सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयाला ‘ग्रीन चॅम्पियन’ पुरस्कार जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान


                                            

जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयाला ‘ग्रीन चॅम्पियन’ पुरस्कार

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान


अमरावती, दि. 12 : भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयांतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षण परिषदेव्दारा आयोजित स्वच्छ व हरित कॅम्पस स्पर्धेत 2020-21 या वर्षाचा पुरस्कार अमरावती जिल्ह्यातील सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयाला मिळाला आहे. जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या हस्ते हा पुरस्कार महाविद्यालयाच्या प्रतिनिधींना आज प्रदान करण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, माहिती तंत्रज्ञान विभागाचे अरुण रणवीर, मनिष फुलझेले, महात्मा गांधी राष्ट्रीय शिक्षा परिषदेचे तज्ज्ञ मार्गदर्शक डॉ. महेश चोपडे, मनोज परमार यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. खेरडे, डिन डॉ. पी. आर. मालासाने, प्रा. वाय. एस खांडेकर, नेचर क्लब प्रमुख श्रीमती डॉ.  के. व्ही. पवार, एनएसएस प्रमुख डॉ. वाय. एच. गुल्हाने इतर अधिकारी उपस्थित होते.

यावेळी महाविद्यालयाच्या प्रतिनिधींना स्वच्छता व हरित कॅम्पस विजेता प्रमाणपत्र जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

जिल्हाधिकारी श्रीमती कौर म्हणाल्या की, निरोगी व सुदृढ समाजाच्या निर्मितीत स्वच्छता ही अग्रस्थानी आहे. स्वच्छता ही सेवा असून महाविद्यालयाला मिळालेला पुरस्कार हा तेथील प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी तसेच स्वच्छता कर्मचारी आदींच्या श्रमाची फलश्रुती आहे, असे सांगून जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

महाविद्यालयाच्या स्वच्छता समितीने तेथील महाविद्यालयीन परिसर, वर्गखोल्या, उद्यान, जल व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, पॉलिथिन मुक्त कॅम्पस, सौर ऊर्जा व्यवस्थापन तसेच संपूर्ण कॅम्पसमध्ये वृक्षारोपण व त्याची जोपासना करुन परिसर हिरवागार केला आहे. परिसर स्वच्छता, वृक्षारोपणाच्या माध्यमातून हिरवळ व जल व कचरा व्यवस्थापन आदी महत्वपूर्ण बाबींच्या सुरळीत व्यवस्थापनामुळेच या महाविद्यालयाला पुरस्कार प्राप्त झाला आहे, असे डॉ. चोपडे यांनी यावेळी सांगितले.

 

00000



Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती