Posts

Showing posts from July, 2020

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्राचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Image
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्राचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन आपत्ती व्यवस्थापन ही काळाची गरज -         पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर     अमरावती, दि. 31 : पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे, पुरामुळे नैसर्गिक आपदेचा प्रसंग ओढवतो. अशा नैसर्गिक आपत्तीत जिवितहानी व वित्तहानी होण्याची दाट शक्यता असते, त्यामुळे अशा नैसर्गिक आपत्तीचे पूर्व नियोजन करुन व्यवस्थापन करणे आता काळाची गरज झाली आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.   येथील राज्य राखीव पोलीस गट क्र. 9 येथे आज पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा आपत्ती व्यवस्थापण प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल, गटाचे समादेशक लोहीत मत्तानी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन केंद्राची चमू यावेळी उपस्थित होते.     श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, नैसर्गिक, मानवी आणि जैविक असे आपत्तीचे तीन प्रकार असून, या सर्व आपत्त

अनाथ लेकरांना कुटुंब मिळवून देणे पुण्याचे काम - ॲड. यशोमती ठाकूर

Image
'फॉस्टर केअर' अर्थात प्रतिपालकत्व योजनेची सुरुवात अनाथ लेकरांना कुटुंब मिळवून देणे पुण्याचे काम -           ॲड. यशोमती ठाकूर   ▪  प्रायोगिक स्वरूपात ५ जिल्ह्यात होणार अंमलबजावणी ▪  ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध   मुंबई, दि. ३१: एक मुलगी, आई अशा भूमिका मीदेखील बजावत आहे. त्यामुळे कुंटुंबाची, त्यांच्या प्रेमाची गरज याची जाणीव मला आहे. त्यामुळे अनाथ मुलांना कुटुंबाचे प्रेम मिळवून देऊ शकणारी प्रतीपालकत्व योजना क्रांतिकारी ठरणार असून अनाथ बालकांना घर मिळवून देण्याच्या कामाइतके मोठे पुण्य नाही, अशी भावना महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली.     महिला व बाल विकास विभाग अंतर्गत पुणे येथील महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण संस्थेच्यावतीने आयोजित तीन दिवसीय प्रतीपालकत्व प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप आणि महिला व बाल विकास विभागाच्या अधिनस्त बालगृहातील अनाथ बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना सुरक्षित कुंटुंब, घर मिळवून देणाऱ्या प्रतीपालकत्व (फॉस्टर केअर) योजनेची प्रायोगिक स्वरूपात सुरुवात आज ॲड. ठाकूर यांनी ऑनलाईन कार्यक्रमातून केली. यावेळी महिला व बाल विकास विभागाच

लक्षणे नसलेल्या इच्छूक कोरोनाबाधितांचे गृह विलगीकरणात उपचार - जिल्हाधिकारी शैलेश नवाल

Image
कोरोना प्रतिबंधक उपाययोजना लक्षणे नसलेल्या इच्छूक कोरोनाबाधितांचे गृह विलगीकरणात उपचार -      जिल्हाधिकारी शैलेश नवाल   अमरावती, दि. 30 :   इच्छूक कोरोनाबाधित रूग्णांच्या घरी विलगीकरणाची स्वतंत्र व्यवस्था असल्यास त्यांना गृह विलगीकरणासाठी परवानगी देण्यात येणार आहे. येत्या 1 ऑगस्टपासून ही प्रक्रिया राबविण्यात येईल, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे दिली.             जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलताना श्री. नवाल म्हणाले की, केंद्र शासनाने रुग्णांच्या गृह विलगीकरणासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातही इच्छूक रूग्णांना त्यांच्या घरीच विलगीकरणाची व्यवस्था असल्यास परवानगी देण्यात येईल. त्यासाठी किमान चार खोल्यांचे घर व त्यात दोन बाथरूम अटॅच्ड खोल्या असणे आवश्यक आहे जेणेकरून रूग्णाला   बाथरूमसह स्वतंत्र खोली राहण्यासाठी व उपचारासाठी वापरता येईल व इतर कुटुंबियांचीही सुरक्षितता जपली जाईल.             ते पुढे म्हणाले की, ही प्रक्रिया जिल्ह्यात आकार घेईपर्यंत ती टप्प्याटप्प्याने राबवली

महिलांबाबत गैरप्रकार खपवून घेणार नाही - महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

Image
मोदी हॉस्पिटलमधील गैरप्रकाराबाबत युवकाविरुद्ध गुन्हा दाखल कायद्याची जरब निर्माण करा महिलांबाबत गैरप्रकार खपवून घेणार नाही                   -           महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर             अमरावती, दि. 30 : मोदी हॉस्पिटलमध्ये घडलेला प्रकार अत्यंत घृणास्पद व निंदनीय असून सदर गुन्हेगारास कठोर शिक्षा मिळावी. सदर व्यक्तीविरुद्ध पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून, अटक करण्यात आली आहे. असा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. अशा समाजकंटकांवर कायद्याची जरब निर्माण करावी, असे स्पष्ट निर्देश राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.             येथील मोदी रुग्णालयात एका युवतीचा कोरोना चाचणीसाठी थ्रोट स्वॅब घेतल्यानंतर लॅब टेक्नीशियनने तिला अनावश्यक चाचणी करण्यास सांगून गैरवर्तणूक केली. त्यानंतर युवतीला आक्षेपार्ह संदेशही पाठवले. या अश्लाघ्य प्रकाराची तक्रार पिडीत मुलीने बडेनरा पोलीसात नोंदवली आहे. पालकमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली असून अशा प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी कायद्याची जरब निर्माण करण्याचे स्पष्

जिल्ह्यातील 2 लाख 69 हजार शेतकऱ्यांना लाभ - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

Image
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना लाभार्थ्यांच्या माहितीतील त्रुटी दुरुस्तीसाठी पाच ऑगस्टपर्यंत विशेष मोहिम जिल्ह्यातील 2 लाख 69 हजार शेतकऱ्यांना लाभ - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर   अमरावती, दि.29: ज्या शेतकऱ्यांना अद्याप प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळाला नाही त्यांच्यासाठी शासनाकडून येत्या पाच ऑगस्टपर्यंत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. त्यानुसार लाभार्थ्यांच्या माहितीतील त्रुटी दुरुस्ती करावी व नविन लाभार्थ्यांची नोंदणी करावी, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत.अमरावती जिल्ह्यात या योजनेत 3 लाख 14 हजार 598 खातेदारांची नोंदणी झाली आहे. पहिल्या हप्त्यासाठी वर्ग करण्यात आलेल्या खातेदारांची संख्या 2 लाख 91 हजार 258 आहे. योजनेत आतापर्यंत जिल्ह्यात 2 लाख 69 हजार 706 खातेदारांना लाभ देण्यात आला आहे.   जे शेतकरी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेपासून वंचित आहेत, त्यांना तो लाभ मिळवून देण्यासाठी शासनाकडून येत्या पाच ऑगस्टपर्यंत मोहिम हाती घेण्यात आली आहे. काही लाभार्थ्यांच्या माहितीमध्ये त्रुटी

पालकमंत्र्यांच्या हस्ते बेनोडा ग्रामपंचायत भवनाचे भूमिपूजन

Image
पालकमंत्र्यांच्या हस्ते बेनोडा ग्रामपंचायत भवनाचे भूमिपूजन पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी शासन कटिबद्ध              -     पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर   अमरावती, दि. 28 :   नागरी भागातच नव्हे, तर ग्रामीण भागातही विविध पायाभूत सुविधांच्या उभारणीतून विकासाला गती देण्यासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज बेनोडा येथे केले.              वरूड तालुक्यातील बेनोडा येथील नियोजित ग्रामपंचायत भवनाचे भूमिपूजन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार देवेंद्र भुयार, उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व नागरिक यावेळी उपस्थित होते.              पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की,    रस्ते, सार्वजनिक इमारती, पाणीपुरवठा व विविध पायाभूत सुविधा पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत. त्यासाठी जिल्ह्यात निधीची कमतरता पडू देणार नाही. जिल्ह्यातील अपूर्ण कामे पूर्णत्वास नेण्यासाठी वेळोवेळ

बेजबाबदार नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

Image
पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत वरुड येथे आढावा बैठक कडक नियंत्रणाचे निर्देश बेजबाबदार नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर   अमरावती, दि. 28 : कोरोना संकटकाळात दक्षतेचे पालन न करता बेजबाबदारपणे वागणाऱ्यांवर कठोर कारवाई करून शिस्त निर्माण करावी, असे स्पष्ट निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी वरुड येथे दिले. वरुड तालुक्यातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा पालकमंत्री यांनी वरुड न.प. सभागृहात घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार देवेंद्र भुयार, नगराध्यक्ष स्वाती आंडे, पंचायत समिती सभापती विक्रम ठाकरे यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.   शहर व तालुक्यातील आरोग्य यंत्रणा, उपाययोजना, विलगीकरण स्थिती आदी विविध बाबींचा आढावा पालकमंत्र्यांनी यावेळी घेतला.   पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, स्वच्छता व निर्जंतुकीकरणासाठी साबणाचे द्रावण फवारणी, सडा यांचा वापर करावा. नागरिकांनीही घरालगतचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी असे द्रावण फवारणे उपयुक्त ठरेल. यंत्रणेने तपासण्यांची संख्या वाढवावी व