जिल्हाधिका-यांनी घेतला कर्जमुक्ती योजनेचा आढावा



आधार प्रमाणीकरणाला गती देण्यासाठी गावनिहाय आढावा घ्यावा

-          जिल्हाधिकारी शैलेश नवाल         

अमरावती, दि. 7 : महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ति योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना कर्जवितरणाचा लाभ मिळवून देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे दिले.योजनेचा आढावा जिल्हाधिका-यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक जे. के. झा यांच्यासह बँक प्रतिनिधी उपस्थित होते.

            जिल्हाधिकारी श्री. नवाल म्हणाले की, अद्यापपर्यंत 90 हजार खातेदारांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. आधार प्रमाणीकरण झालेल्या खात्याचा निधी शासनाकडून बँकांना मिळण्यास सुरुवात झाली आहे. उर्वरित 27 हजार खातेदारांचे प्रमाणीकरण करण्यासाठी गावनिहाय आढावा घ्यावा व आधार प्रमाणीकरण तत्काळ पूर्ण करावे.

            योजनेत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला 107 कोटी, स्टेट बँक ऑफ इंडियाला 66 कोटी, सेंट्रल बँक ऑफ इंडियाला 46.50 कोटी, बँक ऑफ महाराष्ट्रला 60 कोटी, युनियन बँकेला 11 कोटी, पंजाब नॅशनल बँकेला 3 कोटी, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेला 2.18 कोटी असा निधी प्राप्त झाला आहे. तसेच इतर बँकांचा निधी सुद्धा प्राप्त होत आहे. ज्या बँकांना कर्जमुक्तीबाबत निधी प्राप्त झाला, त्यांचे खाते निरंक करून खातेदारांना कर्जवाटप करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी सर्व बँकांच्या नोडल अधिका-यांना दिले.

00000

 


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती