व्हीएचएम इंडस्ट्रीजच्या कामगारांना फेब्रुवारी व मार्चचे वेतन अदा कामगार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या निर्देशानुसार कार्यवाही


 

अमरावती, दि. 3 : येथील व्हीएचएम इंडस्ट्रीज या कंपनीच्या कामगारांना फेब्रुवारी व मार्चचे वेतन न मिळाल्याच्या तक्रार लक्षात घेऊन कामगार बांधवांना त्वरित वेतन अदा करण्याचे निर्देश जलसंपदा, शालेय शिक्षण व कामगार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी दिले होते. त्यानुसार कामगारांना या दोन्ही महिन्याचे वेतन अदा करण्यात आले आहे, अशी माहिती कामगार उपायुक्त वि. रा. पाणबुडे यांनी दिली.  

या कंपनीतील कामगारांनी राज्यमंत्री श्री. कडू यांची भेट घेऊन माहे फेब्रुवारी 2020 व माहे मार्च, 2020 या महिन्याचे वेतन न मिळाल्याबाबत तक्रार व निवेदन दिले होते. त्यावर त्वरित कारवाई करण्याबाबतचे आदेश राज्यमंत्री महोदयांनी कामगार विभागाला दिले. त्यानुसार याबाबत अमरावती येथील सरकारी कामगार अधिकारी, यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. या कार्यालयाच्या मध्यस्थीने सदर आस्थापनेतर्फे माहे फेब्रुवारी, 2020 या महिन्याच्या देयापोटी 321 कामगारांना रू 10 लाख 78 हजार 74 रूपये व माहे मार्च 2020 या महिन्याच्या देयापोटी 467 कामगारांना 23 लाख 53 हजार 701 रूपये असे एकुण 34 लाख 31 हजार 775 रूपयांचे वाटप  या आस्थापनेतील कामगारांना  करण्यात आले.

लॉकडाऊनच्या कालावधीत थकित वेतनाबाबतची सुनावणी दिनांक 7 जुलै, 2020 रोजी ठेवण्यात आली आहे. याबाबतचा कामगार बांधवांची बाजू समजावून घेऊन त्यांना न्याय मिळवून द्यावा, असे निर्देश कामगार राज्यमंत्री श्री. कडू यांनी दिले.  

00000

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती