Monday, April 9, 2018


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व कार्य
विषयावर आजच्या जय महाराष्ट्रमध्ये मुलाखती

मुंबई, दि. 9 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व कार्य’ या विषयावर अनुसूचित जाती जमाती आयोग महाराष्ट्र राज्यविधी सदस्य सी. एल. थूल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अभ्यासक डॉ. संदेश वाघ यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. दि. 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून उद्या मंगळवार दि. १० जानेवारी रोजी संध्याकाळी 7.30 ते 8 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक नरेंद्र बेडेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.
भारताचे संविधानडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कायदेविषयक विचार, हिंदू कोडबिलडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारितापुणे करारडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य, अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे कामकाजयाबाबत सविस्तर माहिती श्री. थूल आणि डॉ. वाघ यांनी  जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून दिली आहे.
००००

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...