Wednesday, April 18, 2018

दिलखुलास मध्ये सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले
(बीड येथे २१ आणि २२ एप्रिल रोजी व्यसनमुक्ती संमेलन)
मुंबई, दि. १८ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात दि. २१ आणि २२ एप्रिल रोजी बीड येथील व्यसनमुक्ती संमेलनाबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून उद्या गुरुवार दि. १९ एप्रिल  आणि शुक्रवार दि. २० एप्रिल रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक श्रीमती उत्तरा मोने यांनी ही मुलाखत घेतली आहे.
शासनाद्वारे बीड येथे दि. २१ आणि २२ एप्रिल रोजी व्यसनमुक्ती संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत व्यसनमुक्तीसाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम,व्यसनमुक्ती संमेलनाची संकल्पनानशाबंदी मंडळाचे कार्य व स्वरूपनशाबंदी कार्यशाळाव्यसनमुक्तीसाठी करण्यात येणारे प्रबोधनव्यसनमुक्ती संस्थांना देण्यात येणारे पुरस्कार व सबलीकरण निधी आदी विषयांची माहिती श्री. बडोले यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे.

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 11-03-2026

  दिव्यांग लाभार्थ्यांच्या मानधनात हजार रुपयांची वाढ; 20 मार्चपूर्वी युडीआयडी आणि आधार अपडेट करण्याचे आवाहन अमरावती, दि. 11 (जिमाका):   राज्...