कोळसा वाहतुकीसाठी महानिर्मिती कंपनी
रेल्वे मार्ग उभारणीच्या कामात भागीदार होणार
राज्यातील महानिर्मिती कंपनीला केंद्र शासनाकडून मिळालेल्या छत्तीसगडमधील गरे पालमा सेक्टर-दोन या कोळसा खाणीतून कोळशाची वाहतूक करण्यासाठी कटघोरा-डोंगरगड रेल्वे मार्गाच्या उभारणी करण्यात येणार आहे. या उभारणीच्या कामासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या विशेष हेतू यंत्रणा (स्पेशल परपज व्हेईकल) कंपनीमध्ये छत्तीसगड रेल कार्पोरेशन आणि साऊथ-ईस्टर्न कोललाईफ लिमिटेट (एसईसीएल) यांच्यासोबतच्या महानिर्मिती कंपनीच्या भागीदारीस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
महानिर्मिती कंपनीच्या एकूण औष्णिक विद्युत केंद्रांची स्थापित क्षमता १० हजार ३८० मेगावॅट इतकी आहे. त्यासाठी ४ कोटी १५ लाख ८६ हजार टन इतक्या कोळशाची दरवर्षी आवश्यकता असते. केंद्र शासनाने छत्तीसगडमधील गरे पालमा सेक्टर-दोन ही खाण यासाठी महानिर्मितीस दिली असून पुढील ३० वर्षे या खाणीतून कोळशाचा पुरवठा होणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या झासुर्गुडा-नागपूर या रेल्वे विभागील मार्गावरून पुरवठा होईल. मात्रझार्सुगूडा-राजनंदगाव हा रेल्वे मार्ग वाहतुकीसाठी शंभर टक्के व्यस्त असल्याने त्याला समांतर असा 270 किमीचा कटघोरा-डोंगरगड हा स्वतंत्र रेल्वे मार्ग उभारण्यात येणार आहे. या मार्गामुळे महानिर्मितीच्या 23.6 एमटीपीए इतक्या मोठ्या प्रमाणातील कोळशाची वाहतूक करणे शक्य होणार आहे.
रेल्वे मंत्रालय आणि छत्तीसगड शासन यांच्या एसपीव्ही मॉडेलद्वारे हा नवीन मार्ग उभारण्यात येणार असून त्यात महानिर्मिती कंपनीस भागीदार करून घेण्यास छत्तीसगड शासनाने मंजुरी दिली आहे. या कंपनीमध्ये महानिर्मिती आपले २६ टक्के भागभांडवल गुंतवणार आहे. एकूण ४ हजार ८२० कोटी रूपयांच्या या प्रकल्पातील ८० टक्के रक्कम कर्जाच्या स्वरूपात उभारली जाणार असून उर्वरित गंतुवणूक तीन भागीदारांमार्फत केली जाणार आहे. त्यात महानिर्मितीला २५० कोटी ४० लाख रूपयांची गुंतवणूक करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यासोबतच एसपीव्ही कंपनीसोबत कोळसा वाहतुकीबाबत काही अटी व शर्ती ठेवण्यास मान्यता देण्यात आली असल्यामुळे कोळशाची वाहतूक करण्यात भविष्यात अडचण येणार नाही. तसेच भविष्यात कराराचा भंग झाल्यास महानिर्मितीला नुकसान भरपाई मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाहीअशी तरतूद करून हा करार शासनाच्या मंजुरीनंतरच करण्यात येणार आहे.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती