Posts

Showing posts from August, 2021

नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

Image
  नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर   अमरावती, दि. 30 : आरोग्य हिच खरी संपत्ती आहे. त्यामुळे नागरिकांनी निरोगी आयुष्याला प्राधान्य द्यावे. सर्वसामान्यांच्या सोयीसाठी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात येत आहे. या आरोग्य शिबिरात तपासणी करून   आरोग्यविषयक समस्या सोडवाव्यात. असे आवाहन पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले. आशियाई विकास बँक अर्थसहाय्य योजनेतील नेरपिंगळाई येथील   आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी केले. यावेळी नेरपिंगळाईच्या सरपंच सविता खोडस्कर, उपसरपंच मंगेश अडणे, मोर्शीचे तहसिलदार सिद्धार्थ मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्त्रीरोग तज्‍ज्ञ डॉ. सुषमा शेंदरे,   दर्यापूर विशेष प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता   विभावरी वैद्य, सहायक अभियंता प्रशांत सोळंके   उपस्थित होते. तिवसा   येथील   आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन तिवसा येथील कला व विज्ञान महाविद्यालयातील आरोग्य तपासणी    शिबिराचे उद्घाटन श्रीमती ठाकूर यांनी केले. जिल्हा परिषद सदस्य पूजा आमले, पंचायत समिती सभापती शिल्प

डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

Image
डेंग्यूचा चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करावा -          पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर   अमरावती, दि 30 : डेंग्यूचे निदान तात्काळ होऊन रुग्णांवर वेळेवर उपचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात डेंग्यू चाचणी परीक्षण प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेतून गतीने तपासणी करून रुग्णांना चाचणी अहवाल तात्काळ उपलब्ध करून द्यावे, असे     आवाहन पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले. येथील डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात आज डेंग्यूच्या चाचणी परीक्षण प्रयोगशाळेचे उद्घाटन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर चेतन गावंडे, मनपा विरोधी पक्ष नेता बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, जिल्हाधिकारी पवनीत कौर,     जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अनिल देशमुख, सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. प्रमोद भिसे, प्रयोगशाळा प्रमुख डॉ. मुक्ता देशमुख, तंत्रज्ञ अभिलाषा ठाकरे, डॉ. अर्चना निकम, डॉ. रंजना खोरगडे उपस्थित होते.          प्रयोगशाळेतील अद्ययावत

जलद लसीकरणासाठी वेगवान प्रक्रिया आवश्यक; दैनिक क्षमता वाढवा - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

Image
                                   पालकमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेचा आढावा   जलद लसीकरणासाठी वेगवान प्रक्रिया आवश्यक; दैनिक क्षमता वाढवा -           पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर   अमरावती, दि. 28  :  डेल्टा प्लसचे आढळलेले रुग्ण, तिस-या लाटेची संभाव्यता आदी बाबी लक्षात घेऊन यंत्रणा सुसज्ज करतानाच अधिकाधिक लसीकरण होणे आवश्यक आहे. जलद लसीकरणासाठी अधिक मनुष्यबळ उपलब्ध करून घेऊन लसीकरणाची दैनिक क्षमता वाढविण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.   कोविड प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंतराव वानखडे, जिल्हाधिकारी पवनीत कौर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, डॉ. रेवती साबळे आदी यावेळी उपस्थित होते.  पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, जिल्ह्यात लस उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत. तथापि, लसीकरणाचा विस्तार करणेही गरजेचे आहे. त्यासाठी अधिकाधिक मनुष्यबळ मिळवून प्रतिदिन

संवर्धनाबरोबरच पर्यटनवाढीच्या शक्यता लक्षात घेऊन विकास - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

Image
                   प्राचीन वैभवाच्या जतन- संवर्धनासाठी तरतूद                   संवर्धनाबरोबरच पर्यटनवाढीच्या शक्यता लक्षात घेऊन विकास -           पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर अमरावती, दि. 28 : प्राचीन व ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी शासनाने भरीव तरतूद केली आहे. त्याअंतर्गत   लासूर   येथील शिवमंदिर या प्राचीन वैभवाचे जतन व संवर्धन केले जाणार असून, पर्यटन विकासाच्या शक्यता लक्षात घेऊन या प्राचीन स्थळाचा विकास केला जाईल. या सर्व कामांसाठी राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाकडून आवश्यक परवानगी प्रक्रिया व इतर बाबींची पूर्तता करून घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.                  पर्यटन व विविध विकास आराखड्यांबाबत बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या.  आमदार बळवंतराव वानखडे, जिल्हाधिकारी पवनीत कौर, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, उपविभागीय अधिकारी नरेंद्र फुलझेले,  तहसीलदार योगेश देशमुख,  पुरातत्व विभागाचे  वरिष्ठ संवर्धन सहायक  हेमंत हुकरे  आणि इतर अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की

तिवसा नगरपंचायत प्रलंबित घरकुल निधी मंजूर पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा पाठपुरावा

Image
  तिवसा नगरपंचायत प्रलंबित घरकुल निधी मंजूर पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा पाठपुरावा      -  लवकरच निधी होणार प्राप्त - 482 घरकुलांचा प्रकल्प अहवालही मंजूर   अमरावती, दि. 28 : तिवसा नगरपंचायत क्षेत्रातील घरकुलांसाठीचा प्रलंबित निधी मिळण्यासाठी पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. हा निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला असून, लवकरच तो प्राप्त होऊन कामांना गती मिळेल. त्याचप्रमाणे,  ४८२ नवीन घरकुलांचा प्रकल्प अहवाल सुद्धा मंजूर करण्यात आला असून, लवकरच ही कामेही मार्गी लागतील.     तिवसा नगर पंचायत येथील पहिल्या प्रकल्प अहवालातील ९८ घरकूलांचा ३ आणि ४ था हप्ता गेल्या ८ महिन्यापासून प्रलंबित होता. पहिले दोन हप्ते वितरीत झाले होते. उर्वरित हप्ते बाकी असल्याने लाभार्थ्यांपुढे अडचण निर्माण झाली होती. हे लक्षात घेऊन पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी याबाबत शासनाकडे पाठपुरावा केला, तसेच म्हाडा प्रशासनाला पत्रही दिले, तसेच अधिका-यांशी चर्चा करून तत्काळ उर्वरित हप्त्याचा निधी देण्याचे निर्देश दिले. पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनानुसार माजी नगराध्यक्ष वैभव वानखडे यांनीही म

घरकुलांसाठी आवश्यक निधीबाबत तत्काळ माहिती सादर करा; शासनाकडे पाठपुरावा करू - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

Image
  घरकुलांसाठी आवश्यक निधीबाबत तत्काळ माहिती सादर करा; शासनाकडे पाठपुरावा करू -           पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर अमरावती, दि. २८ : जिल्ह्यातील सर्व शहरांत गरजूंना घरे मिळण्यासाठी शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकुल करतानाच आवास योजनेत घरकुल निर्मितीसाठी आवश्यक निधीचे प्रस्ताव तत्काळ द्यावेत. निधीअभावी ही कामे थांबता कामा नयेत. आपण स्वतः याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करून निधी मिळवून देऊ, अशी ग्वाही महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी दिले.     नगरविकास विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंतराव वानखडे, जिल्हाधिकारी पवनीत कौर, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, उपविभागीय अधिकारी नरेंद्र फुलझेले, सार्वजनिक बांधकाम मुख्य अभियंता अरुंधती शर्मा, नगरविकास प्रशासन अधिकारी गीता वंजारी आदी उपस्थित होते.   पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, जिल्ह्यातील विविध शहरांत आवास योजनेत शासकीय जमीनीवरील 2 हजार 555 अतिक्रमणे नियमानुकूल करण्यात आली आहेत. नगरपंचा

कोविडमुळे विधवा महिला, निराधार बालकांना ‘मिशन वात्सल्य’चा मायेचा आधार - महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

Image
  कोविडमुळे विधवा महिला ,  निराधार बालकांना  ‘ मिशन वात्सल्य ’ चा मायेचा आधार  महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर    काळजी नको ;  आता येणार  ' शासन आपल्या दारी '   अधिकारी-कर्मचारी घरी जाऊन घेणार शासकीय योजनांचे अर्ज      शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणार   सर्व तालुक्यात तालुकास्तरीय समन्वय समित्या   कायदेशीर ,  मालमत्तांमधील हक्क मिळवून देणार            मुंबई ,  दि. 28: कोविड-19 या संसर्गजन्य आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होवून अनाथ झालेल्या बालकांना व कुटूंबातील कर्त्या पुरुषाचे निधन होवून एकल किंवा विधवा झालेल्या महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी  ‘ शासन आपल्या दारी ’  या संकल्पनेवर आधारित  ‘ मिशन वात्सल्य ’  राबवण्यात येणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी जाहीर केले होते. त्यानुसार काल याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला. घरी जाऊन घेण्यात येणार योजनांचे अर्ज           या मिशननुसार गावपातळीवर तलाठी ,  ग्रामसेवक ,  प्राथमिक शिक्षक ,  अंगणवाडी सेविका तसेच शहरी  क्षेत्रातील वार्ड निहाय पथकामध्ये  वार्ड अधिकारी ,  तला

महत्वाच्या इमारतींचे फायर ऑडिट 'मिशनमोड'वर पूर्ण करा - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

Image
  केमिकल फॅक्टरीची आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न; पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांनीही केली पाहणी महत्वाच्या इमारतींचे फायर ऑडिट 'मिशनमोड'वर पूर्ण करा - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर             अमरावती, दि. २८ : येथील औद्योगिक वसाहतीतील नॅशनल पेस्टिसाईड अँड केमिकल्स या फॅक्टरीला काल मध्यरात्रीनंतर आग लागली. ही फॅक्टरी ऑक्सिजन प्लँटच्या बाजूला आहे. या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली व संबंधितांकडून सविस्तर माहिती घेतली. सर्व महत्वाच्या इमारतींचे फायर ऑडिट 'मिशन मोड'वर पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी यावेळी प्रशासनाला दिले.           जिल्हाधिकारी पवनीत कौर, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, तहसीलदार संतोष काकडे आदी यावेळी उपस्थित होते.           उद्योग, कारखाने, इमारती यांचे फायर ऑडिट करण्याबाबत यापूर्वी वेळोवेळी आदेशित करण्यात आले आहे. ती कार्यवाही मोहिम स्तरावर तत्काळ पूर्ण करावी. सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व महत्वाच्या इमारतीचे फायर ऑडिट पूर्ण होणे आवश्यक आहे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी याव

कृषीतज्ज्ञांनी पुढाकार घेऊन गावे दत्तक घ्यावीत - जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

Image
                           फळगळ रोखून संत्रा उत्पादन वाढण्यासाठी कृषीतज्ज्ञांनी पुढाकार घेऊन गावे दत्तक घ्यावीत                                                 -           जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू अमरावती, दि. 27 : संत्रा फळपीक जिल्ह्यातील महत्वाचे पीक आहे. संत्र्याची फळगळ थांबून जास्तीत जास्त उत्पादन मिळावे व फळगळीच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी कृषी संशोधकांनी चमू तयार करून गावे दत्तक घ्यावीत व शेतक-यांना परिपूर्ण मार्गदर्शन करावे, असे प्रतिपादन जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आज अचलपूर येथे केले.   डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, विस्तार शिक्षण संचालनालय व कृषी संशोधन केंद्रातर्फे अचलपूर येथे संत्रा फळगळ नियंत्रण व बीजोत्पादन कार्यशाळेच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले अध्यक्षस्थानी होते. कार्यकारी परिषद सदस्य मोरेश्वर वानखेडे, डॉ. अर्चना बारब्दे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राजेंद्र गाडे, संशोधन संचालक डॉ.विलास खर्चे, उद्यानविद्या अधिष्ठाता डॉ. प्रकाश नागरे, जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी विजय चवाळे उपस्थित होते.