कृषी विभागातर्फे शनिवारी जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव

             


             

                कृषी विभागातर्फे शनिवारी जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव

 

अमरावती, दि. 13 : कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या संकल्पनेतून रानभाज्यांचा महोत्सव प्रत्येक जिल्ह्यात 9 ते 15 ऑगस्टदरम्यान आयोजित करण्यात येत आहे. त्यानुसार अमरावती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय व ‘आत्मा’तर्फे जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव व प्रदर्शन शनिवारी (14 ऑगस्ट) वलगावच्या प्रेमकिशोर सिकची चॅरिटेबल ट्रस्टच्या इमारतीत होणार आहे.

महोत्सव व प्रदर्शन सकाळी 11 पासून दुपारी 4 पर्यंत चालेल. नागरिकांच्या आहारात रानभाज्या पोषणमूल्ये वाढविणा-या असून, त्यात अनेक खनिजे, निरनिराळी मूलद्रव्ये व उपयुक्त रासायनिक व औषधी गुणधर्म आढळतात. या रानभाज्यांची ओळख सर्वांना होण्याच्या उद्देशाने हा महोत्सव आयोजिण्यात आला आहे. यावेळी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ‘डीएसएओ’ विजय चव्हाळे व अधिकारी अनिल खर्चान यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती