Posts

Showing posts from July, 2017
Image
मी मुख्यमंत्री बोलतोय: भाग दुसरा यांत्रिकी करणातून उत्पादकता वाढ आणि शेतीतील गुंतवणूकीवर भर अधिक सवलतीच्या दराने पीक कर्ज देण्याचा विचार -          मुख्यमंत्र्यांची ग्वाही ● शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी 15 जिल्ह्यांत 4000 कोटी रुपयांचा प्रकल्प   ● यांत्रिकीकरणातून उत्पादनवाढीसाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांचे क्लस्टर करणार ● ओटीएसमुळे काळ्या यादीत गेलेल्यांनाही नव्याने पीक कर्ज ● 100 टक्के शेतीवर उपजिवीका असलेल्यांनाच कर्जमाफीचा लाभ ● शेतमालाला बाजारपेठेशी जोडण्यासाठी बृहद योजना तयार करणार ● 2009 पासूनच्या थकित कर्जाचाही योजनेत समावेश   ● नियमित कर्ज भरणाऱ्यांनाही लाभ देणारे महाराष्ट्र पहिले राज्य ● बँकिंग व्यवस्था टिकण्यासाठी कर्जफेड करावी ● कडधान्य नियमनमुक्तीत आणण्याचे विचाराधीन ● हमी भाव कमी त्याला कारण शेतीतील उत्पादकता   कमी   मुंबई दि. 16: शेतकरी बांधवांना एक लाखांपर्यंत शून्य टक्के दराने तर एक ते तीन लाखांपर्यंत दोन टक्के दराने शेतीसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. यापेक्षा अधिक सवलतीच्या दराने कर्ज देता यावे यासाठी नविन योजना विचाराधीन आहे
Image
अमरावतीला लवकरच शासकीय वैद्यकीय महाविदयालय मिळेल                          -पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील अमरावती  येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय देण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक पालकमंत्र्यांची  मुख्यमंत्र्यांसह चर्चा अमरावती, दि. 7  :  अमरावतीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सकारात्मक असून लवकरच या संदर्भात बैठक आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती  जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी दिली.  पालकमंत्री श्री. पोटे- पाटील यांनी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी शासकीय वैदयकीय महाविद्यालयाबाबत अनुकुलता दर्शवली.  अमरावती हे महसूली विभागाचे ठिकाण असूनही अमरावतीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. अमरावतीच्या तुलनेत छोट्या असलेल्या अकोला, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर या शहरांत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे. हे लक्षात घेऊन येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, अशी नागरिकांची मागणी आहे, असे श्री. पोटे-पाटील यांनी चर्चेत सांगितले. त्यावेळी या मागणीला मुख्यमंत्र्
Image
चार कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा अमरावतीत वनमंत्र्यांच्या उपस्थितीत समारोप आता एकच लक्ष्य- 13 कोटी वृक्ष वनमंत्री सुधीर मुनगंटीवार अमरावती, दि. 7 : महाराष्ट्रातील जनतेने वृक्षलागवड मोहिमेत सहभागी होत ४ कोटींच्या उद्दिष्ट्याहून अधिक झाडांची लागवड यशस्वी करुन दाखवली. राज्यातील वनक्षेत्राची व्याप्ती वाढविण्याच्या हेतूने वनविभागाने पुढील वर्षासाठी 13 कोटी वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट निश्चित केले असून त्यासाठी सर्वांनी सज्ज व्हावे, असे प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले.  राज्यभरात वृक्षलागवड मोहिमेत सुमारे 5 कोटी झाडांची लागवड करण्यात आली. या मोहिमेचा समारोप आज अमरावतीत झाला. यानिमित्त वडाळी बांबू उद्यानातील  निसर्ग निवर्चन केंद्र व ‘ऑक्सिजन पार्क’चे उद्घाटनही वनमंत्र्यांच्या हस्ते झाले. पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील, खासदार आनंदराव अडसूळ, आमदार डॉ. सुनील देशमुख, आमदार डॉ. अनिल बोंडे, महापौर संजय नरवणे, उपमहापौर संध्याताई टिकले, विभागीय आयुक्त डॉ. पीयुष सिंह, मुख्य वनसंरक्षक प्रवीण चौहान, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण