राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंगमध्ये महाराष्ट्रातील ११ शैक्षणिक संस्था
देशातील शैक्षणिक संस्थांची रँकिंग जाहीर
नवी दिल्लीदि. ३: केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने देशातील शैक्षणिक संस्थांची राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग जाहीर केली. देशातील शंभर उत्कृष्ट संस्थांमध्ये महाराष्ट्रातील ११ शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री श्री प्रकाश जावडेकर यांनी आज नवी दिल्ली येथे उच्च शिक्षण संस्थांची राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग जाहीर केली. देशभरातील ४ हजार ५०० शैक्षणिक संस्था यामध्ये सहभागी झाल्या होत्या.
सर्वोत्कृष्ट संस्थांमध्ये महाराष्ट्राच्या  ११ संस्था
संस्थात्मक रँकिंग मध्ये सर्वव्यापक अश्या १०० शैक्षणिक संस्थांमध्ये महाराष्ट्रातील ११ शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई या क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठने १६ व्या स्थानावर आहे.  इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेस ३० वे रँकिंग मिळाले आहे.
विद्यापीठ रँकिंग मध्ये राज्यातील ९ विद्यापीठे
देशातल्या १०० विद्यापीठांच्या रँकिंगमध्ये महाराष्ट्रातील ९ विद्यापीठाचा समावेश आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे विद्यापीठ रँकिंगमध्ये ९ व्या स्थानावर आहे.  इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी या विद्यापीठास १९ वे स्थान मिळाले आहेतर होमी भाभा राष्ट्रीय संस्थेला २६ वी रँकिंग देण्यात आली आहे.

औषधीय संस्थांमध्ये राज्यातील ११ संस्था
देशातल्या उत्कृष्ट ५० औषधीय संस्थांमध्ये महाराष्ट्रातील ११ संस्थांचा समावेश आहे. पहिल्या १० औषधीय संस्थांमध्ये राज्याच्या ३ संस्थांचा समावेश आहे. इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी चौथ्या क्रमांकावरबॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी ८ व्या तर नरसी मोंजी संस्थेला ९ वी रँकिंग मिळाली आहे.
राज्यातील नऊ अभियांत्रिकी संस्थाना रँकिंग
अभियांत्रिकी शिक्षण संस्थेच्या रँकिंग मध्ये देशातील १०० अभियांत्रिकी संस्थांमध्ये महाराष्ट्रातील ९ संस्थांचा समावेश आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे ही संस्था दुसऱ्या क्रमांकावर तर इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी या संस्थेला १० वे स्थान मिळाले आहे. नागपूरच्या विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेला ३१ वी रँकिंग प्राप्त झाली आहे.
राज्यातील ६ व्यवस्थापन संस्थाना रँकिंग
 देशातील ५० उत्कृष्ट व्यवस्थापन संस्थामध्ये महाराष्ट्रातील ६ संस्थांचा समावेश आहे. यामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे ही संस्था ५ व्या स्थानावर तर मुंबईच्या राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्थेला १४ वी रँकिंग प्राप्त झाली आहे. पुण्याच्या सिंबायोसिस संस्थेला १८ वे स्थान मिळाले आहे.
देशातील पहिल्या दहा विधी महाविद्यालयांमध्ये राज्यातील पुण्याच्या सिबायोसिस विधी माहाविद्यालयाला वे रँकिंग प्राप्त झाले आहे.  महाविद्यालय रँकिंगमध्ये राज्यातील महाविद्यालयांचा समावेश आहेतर वैद्यकिय शिक्षणाच्या रँकिंगमध्ये राज्यातील 1  वैद्यकिय शिक्षण संस्था सामील आहे.  यावेळी  पहिल्या दहा रँकिंगप्राप्त उच्च शिक्षण संस्थांना केंद्रीय मंत्री श्री जावडेकर यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले.  
0000         



Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती