जिल्ह्यात महसूल उद्दिष्टानुसार संपूर्ण वसूली
अमरावती जिल्ह्यात 105 टक्क्यांवर महसूल वसूली

अमरावती, दि. 2 : जिल्हा प्रशासनाकडून 2017-18 या आर्थिक वर्षात महसूलाची 114 कोटींहून अधिक वसूली झाली असून त्याची टक्केवारी 105 टक्के इतकी आहे. या उदिष्टपूर्तीबद्दल जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी  जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
          जिल्ह्यासाठी 108 कोटी 45 लाख इतके उदिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्यात प्रपत्र 1 नुसार जमिन महसूल, सारा, अकृषक कर, शिक्षण कर, रोहयो कर आदींबाबत 28 कोटी 45 लाख एवढे उद्दिष्ट होते. प्रत्यक्ष 41 कोटी 91 लाख इतकी वसूली करण्यात आली. गौण खनिज महसूलाचे उद्दिष्ट 80 कोटी होते. 70 कोटी 55 लाख रुपये इतकी प्रत्यक्ष वसूली झाली आहे. करमणूक कराची वसूली 1 कोटी 37 लाख इतकी झाली. इतर करांपोटी 15 लक्ष 74 हजार इतकी वसूली झाली. अहवालाच्या दिवशी 8 कोटी 42 लाख महसूल विविध बाबीतून प्राप्त झाला.
          अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी, डॉ. नितीन व्यवहारे, भूसंपादन उपजिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, राम लठाळ, मनोहर कडू, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) अजय लहाने, नझूल तहसीलदार, प्रज्ञा महांडुळे, जिल्हा खनिकर्म अधिकारी, अरविंद माळवे, सर्व नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी व कर्मचारी यांनी या कामासाठी प्रयत्न केले. या सर्वांचे जिल्हाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
         
00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती