधारणा व्हाव्यात. अवकाळी, अवेळी व सतत पावसाने जिल्ह्यात सर्वदूर नुकसान झाले आहे. त्यामुळे कोणताही भाग वंचित राहता कामा नये, असे निर्देश श्री. भुयार यांनी दिले.  कृषी अधिका-यांनी तालुका क्षेत्रात जाऊन प्रत्य

ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा दोन महिन्यात आठ हजार शिधापत्रिकांचे वाटप - जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे

Image
अमरावती, दि. 2 - जिल्ह्यातील   शिधापत्रिका   वाटपा चे काम गतीने व पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी सेतुमार्फत ऑनलाईन प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, गत दोन महिन्यात आठ हजारहून अधिक शिधापत्रिकांचे वाटप झाले असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे यांनी आज येथे दिली.             जिल्ह्यातील ग्राहकहिताच्या दृष्टीने राबवावयाच्या उपायांबाबत सविस्तर चर्चा आज जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत झाली, त्यावेळी ते बोलत होते. समितीचे सदस्य डॉ. अजय गाडे, पंकज मेश्राम, रा. ज. वावरे, अनिल माधोगढिया, मनोहर बारसे, मंगेश मनोहरे, रंजनाताई मामर्डे, अशोककुमार राठी, राजू बसवनाथे, छाया दंडाळे, एस. एम. काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे, सहायक जि. पुरवठा अधिकारी समाधान सोळंके, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, महावितरणचे उप कार्य अभियंता सुनील नाईक, सहायक गटविकास अधिकारी सुभाष बोपटे, करवसुली अधिकारी विजय गावंडे, पोलीस निरीक्षक आर. एस. टाले, पालिकेच्या पशुवैद्यक विभागाचे गुणसागर गवई, वैधमापन विभागाचे ध. कृ. राठोड आदी उपस्थित होते.   शिधापत्रिका वाटप प्रक्रिया ऑनलाईन झाल्य

आरटीओ कार्यालयाच्या ‘महावॉकेथॉन’ मध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

Image
अमरावती, दि. 30 – वाहतूक सुरक्षेबाबत संदेश देण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय व जिल्हा रस्ता सुरक्षा समितीतर्फे आज शहरात आयोजित  ‘ महावॉकेथॉन ’  मध्ये अमरावतीकरांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कॅम्पमधील प्रादेशिक परिवहन कार्यालयापासून सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अशफाक अहमद यांनी हिरवी झेंडी दाखवून वॉकेथॉनची सुरुवात झाली. कर वसुली विजय गावंडे, प्रदीप गुडदे यांच्यासह अनेक अधिकारी- कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. सहभागींकडून फलकावर रस्ता सुरक्षेबाबत विविध संदेश प्रदर्शित करण्यात आले.  पुढे जिल्हाधिकारी कार्यालयमार्गे गर्ल्स हायस्कूल चौक व पुन्हा परिवहन कार्यालयाकडे असा वॉकेथॉनचा मार्ग होता.    राष्ट्रीय सेवा योजना, ड्रायव्हिंग स्कूलचे कर्मचारी, परिवहन अधिकारी व कर्मचा-यांसह नागरिकांनीही या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.  

अचलपूरमध्ये महिला चावडी मेळाव्याला मोठा प्रतिसाद महिलांनी विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक उन्नती साधावी - जिल्हाधिकारी शैलेश नवाल

Image
अचलपूर, दि. २९ : कुटुंबात विविध जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या महिलांमध्ये सामाजिक, आर्थिक व्यवहारातही अग्रेसर राहण्याचे सामर्थ्य आहे. आपली ही ताकद    ओळखून महिलांनी उद्योग-व्यवसायाच्या विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक उन्नती साधावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे केले. केंद्र शासनाच्या आर्थिक समावेशन धोरणांतर्गत 'स्टेट बँक ऑफ इंडिया'तर्फे महिलांसाठी चावडी मेळावा अचलपूर येथे झाला, त्यावेळी ते बोलत होते. बँकेचे उपमहाव्यवस्थापक रतन बॅनर्जी, क्षेत्रीय प्रबंधक ओमप्रकाश शिवप्रिय, तहसीलदार मदन जाधव, ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे विभागीय सल्लागार एच. एम. चौबे, जिल्हा प्रबंधक सचिन देशमुख आदी यावेळी उपस्थित होते. श्री. नवाल म्हणाले की, स्त्री ही कुटुंबात अनेक जबाबदाऱ्या लीलया पार पाडते. तिने आपले सामर्थ्य ओळखून व्यवसायात पाऊल ठेवून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे.जिल्ह्यात बचत गटांकडून चांगले काम होत आहे. ते अधिक विस्तारले पाहिजे. बँकेने कर्जवाटपाचे प्रमाण वाढवावे. विविध सामाजिक लाभाच्या योजनांतून ग्रामीण महिलांमधील बँकिंगचे प्रमाण वाढून त्या आर

गावागावांत पांदणरस्त्यासाठी प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य - जिल्हाधिकारी शैलेश नवाल

Image
पांदणरस्त्यांच्या कामांना जिल्ह्यात गती *अचलपूर तालुक्यात कामांची पाहणी अमरावती, दि . 29 – जिल्ह्यात गावोगाव चांगले पांदणरस्ते तयार करण्यासाठी प्रशासनाकडून संपूर्ण सहकार्य केले जाईल. गावकरी बांधवांनीही गावासाठी चांगले पांदणरस्ते निर्मिण्यासाठी सहभाग द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज अचलपूर तालुक्यातील सावळापूर पूर्णा येथे केले.           जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी पांदणरस्त्यांच्या कामांना गती देण्याचे निर्देश उपविभागीय कार्यालयांना यापूर्वीच दिले आहेत. त्यांनी आज अचलपूर तालुक्यातील सावळापूर, कुष्ठा आदी गावांतील कामांची पाहणी केली व गावक-यांशी संवाद साधला. सावळापूरच्या सरपंच वैशालीताई सगणे, तहसीलदार मदन जाधव यांच्यासह अनेक गावकरी उपस्थित होते. सावळापूर या गावानजिक पांदणवाटेत पाणी असल्याने शेतात जाणे जिकिरीचे झाले होते. त्यामुळे येथे गावाच्या सहभागातून अडीच किलोमीटरचा पांदणरस्ता तयार होत आहे. या रस्त्यामुळे शेतकरी बांधवांना शेतात जाणे, मालवाहतूक आदी कामे सुलभ होतील, असे समाधान गावक-यांनी यावेळी व्यक्त केले. पांदणरस्त्याचे काम दर्जेदार करावे. आवश्यक त

उन्नत भारत अभियानात समन्वय संस्थेची स्थापना अभियानात प्राध्यापक-विद्यार्थ्यांना लोकजीवनात मिसळण्याची संधी - कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर

Image
·         राज्यपालांच्या हस्ते 20 डिसेंबरला शुभारंभ         अमरावती, दि. 28 – ग्रामीण लोकजीवनात मिसळण्याची, तेथील समस्या जाणून घेण्याची व त्यावर उपाय सुचविण्याची संधी उन्नत भारत अभियानाद्वारे शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांना मिळाली आहे.  या अभियानातील समन्वय संस्थेच्या शुभारंभाचा कार्यक्रम राज्यपालांच्या उपस्थितीत होणार असून, तो यशस्वी होण्यासाठी नियुक्त सर्व समित्यांनी समन्वयाने काम करावे,  असे निर्देश विभागीय समन्वय संस्थेचे अध्यक्ष तथा कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी आज येथे दिले.         उन्नत भारत अभियानात विभागीय समन्वय संस्थेचे उद्घाटन व मार्गदर्शिकेचे लोकार्पण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते दि. 20 डिसेंबरला दुपारी 4 वाजता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परिसरात होणार आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात आयोजित बैठकीत कुलगुरू डॉ. चांदेकर बोलत होते. विद्यार्थी विकास संचालक डॉ. दिनेशकुमार सातंगे, डॉ. हेमंत खडके, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, डॉ. डी. टी. इंगोले, डॉ. प्रणव कोलते, विभागीय सहसमन्वयक प

जीवनात यशस्वितेसाठी खिलाडू वृत्ती आवश्यक - जिल्हाधिकारी शैलेश नवाल

Image
राज्यस्तरीय शालेय खो- खो क्रीडा स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ                  ·         राष्ट्रीय स्पर्धेचा बहुमानही अमरावतीलाच   अमरावती, दि. 28 – जीवनात यशस्वितेसाठी खिलाडू वृत्ती, साहस, चिकाटी व उमदेपण या गुणांची गरज असते. खेळांतून हे गुण विकसित होतात. त्यामुळे सर्वांनीच खेळासाठी वेळ दिला पाहिजे, असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे सांगितले. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात क्रीडा विभागातर्फे चौदा वर्षांखालील मुला-मुलींसाठी राज्यस्तरीय शालेय खो- खो क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ आज श्री. नवाल यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.  विभागीय क्रीडा उपसंचालक प्रतिभा देशमुख अध्यक्षस्थानी होत्या. मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत चेंडके, सचिव डॉ. माधुरी चेंडके, शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. के. देवनाथ, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू डॉ. नितीन चव्हाळे उपस्थित होते. या स्पर्धेत राज्यातील आठ विभागांतून 16 संघाचे 192 विद्यार्थी व विद्यार्थिनी खेळाडू सहभागी झाले आ

पणन महासंघाने विविध प्रयोगांसाठी पुढाकार घ्यावा - जिल्हाधिकारी शैलेश नवाल

Image
पहिल्या दिवशी 216. 55क्विंटल खरेदी                 शासकीय कापूस खरेदीचा जिल्ह्यात शुभारंभ                अमरावती, दि. 27 - पणन महासंघाने कापूस खरेदीच्या कामाप्रमाणेच शेतकरी बांधवांसाठी इतरही उपक्रमांसाठी पुढाकार घ्यावा. कापूस वेचणी यंत्र आदी साहित्य पुरविण्यासारखे वेगवेगळे प्रयोग करता येणे शक्य आहे. अशा कामांसाठी जिल्हा प्रशासन सदैव सहकार्य करेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज केले.  राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघातर्फे यंदाच्या हंगामासाठी शासकीय कापूस खरेदीचा शुभारंभ जिल्हाधिकारी श्री. नवाल यांच्या हस्ते आज झाला. त्यावेळी ते बोलत होते. वलगाव येथील शेतकरी सहकारी जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी येथे हा शुभारंभाचा कार्यक्रम झाला. महासंघाचे अध्यक्ष अनंतराव देशमुख अध्यक्षस्थानी होते. महासंघाचे उपाध्यक्ष ॲड. विष्णुपंत सोळंके, संचालक उषाताई शिंदे, प्रसेनजीत पाटील, सुरेशराव देशमुख,सुरेश चिंचोळकर, शिरीष धोत्रे, नामदेवराव केशवे, ययाती नाईक, भरत चामले, नरेंद्र ठाकरे, शिवाजीराव दसपुते  जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव आदी यावेळी उपस्थित होते.  खरेदीच्या पहिल्य

शेतकऱ्यांच्या सोयीसाठी दर्जेदार पांदण रस्त्यांची निर्मिती करा - जिल्हाधिकारी शैलेश नवाल

Image
जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याव्दारे पांदन रस्त्यांची पाहणी अमरावती, दि. 27 : शेतकऱ्यांना शेतमाल, निविष्ठा, बीबियाणे शेतात ने-आण करणे सोईचे व्हावे, यासाठी मोठ्या संख्येने गुणवत्तापूर्ण व दर्जेदार पांदण रस्त्यांची निर्मिती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी संबंधित विभागाला दिले. शेतकऱ्यांना पांदण रस्त्याबाबत काही अडचण असल्यास त्यांनी सार्वजनिक बांधकाम व महसूल विभागाशी संपर्क साधावा. त्यांच्या अडचणींचे व प्रश्नांचे तातडीने निराकरण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. मोर्शी तालुक्यातील विविध गावांच्या पांदण रस्त्यांची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी आज केली, त्यावेळी ते बोलत होते. मोर्शीचे उपविभागीय अधिकारी नितीनकुमार डोंगरे, तहसीलदार डॉ. सिध्दार्थ मोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्री. दळवी यांच्यासह संबंधित गावांचे सरपंच, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक आदी यावेळी उपस्थित होते. प्रारंभी जिल्हाधिकाऱ्यांनी नेरपिंगळाई येथील पिंगळादेवी देवस्थान व गडाची पाहणी केली. पिंगळादेवी येथील विकासकामांचा आढावा घेतला. मंदिराच्या विश्वस्थांशी चर्च

माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Image
          अमरावती ,  दि. :   1 9-    माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त  आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.                 यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी इतरही अधिकारी- कर्मचा-यांनी पुष्प अर्पण करुन माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांना अभिवादन केले.    राष्ट्रीय एकात्मता दिवसानिमित्त शपथही यावेळी घेण्यात आली. देशाचे स्वातंत्र आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्यासाठी व दृढ करण्यासाठी निष्ठापूर्वक काम करण्याची   शपथ घेण्यात आली. 00000