Monday, August 23, 2021

एकलव्य अकादमीच्या गुणवंत खेळाडूंचा पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते गौरव

 







एकलव्य अकादमीच्या गुणवंत खेळाडूंचा पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते गौरव

जागतिक धनुर्विद्या स्पर्धेत यश मिळवलेल्या मंजिरी अलोणेचा गौरव

 

अमरावती, दि. २३ : पोलंड येथे झालेल्या जागतिक धनुर्विद्या स्पर्धेमध्ये यश मिळवणाऱ्या गुणवंत खेळाडूंचा गौरव महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते आज झाला.नांदगाव खंडेश्वर येथील एकलव्य क्रीडा अकादमीची खेळाडू मंजिरी मनोज अलोणे हिने पोलंड येथे झालेल्या जागतिक धनुर्विद्या स्पर्धेमध्ये ब्राँझ मेडल प्राप्त केल्यामुळे तिचा पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. आंतरराष्ट्रीय खेळाडू कु. साक्षी तोटे, एकलव्य गुरुकुलचे मुख्याध्यापक विलास मारोटकर, भारतीय संघाचे कोच अमर जाधव व शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त सदानंद जाधव गुरुजी यांनाही यावेळी गौरविण्यात आले.

पालकमंत्र्यांनी यावेळी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. एकलव्य क्रीडा अकादमीतर्फे यापुढेही असेच गुणवंत खेळाडू घडावेत व अमरावती जिल्हा, महाराष्ट्र व देशाचे नाव जागतिक स्तरावर अधिकाधिक  उज्ज्वल होवो, अशा शुभेच्छा पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केल्या.  

 


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 04-09-2025

  जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपाच्या ४५ पदांसाठी रोजगार मेळावा     अमरावती, दि. ४ : जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्त्वावरील ४५ पदांवर न...