Tuesday, April 3, 2018

यवतमाळ जिल्ह्यातील निवासी अतिक्रमणांचा
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात आढावा
मुंबईदि. ३ : यवतमाळ जिल्ह्यातील देवनगर (ता. दिग्रस) व अशोकनगर (ता. नेर) येथील निवासी अतिक्रमणांबाबत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला.
मंत्रालयात झालेल्या या बैठकीस महसूल मंत्री चंद्रकांत पाटीलराज्यमंत्री संजय राठोडगृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजयकुमारमहसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तवनगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकरवन विभागाचे सचिव विकास खारगेयवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आदी उपस्थित होते.    
देवनगर आणि अशोकनगर येथे १ हजार ६५ इतकी निवासी अतिक्रमणे आहेत. ही निवासी अतिक्रमणे नियमीत करण्यात यावीतअशी स्थानिकांची मागणी आहे. त्या अनुषंगाने आजच्या बैठकीत आढावा घेण्यात आला.


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...