दिव्यांगाचा मतदान प्रक्रियेतील सहभाग वाढवावा
-         अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी
          अमरावती, दि. 03 :दिव्यांगाच्या मतदानाच्या अधिकाराचे रक्षण करतांनाच त्यांचा मतदान प्रक्रियेतील सहभाग वाढविण्यासाठी  प्रयत्न करण्याचे निर्देश अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंग परेदशी यांनी येथे दिले.
          दिव्यांग व महिलांचा मतदान प्रक्रियेतील सहभागाबाबत बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली त्यावेळी बोलत होते. उपजिल्हाधिकारी (भुसंपादन) रामदास सिद्धभट्टी यांच्यासह अनेक अधिकारी-कर्मचारी, विविध शाळांचे मुख्याध्यापक, विशेष शिक्षक आदी यावेळी उपस्थित होते.
          ज्या ठिकाणी जास्त दिव्यांगांची संख्या जास्त आहे तिथे विशेष दुत देण्यात यावा. मतदान केंद्र तळमजल्यावर असणे अपेक्षित आहे. काही अपरिहार्य कारणांमुळे मतदान केंद्र हे पहिल्या मजल्यावर असेल तर तेथे स्वयंसेवकांची नेमणूक करावी. त्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी असे निर्देश श्री. परदेशी यांनी दिले.
          दिव्यांग हा मतदान नोंदणी कुठेही करु शकतो, मात्र त्याचे नाव ज्या मतदार संघात असेल तेथेच त्याला मतदान करता येईल. आपल्या विभागातील दिव्यांगांना मतदानात सहभाग देण्यासाठी जनजागृती करण्यात यावी. त्यांना मतदानासाठी प्रेरित करावे व मतदानाची गोपनियता कायम राहील याची काळजी घ्यावी असे निर्देश श्री. सिद्धभट्टी यांनी दिले.
                                                          00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती