छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना
कर्जमाफी योजनेसाठी अर्ज न केलेल्या शेतक-यांनी लाभ घ्यावा
        - पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील
अमरावती, दि. 2: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या शेतक-यांसाठी 14 एप्रिलपर्यंत अर्ज करण्यास संधी देण्यात आली असून, त्याचा अधिकाधिक शेतक-यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांनी केले आहे.
            कुणीही पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहू नये अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका आहे, असे सांगून श्री. पोटे- पाटील म्हणाले की, यापूर्वी खरीप हंगाम चालू असल्याने, तसेच काही वैयक्तिक किंवा तांत्रिक कारणांमुळे शेतक-यांना मुदतीत ऑनलाईन अर्ज सादर करता आले नाहीत. हे लक्षात घेऊन अर्ज करण्यासाठी 14 एप्रिलपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे. शेवटच्या पात्र शेतक-याला या योजनेचा लाभ मिळवून देण्याचा शासनाचा निर्धार आहे, असे श्री. पोटे- पाटील यांनी सांगितले.                  
                             वनटाईम सेटलमेंट’मध्ये रक्कम भरण्यास मुदतवाढ
मुद्दल व व्याजासह दीड लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतक-यांसाठी एकवेळ समझोता (वन टाईम सेटलमेंट) योजनेंतर्गत पात्र शेतक-यांनी त्यांच्या हिश्श्याची संपूर्ण रक्कम भरण्याचा कालावधी 30 जूनपर्यंत वाढविण्यास शासनाने मान्यता दिली आहे.  
योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतक-यांना स्वत: किंवा आपले सरकार सेवा केंद्रामार्फत माहिती भरून ऑनलाईन अर्ज करता येईल. https://csmssy.mahaonline.gov.in  या पोर्टलवर नोंदणी व अर्ज सादर करता येतील. योजनेंतर्गत यापूर्वी अर्ज केलेल्या शेतक-यांना पुन्हा अर्ज करता येणार नाहीत, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे यांनी दिली. 
00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती