Friday, April 6, 2018

महामानवास अभिवादन’ लोकराज्य विशेषांकाचे
सामाजिक न्यायमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
            मुंबईदि. 6 :  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणाऱ्या ‘महामानवास अभिवादन’ या एप्रिल 2018च्या लोकराज्य विशेषांकाचे प्रकाशन सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते आज सातपुडा या शासकीय निवासस्थानी करण्यात आले. या प्रसंगी श्री.बडोले यांच्या पत्नी शारदा बडोले व अन्य सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. या अंकाचे अतिथी संपादक सामाजिक न्यायमंत्री श्री. बडोले आहेत.
            या विशेषांकात डॉ.बाबासाहेब आंबेडकराच्या विविध सामाजिक पैलूंवरती मान्यवरांनी विचार व्यक्त केले आहेत. यामध्ये छत्रपती शाहू महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सलोख्याचे बंध वर्णिलेला भावस्पर्शी लेख तसेच डॉ.बाबासाहेबांनी विद्युत आणि जल क्षेत्राच्या विकासासंदर्भात मांडलेल्या महत्त्वपूर्ण धोरणांबद्दलची माहिती,डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांसाठी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. या त्यांच्या सार्वजनिक क्षेत्रातील पहिल्या कामाविषयीची माहितीत्यांच्या अलौकिक ग्रंथप्रेमाचे दर्शन करणारा लेखडॉ. बाबासाहेबांच्या स्पर्शाने पुनीत झालेल्या खुर्च्या तसेच महत्त्वपूर्ण ग्रंथसंपदेची विस्तृत माहिती देण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेबांच्या जीवनाशी निगडीत महत्त्वाच्या स्थळांचा विकास केला जात आहेया स्थळांविषयी प्रेरणादायी माहितीडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देशाच्या अंतर्गत व बाह्यसुरक्षा विषयीचे चिंतन आदी लेखांचा समावेश या विशेषांकात करण्यात आला आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटाची संक्षिप्त माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती या विशेषांकात देण्यात आली आहे.
            याचबरोबर वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभातर राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत मांडलेला सन 2018-19 अर्थसंकल्पाची माहिती व त्या अंतर्गत कृषीआरोग्यशिक्षणपायाभूत सुविधायुवकांसाठी विविध उपक्रम अशा अनेक बाबींसाठी अर्थसंकल्पीय तरतुदी याबाबत सविस्तर माहितीचा समावेश करण्यात आला आहे. यासोबतच महाराष्ट्रात संपूर्ण प्लास्टिक बंदी करण्याच्या निर्णयावर अधारित महत्त्वपूर्ण लेखाचा समावेश आहे.
            ‘लोकराज्य एप्रिल 2018’ चा अंक 92 पानांचा असून त्याची किंमत फक्त दहा रुपये आहे.  जिल्हा माहिती कार्यालयप्रमुख बुक स्टॉलशासकीय ग्रंथालय येथे हा अंक सहज उपलब्ध होईल.
००००


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...