छत्रपती शिवाजी महाराजांनी सामान्य व्यक्तींमध्ये ऊर्जा निर्माण केली
: मुख्यमंत्री

नवी दिल्ली, 9 : छत्रपती शिवाजी महाराजांनी सामान्य व्यक्तींमध्ये ऊर्जा निर्माण करून स्वराज्य स्थापन केलेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाल किल्ल्यावर श्री. राजा शिवछत्रपती गौरवगाथा’ या महानाटयाच्या प्रयोगा प्रसंगी केले.
            लाल किल्ल्यावरील माधवदास पार्क येथे श्री. राजा शिवछत्रपती गौरवगाथा’ या हिंदी महानाटयाचे आयोजन 6 ते 10 एप्रिल दरम्यान करण्यात आलेले आहे. आज या महानाटयाच्या प्रयोगा प्रसंगी मुख्यमंत्री श्री.फडणवीस बोलत होते. यावेळी महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यासह अन्य मान्यवर मंचावर उपस्थित होते.
            श्री फडणवीस म्हणालेछत्रपती शिवाजी महाराजांनी पारतंत्र्यात असलेल्या जनतेच्या मनात ऊर्जा निर्माण करून त्यांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली. इतिहासात अनेक राजे होऊन गेले मात्रछत्रपती शिवाजी महाराजांनी जे शौर्य दाखविले ते सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. सामान्यातील सामान्य व्यक्तीला न्याय  मिळावा,अन्यायाच्या विरोधात कसे लढावे याचे धडे छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेल्या निर्णावरून दिसते. यासोबतच आपल्या राज्य व्यवस्थापनजल व्यवस्थापनपर्यावरणाचे व्यवस्थापनआदी सुरळीत चालावे यासाठी काढलेले आदेशांना आजही  आदर्श म्हणून बघितले जातअसल्याचे श्री. फडणवीस म्हणाले.
           छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र हे फार मोठे असून त्याला या महानाट्यांच्या माध्यमातून प्रस्तुत करण्याचे शिवधनुष्य शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी मागील कित्येक वर्षापासून पेलले आहे. त्यामुळेच सामान्य जनतेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची जीवनचरित्र पोहोचत असल्याचेमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी  महानाट्याचा  प्रयोग सुरू होण्यापूर्वी आरती केली.
0000 


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती