Monday, April 9, 2018

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह
निमित्त दिलखुलास मध्ये संदेश वाघ
(दि. ८ एप्रिल ते १४ एप्रिल)
       मुंबईदि. 9 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ कार्यक्रमात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अभ्यासक संदेश वाघ यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत उद्या मंगळवार दि. 10 आणि बुधवार दि. 11 एप्रिल रोजी आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक नरेंद्र बेडेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.
दि. ८ एप्रिल ते १४ एप्रिल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह निमित्ताने  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कायदेविषयक विचार,भारतीय संविधानातील कायदा आणि सामाजिक न्यायाचे तत्वभारतीय राज्यघटना तयार करताना विविध देशातील राज्यघटनांचा केलेला अभ्यासभारतीय राज्यघटनेतील विविध कलमेस्त्री सक्षमीकरण, हिंदू कोड बिल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारितापुणे करार आदी विषयांची माहिती श्री. वाघ यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे.

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 04-09-2025

  जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपाच्या ४५ पदांसाठी रोजगार मेळावा     अमरावती, दि. ४ : जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्त्वावरील ४५ पदांवर न...