आयुष्यमान भारत उपक्रमाच्या माध्यमातून
50 कोटी भारतीयांना आरोग्य सेवा
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
          परभणीदि. 19 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आयुष्यमान भारत हा उपक्रम सुरु करुन या उपक्रमाच्या माध्यमातून 50 कोटी भारतीयांना 5 लक्ष रुपयांपर्यंतच्या आरोग्य सेवा खासगी रुग्णालयाच्या माध्यमातून मोफत उपलब्ध करुन दिल्या जात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
          डॉ. प्रफुल्ल पाटील मल्टी सुपर स्पेशॅलिटी हॉस्पीटलचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोनशिला अनावरण करुन करण्यात आले. त्याप्रसंगी उपस्थिताना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
          व्यासपीठावर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गजहाजबांधणी व जलसंपदानदी विकास आणि गंगा पुनरुत्थान मंत्री नितीन गडकरीपाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा परभणीचे संपर्क मंत्री बबनराव लोणीकरकामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकरखासदार रावसाहेब दानवेडॉ प्रफुल्ल पाटीलडॉ.  विद्या प्रफुल्ल पाटीलडॉ. जान्हवी पाटीलअभय चाटेआनंद भरोसेप्रशांत सांगळे आदींची उपस्थिती होती.
          मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणालेपरभणी वासियांसाठी  सर्व सोईनीयुक्त व अद्यावत अशा हॉस्पीटलच्या माध्यमातुन रुग्णांना दर्जेदार अशी सेवा उपलब्ध करुन दिल्याबद्दल डॉ. पाटील यांचे अभिनंदन करत रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरविण्यासाठी राज्यातील प्रत्येक शहरात अशा प्रकारच्या मल्टी स्पेशॅलिटी आवश्यकता आहे.  राज्य शासनामार्फत महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातूनही राज्यातील लाखो जनतेला उपचाराची सोय उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
          कार्यक्रमास पदाधिकारीअधिकारी यांच्यासह डॉक्टर्स व वैद्यकीय प्रशिक्षणार्थींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
००००

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती