चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात पाणीपुरवठा करण्यासाठी
अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात
-  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबईदि. 17 : चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात पाणी टंचाई भासू नये यासाठी तातडीने अल्पकालीन उपाययोजना करण्याबरोबरच दीर्घकालीन उपाययोजना कराव्यातअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.
          चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात पाणीटंचाई काळात पाणीपुरवठा करण्याबाबत आढावा बैठक आज मंत्रालयात मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस वित्तमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवारऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळेपाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोतऊर्जा राज्यमंत्री मदन येरावारआमदार नाना शामकुळेमहापौर अंजली घोटेकरस्थायी समिती सभापती राहुल पावडेपाणीपुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव शामलाल गोयलचंद्रपूरचे जिल्हाधिकारी आशुतोष सलीलमहापालिका आयुक्त संजय काकडे,महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव संतोष कुमार आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणालेचंद्रपूर शहराला पाणीपुरठा करणाऱ्या पाणी स्त्रोतामधील ज्या ठिकाणी पाणीसाठा कमी झाला आहे त्याठिकाणी गाळ काढण्याचे काम तातडीने हाती घ्यावे. या कामासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. गाळ काढल्यामुळे भविष्यात पाणीसाठा वाढण्यास मदत होईल असेही त्यांनी सांगितले.
श्री. मुनगंटीवार म्हणालेचंद्रपूर शहराला पावसाळा येईपर्यंत पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. सध्या चंद्रपूर शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. शहराच्या पाणीपुरवठ्याचा 15 जूननंतर आढावा घेवून आवश्यकतेनुसार उपाययोजना करण्यात याव्यात.
००००

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती