Posts

Showing posts from April, 2018
Image
जिल्ह्यात महाराष्ट्रदिन उत्साहात साजरा मुख्य शासकीय सोहळ्यात विभागीय आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण                अमरावती, दि. 1 : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 58 व्या वर्धापन दिनोत्सवाचा सोहळा जिल्ह्यात सर्वत्र उत्साह व मंगलमय वातावरणात पार पडला. येथील जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. सोहळ्याला विशेष पोलीस महानिरीक्षक सी. एच. वाकडे, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, महापालिका आयुक्त हेमंतकुमार पवार, अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी आदी मान्यवरांसह विविध क्षेत्रांतील नागरिक उपस्थित होते. सोहळ्यात प्रारंभी राष्ट्रध्वज वंदन झाले. त्यानंतर विभागीय आयुक्त श्री. सिंह यांनी जीपमधून विविध पथकांचे निरीक्षण केले. जिल्हा पोलीस दलासह वाहतूक शाखा, शहर पोलीस, अग्निशमन दल, दंगल नियंत्रण पथक, पोलीस बँड आदी विविध पथकांनी शानदार संचलन केले. संचलनाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. पोलीस दलात सतत 15 वर्षे उत्तम सेवाभिलेख ठेवल्याबद्द
Image
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या हस्ते ध्वजारोहण
Image
प्राचीन संस्कृतीमुळे भारतीय संस्कृती अबाधित देशाच्या प्रगतीसाठी सर्व समाज एकसंघ ठेवण्याची गरज -  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर दि. 27 : भारतावर अनेक आक्रमणे होवूनही प्राचीन परंपरांमुळेच भारताची संस्कृती टिकून आहे. देशातील विविध मठ संस्कार व शिक्षण प्रसार करण्याची ठिकाणे आहेत , देशातील सर्व समाज एकसंघ ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे ,  असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. येथील अक्कलकोट रोडवरील श्री वीरतपस्वी मंदिरात श्री बृहन्मठ होटगी संस्थेच्या श्री संकल्पसिध्दी कार्यमहोत्सव  २०१८ अंतर्गत वीरशैव लिंगायत संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले ,  त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख ,  ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे ,  पालकमंत्री विजयकुमार देशमुख ,  जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे , सोलापूरच्या महापौर शोभा बनशेट्टी ,   आमदार प्रशांत परिचारक ,  आमदार सिध्दराम म्हेत्रे ,  डॉ. मल्लिकार्जून शिवाचार्य महास्वामी ,  श्री श्री श्री १००८ उज्जयनी जगदगुरू ,  श्री श्री श्री १००८ श्रीशैल जगदगु
Image
पत्रकार आरोग्य शिबीराला मुख्यमंत्र्यांची भेट पत्रकारांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक  - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि.  27  : पत्रकार हे क्षेत्रियस्तरावर अत्यंत मेहनतीचे काम करतात. त्यांना वेळे काळाचं बंधन नसते ,  प्रसंगी चार-पाच तास थांबावे लागले तरी ते बातमी मिळवितात. त्यांच्याबाबत शासन सकारात्मक असून त्यांच्या घराच्या प्रश्नबाबतही शासन सकारात्मक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. आझाद मैदान येथे टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशन आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्यावतीने आयोजित पत्रकार आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले ,  पत्रकारांना 24 तास काम करावे लागते ,  यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. ताण तणाव वाढतो. पत्रकारांना सुदृढ आरोग्य लाभण्यासाठी या आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. पत्रकारांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे शिबीर फायदेशीर आहे ,  याचा लाभ सर्व पत्रकारांनी घ्यावा ,  असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच सर्व पत्रकारांना सुदृढ आरोग्य लाभो ,  अशा शुभेच्छाह
Image
राहूल आवारे ऑलिंपिकचे मैदानही जिंका! महाराष्ट्र तुमच्या पाठीशी  - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई ,  दि. 26 : राहुल आवारे ऑलिंपिकचे मैदानही जिंका. त्यासाठी प्रशिक्षणासह आवश्यक त्या सर्व सुविधांसाठी शासन खंबीर पाठबळ देईल ,  संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्तीमध्ये सुवर्ण पदक पटकाविणाऱ्या राहूल आवारे यांना आज येथे गौरविले. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन ,  ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे प्रमुख उपस्थित होते. ऑस्ट्रेलियामध्ये गोल्डकोस्ट येथे नुकताच पार पडलेल्या  २१  व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत राहूल आवारे यांनी  ५७  किलो वजनी गटात फ्रि-स्टाईल प्रकारात सुवर्णपदक पटकाविले आहे. या यशासाठी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी मल्ल राहूल यांचे कौतुक केले. ते म्हणाले ,  महाराष्ट्रासाठी हे यश अभिमानास्पद आहे. आंतरराष्ट्रीयस्तरावर क्रीडा स्पर्धांत पदक पटकाविणाऱ्या क्रीडापटूंना शासकीय सेवेत थेट नियुक्तीचा निर्णय यापुर्वीच आम्ही घेतला आहे. त्यामुळे आता राहूल यांनी  २०२०  मध्ये टोकियो येथे होणाऱ्या ऑलिंपिक स्प
Image
‘ जय महाराष्ट्र ’  कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील मुंबई ,  दि.   26   :   माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित  ' जय महाराष्ट्र ’  कार्यक्रमात  ‘ रस्ते विकासामुळे राज्याच्या विकासाला गती ’  या विषयावर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून  उद्या  शुक्रवार दि.  27  एप्रिल रोजी संध्याकाळी  7.30  ते  8  या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका मनाली द ीक्षि त यांनी ही मुलाखत घेतली आहे.         खड्डेमुक्त रस्ते अभियान ,  दोन वर्षाचे  AMC,  हायब्रीड ॲन्युईटी संकल्पना ,  मुख्यमंत्री ग्रामसडक योजना ,  गाव आणि शहरे जोडण्यासाठी शासनाने घेतलेले निर्णय ,  सार्वजनिक बांधकाम विभागाचे सक्षमीकरण ,  राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व नाबार्डमार्फत सुरु असलेल्या रस्त्यांच्या कामानंतर राज्यातील रस्त्यांची स्थिती याबाबत सविस्तर माहिती श्री. पाटील यांनी   ' जय महाराष्ट्र ’ कार्यक्रमातून दिली आहे.
Image
“ दिलखुलास ”   मध्ये परिवहन मंत्री दिवाकर रावते मुंबई ,  दि.  25   :  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित  “ दिलखुलास ”   कार्यक्रमात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत गुरुवार दि.  २६ ते शनिवार दि. २८  एप्रिल रोजी आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून सकाळी  7.25  ते  7.40  या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका पल्लवी मुजुमदार यांनी ही मुलाखत घेतली आहे. बिरसा मुंडा पुनर्वसन प्रकल्प ,  तरुण महिलांना वाहन चालकाचे प्रशिक्षण ,  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना ,  एसटी आगारांमध्ये लघु चित्रपटगृहे ,  परवाने मुक्त रिक्षा ,  खासगी टॅक्सी कंपनींना सिटी टॅक्सी नियम , महाविद्यालयीन तरुणांना वाहन चालकाचा शिकाऊ परवाना ,  अत्याधुनिक बसपोर्ट ,  बाळासाहेब ठाकरे अपघात सहायता निधी तसेच महिला चालक असलेली अबोली रंगाची रिक्षा याबाबत माहिती श्री. रावते यांनी  “ दिलखुलास ” कार्यक्रमातून दिली आहे.
Image
राज्य उत्पादन शुल्क विभागाने  ट्रॅक अॅन्ड ट्रेस पद्धतीचा अवलंब करावा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस              मुंबई ,  दि. 25 : राज्यात तयार होणाऱ्या मद्याची बेकायदेशीर वाहतूक व विक्री होऊ नये ,  यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने ट्रॅक अॅन्ड ट्रेस पद्धतीचा अवलंब करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.             वर्षा निवासस्थानी आयोजित राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. या बैठकीला राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ,  गृह विभागाचे अपर मुख्य सचिव एस.के. श्रीवास्तव ,  वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डी. के. जैन ,  विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह ,  माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही. आर .  श्रीनिवास , राज्य उत्पादन शुल्क आयुक्त अश्विनी जोशी आदींसह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.             राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कामाचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. यामध्ये इज ऑफ डूईंग बिजनेस अंतर्गत राज्य उत्पादन शुल्कच्या विविध परवान्यांचे सुलभीकरण करण्यात यावे तसेच अवैध दारू विक्रीला प्रतिबंध घालण्यास
Image
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा जलसंधारणातून दुष्काळ संपविण्याचा ग्रामस्थांचा निर्धार जिल्हाधिकाऱ्यांनी श्रमदानातून वाढवला गावकऱ्यांचा उत्साह              अमरावती, दि. 25 : ‘सारे बोलो एकसाथ, दुष्काळाशी दोन हात’ अशा घोषणा देत वरुड तालुक्यातील माणिकपूर व झटांगझिरीच्या ग्रामस्थांनी जलसंधारणातून दुष्काळ संपविण्याचा निर्धार केला. जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्यासह अनेक मान्यवरांनी आज श्रमदान करुन गावकऱ्यांचा उत्साह वाढवला.             पानी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी माणिकपूरमध्ये गत पंधरवड्यात सलग समतल चर, माती बांध, दगडी अनगड बांध आदी जलसंधारणाची कामे  श्रमदानातून ग्रामस्थांनी हाती घेतली आहेत. काही कामे पूर्णही झाली आहेत. भारतीय जैन संघटनेच्या सहकार्याने पाझर तलावातील गाळ काढणे व इतर कामांसाठी यंत्र पुरविण्यात आले आहे.             जिल्हाधिकारी श्री. बांगर हे आज पहाटेच आपल्या सहकाऱ्यांसह माणिकपूर येथे काम सुरु असलेल्या ठिकाणी जाऊन पोहोचले. त्यांनी स्वत: कुदळ व फावडे घेऊन सर्वांसह चर खणण्याच्या व दगड माती उचलण्याच्या श्रमदानाला सुरुवात केली. त्यामुळे ग्रामस्थ
मंत्रिमंडळ निर्णय : एकूण –  2 छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत 2001  ते  2009  मधील थकित खातेदारांचा समावेश राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ आता  2001  ते  2009  या कालावधीतील कर्ज थकित असलेल्या ,  परंतु  2008  व  2009  च्या कर्जमाफी योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकरी खातेदारांनाही देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तसेच इमूपालन , शेडनेट ,  पॉलिहाऊस यासाठी  2001  ते  2016  या कालावधित घेतलेल्या मात्र थकित राहिलेल्या कर्जाचाही समावेश या योजनेत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या आजच्या निर्णयानुसार  1  एप्रिल  2001  ते  31  मार्च  2009  पर्यंत उचल केलेल्या पीक किंवा मध्यम मुदत कर्जाची  30  जून  2016  रोजी थकित झालेल्या रकमेतून परतफेड केलेली रक्कम वगळून  31  जुलै  2017  पर्यंतच्या मुद्दल व व्याजासह एकूण दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार आहे. तसेच इमूपालन ,  शेडनेट ,  पॉलीहाऊस यासाठी मध्यम मुदत कर्ज घेतलेल्या थकित शेतकऱ्यांनाही
Image
सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धा जलसंधारणातून गावाच्या कायापालटाचे ध्येय ठेवा -           जिल्हाधिकारी अभिजित बांगर           अमरावती, दि. 24 : पानी फाऊंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांनी स्पर्धा हाच उद्देश न ठेवता जलसंधारणातून गावाच्या कायापालटाचे ध्येय ठेवून कामे करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी आज येथे केले. तालुका प्रशासनाने या कामांसाठी भरीव प्रयत्न करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.           पानी फाऊंडेशन, भारतीय जैन संघटना व जिल्हा प्रशासनाकडून धारणी, वरुड, मोर्शी, चिखलदरा व नांदगाव खंडेश्वर तालुक्यांतील सहभागी गावांत कामे सुरु आहेत. स्पर्धेसाठी 334 गावांतील प्रतिनिधींनी प्रशिक्षण घेतले आहे. या गावांतील नियोजन व अडचणींबाबत प्रशासन, संघटनेचे कार्यकर्ते व ग्रामस्थांची बैठक नियोजनभवनात झाली. त्यावेळी ते बोलत होते.            जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, मनपा आयुक्त हेमंतकुमार पवार, उपवनसंरक्षक हेमंतकुमार मीना, रोहयो उपजिल्हाधिकारी डी. आर. काळे, संघटनेचे उपाध्यक्ष सुदर्शन जैन, सामाजिक कार्यकर्ते गोविंद कासट, बाबास
महावितरणकडून राज्यात 23 हजार 700 मे.वॅ. विजेचा विक्रमी पुरवठा मुंबई ,  दि. 23 : महावितरणने सोमवार ,  दि. 23 एप्रिलला राज्यात  23 हजार 700 एवढ्या मेगावॅट विजेचा यशस्वीपणे पुरवठा केला. मागील काही वर्षात वीज यंत्रणेचे मोठ्या प्रमाणात सक्षमीकरण व आधुनिकीकरण करण्यात आल्यामुळे विजेच्या एवढया विक्रमी मागणीचा पुरवठा करणे महावितरणला शक्य झाले.             राज्यात महावितरणच्या कार्यक्षेत्रात 23 एप्रिल 2018 ला 23 हजार 700 मेगावॅट एवढ्या विजेची कमाल मागणी नोंदविण्यात आली. महावितरणने विजेची ही संपूर्ण मागणी यशस्वीपणे पूर्ण केली. राज्यात वीज यंत्रणेचे सक्षमीकरण व आधुनिकीकरण मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. तसेच या यंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीची कामेही नियमितपणे केली जातात. त्यामुळे एवढया मोठया प्रमाणातील विजेच्या मागणीचा पुरवठा महावितरणला पूर्ण करता येणे शक्य झाले आहे. 23 एप्रिलला मुंबईची विजेची मागणी 3 हजार 375 मेगावॅट एवढी नोंदविण्यात आली तर संपूर्ण राज्याची विजेची कमाल मागणी 23 हजार 700 एवढी नोंदविण्यात आली. एवढ्या मोठ्या प्रमाणात वीज पुरवठा करताना वीज वितरण यंत्रणेत कोणताही बिघाड न होता
Image
राज्यपाल व मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विकास मंडळांचा आढावा विदर्भ, मराठवाडा, उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळांनी अधिक सक्षमपणे काम करण्याची गरज - राज्यपाल चे. विद्यासागर राव राज्यातील विकास मंडळांनी अधिक सक्षमपणे काम करण्याची गरज असून या मंडळांना आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करुन द्यावे. यासाठी नियोजन विभागाने  कालबद्ध कार्यक्रम हाती घ्यावा, असे आवाहन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे केले. राज्यातील विदर्भ विकास मंडळ, मराठवाडा विकास मंडळ, उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ यांची संयुक्त बैठक राजभवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. त्यावेळी राज्यपाल बोलत होते. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, मुख्य सचिव सुमित मल्लिक, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डी. के. जैन, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी यांच्यासह विकास मंडळांचे अध्यक्ष, सचिव, सदस्य उपस्थित होते. राज्यपाल यावेळी म्हणाले, विकास मंडळांनी कार्यक्षमता वाढवून कालबद्ध पद्धतीने या तीनही विभागांचा विकास अधिक होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
तूर खरेदीला  15  मेपर्यंत मुदतवाढ - सहकार मंत्री सुभाष देशमुख मुंबई, दि .   23  : केंद्र शासनाने  खरीप हंगाम  2017 - 18  साठी हमीभावाने तूर खरेदीसाठी  15  मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे. तसे अधिकृत पत्र आज पणन विभागाला प्राप्त झाले आहे, अशी माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज दिली. राज्यात हमीभावाने तूर खरेदीची मुदत  18  एप्रिलपर्यंत होती. राज्य शासनाने तूर खरेदीची मुदत वाढविण्यासाठी केंद्राकडे विनंती केली होती. त्यानुसार केंद्राने ही मुदतवाढ दिली आहे.
Image
गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट पुनर्वसित गावांना शुद्ध पाण्याची व्यवस्था करावी -  मुख्यमंत्री मुंबई ,  दि.  23  : गोसीखुर्द प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन केलेल्या गावांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळावे यासाठी पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे बळकटीकरण करावे. खुल्या विहिरींमधून पाण्याचा पुरवठा करताना त्या विहिरींचे कायम पुनर्भरण होत राहिल ,  तसेच नदी व इतर स्त्रोतांमध्ये सातत्याने पाणी राहील आणि प्रत्येक कुटूंबाला शुद्ध पिण्याचे पाणी मिळेल याची दक्षता घेण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. गोसीखुर्द प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाने आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.  मुख्यमंत्री पुढे म्हणाले ,  गोसीखुर्द प्रकल्पासाठी बुडीत क्षेत्रासाठी जमीन अधिग्रहित केल्यानंतर शिल्लक राहिलेल्या अतिरिक्त जमिनींचा पर्यायी विचार करण्यात यावा. दहा बारा हेक्टर या मोकळ्या जमिनींचा वापर शेतकऱ्यांच्या आर्थिक बळकटीकरणासाठी करावा. सौर ऊर्जा प्रकल्प उभारणाऱ्या कंपन्यांची भेट या शेतकऱ्यांसोबत घालून देण्यात यावी. या ज