ॲप्रेंटिसशीपच्या 7 लाख उद्दिष्टपूर्तीसाठी अधिकाधिक उद्योगांनी
पोर्टलवर नोंदणी करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
मुंबईदि. 20 : राज्यात विविध उद्योगांमध्ये ॲप्रेंटिसशीपचे प्रमाण वाढविण्यासाठी आणि 7 लाखांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अधिकाधिक उद्योगांनी शासनाच्या पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या वतीने शिकाऊ उमेदवारी (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम 2017 च्या अंमलबजावणीबाबत  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजी पाटील-निलंगेकरराज्यमंत्री डॉ. रणजित पाटीलमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविणसिंह परदेशीउद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवालउच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटेनियोजन विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रेएमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठीमुख्यमंत्र्यांचे सचिव अनिल डिग्गीकर,सचिव असीमकुमार गुप्ताआयुक्त ई. रविंद्रन उद्योगपती गौतम सिंघानिया यांच्यासह विविध उद्योगसमूहांचे उद्योजक बैठकीस उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेआजच्या बैठकीत शासन आणि उद्योजक या दोन्ही  बाजूकडील चर्चा ही महत्त्वपूर्ण ठरली. त्यांच्या सूचना विचारात घेऊन या सूचनांवर सकारात्मक कार्यवाही करण्यास राज्य शासन अनुकूल आहे.  तीन पाळ्यांमध्ये कामॲप्रेंटिसशीप नियमावलीतील कार्यपद्धती या सर्व बाबींमध्ये शासन विचार करेल.  सर्व उद्योजकांनी  http://www.apprenticeship.gov.in  पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहेत्यावर नोंदणीची संख्या कमी असून अधिकाधिक उद्योजकांनी यावर नोंदणी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उद्योजकांना केले. ॲप्रेंटिसशीपचे प्रमाण  वाढवून लाखाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी  उद्योगांनी पुढाकार घेऊन सहभाग दिला तर उद्दिष्टपूर्ण करणे सहज शक्य होईलअसा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
महाराष्ट्रातल्या सर्व उद्योजकांना निमंत्रित करुन येत्या 15 दिवसात सर्व 6 महसुली विभागामध्ये अशा प्रकारची बैठक घेण्यात येणार असल्याचे कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील- निलंगेकर यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्रात सर्वाधिक मोठे उद्योग समूह असून त्यातून अधिकाधिक कुशल मनुष्यबळ निर्माण करणे ही आपली जबाबदारी आहे.  महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषदेला अभ्यासक्रम तयार करण्याची मान्यता असल्याने उद्योजकांनी आवश्यक असलेले प्रशिक्षण घेऊन पुढे यावेत्यास राज्य शासन परवानगी देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रारंभी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे सचिव असीमकुमार गुप्ता यांनी सादरीकरण केले. शिकाऊ उमेदवारी अधिनियमात वेळोवेळी सुधारणा केल्याने त्याचा फरक जाणवला, असे सांगून अधिकाधिक कंपन्यांनी गव्हर्नमेंट पोर्टलवर स्वतःच्या उद्योगाची नोंदणी करणे हा उद्देश आजच्या बैठकीचा असल्याचे स्पष्ट केले. शासकीय आयटीआयच्या आधुनिकीकरण आणि व्हर्च्युअल क्लासरुममुळे शासकीय आयटीआयमधील प्रशिक्षणाला गती मिळाली आहे. कुशल महाराष्ट्र-रोजगारयुक्त महाराष्ट्र’ हा कार्यक्रम विभागाचा दूरदर्शी कार्यक्रम असल्याचे स्पष्ट करुन विभागाच्यावतीने सुरु असलेल्या यासंदर्भातील उपक्रमांची त्यांनी माहिती दिली.
यावेळी विविध उद्योग-कंपन्यांचे प्रतिनिधींनी ॲप्रेंटिसशीपबाबत आपल्या सूचना मांडल्या. महिला ॲप्रेंटिसशीप वाढविणेॲप्रेंटिसशीप 6 महिन्याबरोबर 2 ते 3 महिन्याचे करणेकेंद्र शासनाच्या वेगवेगळ्या ॲप्रेंटिसशीप प्रोग्रॅमशिफ्टबाबत नियमावलीसंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली.
००००


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती