‘शिधा पत्रिकांचे डिजिटायझेशन’
'जय महाराष्ट्र'मध्ये आज दिलीप शिंदे
मुंबई, दि. 2 माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात शिधा पत्रिकांचे डिजिटायझेशन या विषयावर शिधावाटप व नागरी पुरवठा संचालकदिलीप शिंदे यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत उद्या मंगळवार दि. 3 एप्रिल रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून संध्याकाळी 7.30 ते 8या वेळेत प्रसारीत होणार आहे. विभागीय संपर्क अधिकारी अर्चना शंभरकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.
सर्वसामान्यांशी निगडीत असलेल्या शिधावाटप व नागरी पुरवठा विभागाची कार्यप्रणालीरास्त भाव धान्य दुकानामध्ये बसविण्यात आलेले पॉईंट ऑफ सेल उपकरणबायोमट्रिक पद्धतीने धान्य वितरणशिधापत्रिकाबरोबर लाभार्थ्यांचे आधार क्रमांक सिडिंग तसेच ई लिलावाद्वारे साखर खरेदीच्या महाराष्ट्र पॅटर्न आदी विषयांची माहिती श्री. शिंदे यांनी 'जय महाराष्ट्रया कार्यक्रमातून दिली आहे.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती