Tuesday, April 3, 2018

कुस्तीगीरांच्या मागण्याबाबत शासन सकारात्मक
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबईदि. : महाराष्ट्राला कुस्तीची परंपरा लाभली आहे. महाराष्ट्रातील मल्लांनी जगभर नावलौकिक मिळवला आहे. यामुळे कुस्तीला उर्जितावस्था आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असून पैलवानांच्या मागण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज मंत्रालयात मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांची भेट घेतलीत्याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी आमदार सर्वश्री राहुल कुलबाळा भेगडेप्रकाश आबीटकरक्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकरहिंदकेसरी दीनानाथ सिंहपापालाल कदममहाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाडराहुल काळभोर,बापू लोखंडे यांच्यासह पदाधिकारी व पैलवान उपस्थित होते.
श्री. दीनानाथ सिंह यांनी पैलवानांना वाढीव पेन्शन मिळावीएसटीचा प्रवास मोफत मिळावाशासकीय विश्रामगृहात सोय व्हावीवैद्यकीय सुविधा मिळाव्यातअशा मागण्या मांडल्या.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेतीनवेळा महाराष्ट्र केसरी व हिंद केसरी पैलवानांना पोलीस उपनिरीक्षकऐवजी पोलीस उपअधीक्षक करण्याचा  निर्णय शासनाने घेतला. पैलवानांच्या कुटुंब निवृत्तीबाबत क्रीडा विभागाने आराखडा तयार करावा. पेन्शनसाठी वयाची अट न टाकता प्रस्ताव तयार करावा. पैलवानांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईलअसे त्यांनी सांगितले.
००००


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 04-09-2025

  जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपाच्या ४५ पदांसाठी रोजगार मेळावा     अमरावती, दि. ४ : जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्त्वावरील ४५ पदांवर न...