Thursday, April 5, 2018

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-फिलिप्सचे मेझॉन यांच्यात चर्चा
आरोग्य केंद्रासाठी वैद्यकीय उपकरणे पुरविण्याचा फिलिप्स कंपनीचा प्रस्ताव
मुंबईदि. ५ : राज्यातील आरोग्य केंद्रात अत्याधुनिक वैद्यकीय उपकरण सुविधा पुरविण्याबाबत फिलिप्स कंपनीने तयारी दर्शविली असून प्रस्तावावर अभ्यास करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्य विभागाला दिल्या.
फिलिप्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॅनियल मेझॉन यांनी आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आरोग्य विषयक प्रस्तावावर विस्तृत चर्चा केली.
यावेळी श्री. मेझॉन म्हणालेफिलिप्स कंपनीने यापूर्वी टी.व्ही.,रेडिओ आदी इलेक्ट्रॉनिक वस्तुंची निर्मिती करुन जगभरचे मार्केट काबीज केले होते. आता या कंपनीने आरोग्य क्षेत्रात काम सुरु केले आहे. हॉस्पिटल मध्ये लागणारी वैद्यकीय उपकरणे उदा. सिटी स्कॅन मशीनसोनोग्राफी मशीनएमआरआय मशीन अशी अनेक उपकरणे तयार करुन पुरवतो. त्याच्या जोडीला प्रशिक्षित मुनुष्यबळही उपलब्ध आहे. जगातील 85 देशात अशी वैद्यकीय उपकरणे निर्यात करतो. भारतामध्ये झारखंड आणि हरियाना या राज्यात वैद्यकीय उपकरणांची सेवा दिली आहे. त्याचबरोबर ई-हॉस्पिटल संकल्पना राबविली आहे. महाराष्ट्रातही अत्याधुनिक आरोग्य सेवा-सुविधा सामुग्री पुरविण्याची कंपनीची तयारी आहे.
यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितलेई-हॉस्पिटल ही संकल्पना चांगली असून आपण दिलेल्या प्रस्तावावर अभ्यास करु.
या बैठकीला नेदरलॅण्डचे राजदूत गुडिडो टिलमनफिलिप्स कंपनीचे मुख्य वित्त अधिकारी अभिजित भट्टाचार्यमाहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस. श्रीनिवासआरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यासमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अनिल डिग्गीकरमुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे उपस्थित होते.

0 0 0

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...