Saturday, April 7, 2018

संत्रा प्रकल्पाला जोडणारा ठाणाठुणी पोच मार्ग दर्जोन्नत
प्रकल्पाला गती मिळेल
  पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील
अमरावती, दि. 7 : मोर्शी येथील संत्रा प्रकल्पाला जोडणा-या ठाणाठुणी पोच मार्ग हा सुमारे दीड किलोमीटर लांबीचा आता प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नत करण्यात आला आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या कामाला गती मिळेल, असे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांनी आज सांगितले.
            मोर्शी तालुक्यातील अमरावती- मोर्शी- वरुड- पांढुर्णा या रस्त्यावर हिवरखेड गावाजवळ संत्रा प्रकल्पाची जागा निश्चित झाली आहे. या संत्रा प्रकल्पाला जाण्यासाठी 1. 400 किमी लांबीचा ठाणाठुणी पोच मार्ग हा एकमेव मार्ग उपलब्ध आहे. त्यामुळे त्याला जिल्हा नियोजन समितीत मान्यता दिली होती व आता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फतही तत्काळ निर्णय घेण्यात आला, असे श्री. पोटे- पाटील यांनी सांगितले.
            ते म्हणाले की, या निर्णयामुळे हा रस्ता प्रमुख जिल्हा मार्गात जोडला गेला आहे. तसेच, मोर्शी- पाळा- सालबर्डी- यावली- दापोरी- ठाणाठुणी असा राज्यमार्ग 47 म्हणून तो दर्जोन्नत करण्यात आला आहे. संत्रा प्रकल्प हा फळबाग उत्पादक शेतक-यांसाठी प्रगतीची पर्वणीच ठरणार असून, रस्त्यामुळे प्रकल्पाचे काम लवकरच मार्गी लागेल.    
        या निर्णयामुळे प्रमुख जिल्हा मार्गाची लांबी आता 1981.610 किलोमीटर झाली आहे.
                                                            00000







No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...