'आर्सेनिक अल्बम 30'च्या 50 हजार बाटल्या प्रशासनाकडे सुपुर्द जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मानले आभार

हिलर्स होमिओ वेल्फेअर असोसिएशनचा उपक्रम


'आर्सेनिक अल्बम 30'च्या 50 हजार बाटल्या प्रशासनाकडे सुपुर्द

जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मानले आभार

 

अमरावती, दि. 10 : येथील _'हिलर्स होमिओ वेल्फेअर असोसिएशन'तर्फे कोविड-19 प्रतिबंधासाठी नागरिकांना वाटण्यासाठी आयुष विभागाने निर्देशित केलेले आर्सेनिक अल्बम 30च्या सुमारे 50 हजार बाटल्या आज जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडे सुपुर्द करण्यात आल्या. _हे औषध सुमारे चार लाख लोकांना पुरेल_ एवढे असून, महापालिका यंत्रणेमार्फत वितरीत केले जाणार आहे.

        संस्थेचे कार्य कौतुकास्पद असून, अशा कठीण काळात समाजहितासाठी संस्थेने महत्वपूर्ण निर्णय घेतला व कृतीत आणला. हे औषध महापालिकेमार्फत नागरिकांपर्यंत वितरीत करण्यात येईल, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्यांचे आभार मानले. यावेळी हे औषध वितरणासाठी महापालिकेचे आयुक्त नरेंद्र वानखडे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. कमलकिशोर नावंदर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, संस्थेचे सदस्य उपस्थित होते.

         संस्थेतर्फे थॉयराईड आजाराबाबत जनजागृती व उपचार नियमितपणे केले जातात. आयुष मंत्रालयाने निदेशित केल्यानुसार आर्सेनिक अल्बम 30 हे औषध वितरीत करण्याचा निर्णय संस्थेने घेतला व सर्व सदस्यांनी त्याला मान्यता दिली. नागरिकांसाठी हे औषध प्रशासनाच्या सुपुर्द करताना आम्हाला आनंद होत असल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. नावंदर यांनी यावेळी सांगितले.

       संस्थेचे सचिव डॉ. संतोष राठी, समन्वयक डॉ. संदीप नाफडे, लेडी विंग चेअरपर्सन डॉ. कविता चिंचोळकर, डॉ. शरद जुनघरे, डॉ. राहूल कोवाळे, डॉ. योगेश जैस्वाल, डॉ. अतुल येलने, डॉ. संगीता जैस्वाल, डॉ. दिनेश तलन, डॉ. अमोल भटकर यांच्यासह संस्थेच्या सर्व सदस्यांचे प्रशासनाच्या वतीने आभार मानण्यात आले.

 

                                    00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती