अंशकालीन उमेदवारांना कंत्राटी स्वरुपात तत्काळ नेमणूका द्या - कामगार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

कौशल्य विकास व उद्योजकता विभाग आढावा बैठक




अंशकालीन 
 उमेदवारांना  कंत्राटी स्वरुपात तत्काळ नेमणूका द्या


                  -    कामगार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

 

www.mahaswyam.gov.in संकेतस्थळ उपलब्ध

अमरावती, दि. 20 : राज्यातील विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयाच्या आस्थापनेवर कार्यालयीन कामासाठी मनुष्यबळाची गरज भासल्यास बाह्ययंत्रणेच्या (आऊटसोर्सिंगव्दारे) माध्यमातून उमेदवाराची नेमणूक केली जाते. परंतू, अशी पध्दती अवलंबीतांना पदवीधर अंशकालीन उमेदवारांना सूट देऊन वैयक्तिकरित्या प्राधान्याने रिक्त पदांवर कंत्राटी स्वरुपात तत्काळ नेमणूक करण्यात याव्यात, असे निर्देश कामगार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडून यांनी आज येथे दिले.

येथील विभागीय आयुक्त कार्यालयात रिक्त पदांच्या अनुषंगाने अंशकालीन पदवीधरांच्या नेमणूका यासंदर्भात राज्यमंत्र्यांनी आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त पियूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे उपसंचालक प्रफुल्ल शेळके यांचेसह अन्य विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

श्री. कडू म्हणाले की, राज्य शासनाच्या शासकीय तसेच अधिपत्याखालील कार्यालयाच्या आस्थापनेवर बाह्ययंत्रणेव्दारे एखाद्या संस्था किंवा कंपनीसोबत कंत्राटी पध्दतीने उमेदवारांची नेमणूक करण्याचे शासनाचे धोरण आहे. परंतू, असे करतांना अंशकालीन उमेदवारांना नोकरी मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे. ही परिस्थिती टाळण्यासाठी तसेच पदवीधर अंशकालीन उमेदवारांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध होण्यासाठी त्यांना वयाच्या बाबतीत सूट देऊन वैयक्तिकरित्या प्राधान्याने नेमणूकी दिल्यास त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटेल प्रलंबित प्रश्न निकाली लागेल. यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने संकेतस्थळ विकसित केले असून त्यावरुन अंशकालीन उमेदवारांची यादी संबंधित विभागाला प्रापत करता येईल.

श्री. कडू म्हणाले की, ज्या शासकीय, निमशासकीय कार्यालयास बाह्ययंत्रणेव्दारे काम करण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता आहे, त्या कार्यालयाने कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या www.mahaswyam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करुन जिल्ह्यातील पात्र पदवीधर अंशकालीन उमेदवरांची यादी प्राप्त करुन घ्यावी. त्यानंतर विभागाला किंवा कार्यालयाला लागणाऱ्या आवश्यक बाबींचा अटी, शर्ती, सेवेचे उत्तरदायित्त आदी नमूद असलेला करार संबंधित अंशकालीन उमेदवारांसोबत करुन घ्यावा. करार पध्दतीने कंत्राटी स्वरुपात असणारी नियुक्ती संदर्भात सर्व खुलासे उमेदवारांना आधीच करुन द्यावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रत्येक शासकीय कार्यालयातील रिक्त पदांचा विभागनिहाय आढावा राज्यमंत्र्यांनी घेतला. जिल्ह्यात किती आस्थापनेवर अंशकालीन उमेदवार नियुक्ती दिल्या आहेत. आणखी किती अंशकालीन बेरोजगार आहेत याविषयीही त्यांनी माहिती जाणून घेतली.  कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे उपसंचालक श्री शेळके यांनी महास्वयंम पोर्टल विषयी सविस्तर माहिती उपस्थितांना करुन दिली.

 

0000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती