Tuesday, April 24, 2018

गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
पुनर्वसित गावांना शुद्ध पाण्याची व्यवस्था करावी
मुख्यमंत्री
मुंबईदि. 23 : गोसीखुर्द प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन केलेल्या गावांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळावे यासाठी पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे बळकटीकरण करावे. खुल्या विहिरींमधून पाण्याचा पुरवठा करताना त्या विहिरींचे कायम पुनर्भरण होत राहिलतसेच नदी व इतर स्त्रोतांमध्ये सातत्याने पाणी राहील आणि प्रत्येक कुटूंबाला शुद्ध पिण्याचे पाणी मिळेल याची दक्षता घेण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. गोसीखुर्द प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाने आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. 
मुख्यमंत्री पुढे म्हणालेगोसीखुर्द प्रकल्पासाठी बुडीत क्षेत्रासाठी जमीन अधिग्रहित केल्यानंतर शिल्लक राहिलेल्या अतिरिक्त जमिनींचा पर्यायी विचार करण्यात यावा. दहा बारा हेक्टर या मोकळ्या जमिनींचा वापर शेतकऱ्यांच्या आर्थिक बळकटीकरणासाठी करावा. सौर ऊर्जा प्रकल्प उभारणाऱ्या कंपन्यांची भेट या शेतकऱ्यांसोबत घालून देण्यात यावी. या जागांना सौर ऊर्जा प्रकल्पासाठी मोठ्या कालावधीसाठी या जागा भाडेतत्वावर दिल्यास यातून शेतकऱ्यांना नियमीत उत्पन्नाची सोय होईलअशा शक्यतांना पडताळून पहावे, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी तरूण उद्योजकांना उद्योग उभारणीसाठी देण्यात येणारे मुद्रा योजनेंतर्गत कर्ज देताना प्रकल्पग्रस्तांचा प्राधान्यांने विचार करण्यात यावा तसेच प्रकल्पग्रस्तांना प्रधानमंत्री आवास घरकूल योजनेंतर्गत घर बांधण्यासाठी मदत व्हावी याबाबत विचार करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
राज्य शासनाने एन बी सी सी यांच्या बरोबर नुकत्याच केलेल्या करारानुसार नागपूर व भंडारा जिल्ह्यातील उर्वरित पाच पर्यायी गावठाणातील 18 नागरी सुविधांची कामे व 64 पर्यायी गावठाणातील दर्जेदार पुनर्वसनांतर्गत करावयाची कामे एन बी सी सी यांच्यामार्फत करण्यात येणार आहेत. पाच पैकी चार गावांचे काम सुरू करण्यात आले आहे. यासाठी नागपूर जिल्ह्यातील 22अंदाजपत्रकांना आणि भंडारा जिल्ह्यातील 18 अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आय. एस. चहल यांनी दिली.
या बैठकीला महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटीलजलसंपदा मंत्री गिरीश महाजनऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेपुनर्वसन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मेधा गाडगीळजलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आय. एस. चहलभंडारा जिल्हाधिकारी सुहास दिवसेनागपूर जिल्हाधिकारी अश्विन मुद्‍गलगोसीखुर्द प्रकल्पाचे कार्यकारी संचालक ए. व्ही सुर्वे व स्थानिक आमदारलोकप्रतिनिधी व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पहा गोसीखुर्द गावाजवळ (तालुका पवनी) जिल्हा भंडारा येथे वैनगंगा नदीवर बांधकामाधीन आहे. महाराष्ट्रातील हा एकमेव राष्ट्रीय प्रकल्प असून यास केंद्र शासनाकडून 90% निधी प्राप्त होत आहे. पूर्व विदर्भातील हा सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प असून याद्वारे सिंचनपिण्यासाठी पाणी पुरवठाऔद्योगिक पाणी पुरवठामत्स्य व्यवसाय व जलविद्युत निर्मिती होणार आहे. या प्रकल्पामुळे पूर्व विदर्भातील नागपूरचंद्रपूर व भंडारा जिल्ह्यातील एकूण 1 लाख 90 हजार हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार असून त्यापासून 2 लाख 50 हजार 800हे. इतकी सिंचन क्षमता निर्माण होणार आहे.

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 04-09-2025

  जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपाच्या ४५ पदांसाठी रोजगार मेळावा     अमरावती, दि. ४ : जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्त्वावरील ४५ पदांवर न...