Tuesday, April 3, 2018

दौंडमधील नाट्यगृह व क्रीडा संकुलासाठी जागा देणार
- मुख्यमंत्री
मुंबईदि. 3 : दौंडमध्ये अद्ययावत नाट्यगृह व क्रीडा संकुलासाठी दहा एकर जागा देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिले.
            दौंडमध्ये नाट्यगृह व क्रीडासंकुलासाठी नगरपरिषदेला जागा देण्यासंदर्भात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापटदौंडचे आमदार राहुल कूलकृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विजयकुमारमहसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तवनगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकरपुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ रावकृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंहमाजी नगराध्यक्ष श्री. कटारिया आदी यावेळी उपस्थित होते.
            दौंडमध्ये अद्ययावत सुविधा असलेले नाट्यगृह तसेच क्रीडा संकुल उभारण्यासाठी दहा एकर जागा देण्यासंदर्भात तातडीने प्रस्ताव तयार करून पाठविण्याचे निर्देश मुख्यमंत्रयांनी यावेळी दिले.

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...