Saturday, August 14, 2021

जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण

 





जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण

अमरावती, दि. १५ : भारतीय स्वातंत्र्याच्या ७४ व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या हस्ते आज झाले.यावेळी राष्ट्रध्वज वंदन व राष्ट्रगीतानंतर जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. सहायक जिल्हाधिकारी मंदार पत्की,

अपर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, उपजिल्हाधिकारी मनीष गायकवाड, रणजीत भोसले, राम लंके, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे, तहसीलदार संतोष काकडे, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, नप प्रशासन अधिकारी गीता वंजारी, अधीक्षक उमेश खोडके, जिल्हा सूचना अधिकारी अरुण रणवीर, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, सहायक जिल्हा

सूचना अधिकारी मनीष फुलझेले, विधी अधिकारी नरेंद्र बोरा, अंबादास काकडे, डेव्हिड चव्हाण, अमित चेडे  आदी उपस्थित होते. गत वर्षात उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी यांना यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

०००

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...