Posts

Showing posts from October, 2022

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत अधिकाधिक प्रस्ताव मंजूर करा - विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे

Image
  प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत अधिकाधिक प्रस्ताव मंजूर करा -            विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे अमरावती, दि. 21 : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत अधिकाधिक प्रस्तावांना मंजुरी देऊन प्रकल्प उभे राहण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी येथे दिले. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत खरेदीदार- विक्रेता मेळावा येथील बचतभवनात बुधवारी झाला. त्याचे उद्घाटन करताना डॉ. पांढरपट्टे बोलत होते. जिल्हाधिकारी पवनीत कौर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान, योजनेचे राज्य नोडल अधिकारी सुभाष नागर, स्मार्ट प्रकल्पाचे नोडल अधिकारी राहूल सातपुते, ‘आत्मा’च्या प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक जितेंद्र झा, महिला आर्थिक विकास महामंडळाचे सुनील सोसे, संदीप चंदनशिवे, गजाजन देशमुख आदी उपस्थित होते.   खरेदीदार व विक्रेते एकाचठिकाणी आल्याने उत्पादन दर्जा, ग्राहक पसंती, मूल्य आदींबाबत विचारांचे आदान-प्रदान होते. त्यामुळे अशा उपक्रमांत सातत्य ठेवावे जेणेकरून उत्पादने अधिक दर्ज

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत प्रोत्साहनपर रक्कम जमा करण्यास प्रारंभ अमरावती येथे 55 शेतकरी बांधवांचे प्रातिनिधीक स्वरूपात स्वागत

Image
  महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत प्रोत्साहनपर रक्कम जमा करण्यास प्रारंभ अमरावती येथे 55 शेतकरी बांधवांचे प्रातिनिधीक स्वरूपात स्वागत   अमरावती, दि. २०: नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत ५० हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम जमा करण्याचा शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे थेट प्रसारण नियोजनभवनात करण्यात येऊन प्रातिनिधीक स्वरूपात अमरावती जिल्ह्यातील 55 शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यात रकमा जमा होऊन या सर्वांचे स्वागत जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.   जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये ही कार्यवाही गतीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिले आहेत. त्यानुसार मोठ्या प्रमाणावर खात्यांमध्ये रकमा जमा होण्यास आरंभ झाला आहे.     शासनातर्फे आज एकाच वेळी राज्यातील ६ लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे २५०० कोटी रुपये जमा करण्यात आले. अशा प्रकारे एकाचवेळी थेट खात्यात रक्कम जमा करणारे महाराष्ट्र पहिले राज्य असल्याचे मुख्यमंत्री श्री

हृदयविकाराबाबत पूर्वकल्पना देणारा स्टेथॅस्कोप; अमरावतीच्या युवकाचे संशोधन महाराष्ट्र स्टार्टअप कार्यक्रमात कुशकुमार ठाकरे राज्यात सर्वप्रथम

Image
  हृदयविकाराबाबत पूर्वकल्पना देणारा स्टेथॅस्कोप; अमरावतीच्या युवकाचे संशोधन महाराष्ट्र स्टार्टअप कार्यक्रमात कुशकुमार ठाकरे राज्यात सर्वप्रथम   अमरावती, दि. 20 : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाद्वारे महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता कार्यक्रमात अमरावतीचा कुशकुमार मनोहर ठाकरे हा युवक आरोग्य क्षेत्रातील प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. हृदयविकाराबाबत कल्पना देणारे ‘पर क्ल्यू’ हे स्टेथॅस्कोपसारखे साधन कुशकुमार याने तयार केले असून, या शोधाबद्दल त्याला राज्यस्तरावरील एक लक्ष रूपयांचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवनात समारंभपूर्वक पुरस्कार कुशकुमार यांना प्रदान करण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रधान सचिव मनिषा वर्मा,    ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर   व आयुक्त डॉ. रामास्वामी आदी उपस्थित होते. राज्यस्तरावर 21 उमेदवारांची निवड करण्यात आली. त्यात   कुशकुमार   यांना   आरोग्यहेल्थकेअर   सेक्टरमध्ये प्रथम पुरस्कार देवून राज्यपाल यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.    कुशकुमार हा अमरावतीच्या शासकीय औषधनिर्माणशा

ओबीसी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ घ्यावा

  ओबीसी  विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ घ्यावा   अमरावती ,  दि.  17:  इ तर मागास प्रवर्गातील  विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ घ्यावा ,  असे आवाहन इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक चंद्रशेखर श्रीखंडे यांनी केले. राज्य ,  देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या इमाव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी बँकेमार्फत मंजूर केलेल्या रूपये  20  लक्षपर्यंत कर्ज र क मेवरील व्याज परतावा महामंडळाकडून वितरीत केला जाईल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक ,  आर्थिक    दृष्ट्या सक्षम करणे व त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे हा योजनेचा उद्देश आहे. लाभार्थींच्या पात्रतेच्या अटी व शर्ती          अर्जदाराचे वय  17  ते  30  वर्षे असावे व तो इमाव प्रवर्गातील ,  महाराष्ट्राचा रहिवासी असावा. अर्जदाराची  कौटुंबिक  वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण व शहरी भागाकरिता रूपये  8  लक्ष पर्यंत असावी. अर्जदार इयत्ता  12  वी  60  टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा तसेच पदवीच्या व्दितीय वर्षे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणा

मानसिक आरोग्य पंधरवड्यानिमित्त रॅलीद्वारे जनजागृती

  मानसिक आरोग्य पंधरवड्यानिमित्त रॅलीद्वारे जनजागृती          अमरावती, दि. 17 : जागतिक मानसिक आरोग्य पंधरवड्यानिमित्त आरोग्य विभागातर्फे शहरात रॅली काढून जनजागृती करण्यात आली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांनी हिरवी झेंडी दाखवून जिल्हा रूग्णालयातून रॅलीची सुरूवात केली. नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींनी त्यात सहभाग घेतला.  रॅलीला अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे, डॉ. अमोल गुल्हाने, डॉ. स्वाती सोनोने, प्रमोद भक्ते, भावना पुरोहित, सुनील कळतकर, श्रीमती सारा उमर, सायली डंभे, सचिन टवलारे, श्रध्दा हिरकंचे, विधूत पापळकर, शुभम झळके, निलेश मते, लोकेश पवार, श्रीमती अनुष्का ठाकरे, श्याम खोडवे, रवि गाढवे, स्पूर्ती डाखोडे, वैष्णवी सकरवार, दीक्षा रामटेके, अनुजा पाथरकर, सिमरण पठाण, दिपाली कडू, संदया मालधुरे, स्वाती चिंचोले, प्रीती चव्हाण, मुगल मॅडम, सरस्वती नर्सिंग विद्यालयाच्या विद्यार्थी यांच्या सह रूग्णालयीन कर्मचारी, अधिकारी, रूग्णाचे नातेवाईक, नर्सिंग कॉलेज प्राध्यापक उपस्थित होते. 00000

सर्व विभागांनी समन्वयाने जलशक्ती अभियान यशस्वी करावे

Image
  ‘कॅच द रेन’ सर्व विभागांनी समन्वयाने जलशक्ती अभियान यशस्वी करावे अमरावती, दि. 17 - जलशक्ती अभियानातून जलपुनर्भरण व जलस्त्रोतांचे संवर्धन करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन अभियानाचे संचालक विश्वजीत कुमार यांनी केले. अभियानाच्या अंमलबजावणीबाबत आढावा घेण्यासाठी संचालक अमरावती दौ-यावर आहेत. त्यानिमित्त त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन विविध विभागप्रमुखांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी पवनीत कौर, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा व अनेक अधिकारी उपस्थित होते. उपक्रमात ग्रामपंचायतींचा सहभाग मिळविणे आवश्यक आहे. पाण्याचे दुर्भिक्ष दूर करण्यासाठी जलपुनर्भरण व जलस्त्रोतांचे संवर्धन गरजेचे असून, सर्व विभागांनी, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी विविध उपक्रमातून अभियान यशस्वी करावे, असे आवाहन विश्वजीत कुमार यांनी केले. जिल्हाधिकारी श्रीमती कौर, श्री. पंडा यांनीही मनोगत व्यक्त केले. संचालक श्री. कुमार हे उद्या कोलकास, वडाळी, चिरोडी आदी ठिकाणी भेट देऊन तेथील कामांची पाहणी करणार आहेत. ०००

मधुरा, पुर्वशा व सांजली ला राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त

  मधुरा, पुर्वशा व सांजली ला राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त         अमरावती,दि. 13 : गुजरात येथे आयोजित 36 व्या राष्ट्रीय स्पर्धेत एकुण 36 क्रीडा प्रकारात महाराष्ट्र राज्याने सहभागी होवून 140 पदके प्राप्त करून महाराष्ट्र तालीकेमध्ये द्वितीय स्थान मिळविलेले आहे. या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये अमरावती येथील जलतरण खेळाडू सांजली राजेंद्र वानखडे तर धनुर्विद्या खेळाडू पुर्वशा शेंडे व मधुरा धामणगावकर यांनी 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करतांना सुवर्ण पदक प्राप्त केले. सांजली वानखडे या खेळाडूने जलतरण या क्रीडा प्रकारात वॉटरपोलो या बाबीमध्ये सुवर्णा पदक प्राप्त केले आहे. यापुर्वी सुध्दा सांजली वानखडे या खेळाडूने 5 वेळेस राष्ट्रीय स्पर्धेत तर 2 वेळा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 8 वी आशियन एज ग्रुप बॅकॉक येथे संपन्न झालेल्या स्पर्धेत सहभागी झालेली होती. तसेच साऊथ ऐशियन जलतरण स्पर्धा श्रीलंका येथे झालेल्या स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केलेले होते. सांजली ही खेळाडू नियमितपणे श्री. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे जलतरण तलावावर नियमितपणे सराव करीत असते. तिला प्रमुख मार्गदर्शक

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना लाभार्थ्याला 2 लाखाचा धनादेश वितरीत

Image
  प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना लाभार्थ्याला 2 लाखाचा धनादेश वितरीत   अमरावती, दि. 13 :  प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही मुदत स्वरुपाची विमा योजना आहे. कुटूंबातील कर्त्या व्यक्तीच्या मृत्यूपश्चात कुटूंबियांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागु नये यासाठी ही योजना राबविण्यात येते. त्यात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातुन नुकतेच पत्निचा आधार गमावलेल्या लाभार्थ्याला या योजनेअंतर्गत आर्थिक लाभ मिळवून देण्यात आला. रायपुरच्या पांढरी येथील गजानन दवंगे यांना त्यांच्या पत्नि अलका दवंगे यांच्या मृत्यूपश्चात 2 लाख रुपये विम्याची रक्कम या योजनेअंतर्गत प्रदान करण्यात आली. श्री दवंगे वार्षिक 456 रुपये हफ्ता अदा करत होते. त्यांच्या विम्याची रक्कम दोन लाख रुपये असुन धनादेश स्वरुपात देण्यात आली. स्टेंट बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक संजोग भागवतकर यांनी श्री दवंगे यांना 2 लाख रुपयांचा धनादेश वितरीत केला. यावेळी सहायक महाप्रबंधक प्रवीणकुमार, मुख्य प्रबंधक लीलाधर नेवारे, प्रबंधक अमोल चावरे, कौस्तूभ राऊत, मीनाक्षी अबरुक आदी उपस्थित होते. या योजनेअंतर्गत विमा धारकांना दरवर्षी 330 रुपये किंवा त्याहुन अध

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी -जिल्हाधिकारी पवनीत कौर

Image
                          महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी -जिल्हाधिकारी पवनीत कौर   अमरावती दि. 13 : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना ही महत्त्वाकांक्षी योजना शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे . या योजनेच्या 16 हजार 193 लाभार्थ्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यासाठी लाभार्थ्यांनी त्वरित आपले आधार प्रमाणीकरण करून घ्यावे,असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे .             बँकांनी योजनेच्या पोर्टलवर अपलोड केलेल्या माहितीचे ऑनलाइन प्रणालीद्वारे संस्करण करून पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर केली आहे. या याद्या संबंधित ग्रामपंचायत कार्यालय, विविध कार्यकारी संस्था कार्यालय , संबंधित बँक शाखा, तहसीलदार कार्यालय , सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालय या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.             पात्र लाभार्थ्यांच्या यादीमध्ये समाविष्ट असणाऱ्या लाभार्थ्यांनी आपल्या जवळच्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ येथे भेट देऊन आपल्या विशिष्ट क्रमांकाच

जिल्हा उद्योग केंद्रामार्फत जिल्हा पुरस्कार योजनेसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज आमंत्रित

  जिल्हा उद्योग केंद्रामार्फत जिल्हा पुरस्कार योजनेसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज आमंत्रित   अमरावती, दि. 11 (जिमाका) : उद्योग संचालनालयामार्फत लघु उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा पुरस्कार योजना 2022 साठी पात्र उद्योजकांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी पात्र उद्योजकांनी 31 ऑक्टोबरपूर्वी जिल्हा उद्योग केंद्रात अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापकांनी केले आहे. लघु उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे. अर्जाचा विहित नमुना महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, अमरावती यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत विनामुल्य उपलब्ध आहे. जिल्हा पुरस्कार योजनेत सहभागी होण्यासाठी लघु उद्योजकांनी काही अटींची पुर्तता करणे आवश्यक आहे. यानुसार लघु उद्योग घटक हा जिल्हा उद्योग केंद्रात 1 जानेवारी 2019 पुर्वी स्थायी नोंदणी / उद्योग आधार नोंदणी झालेला असावा. मागील तीन वर्षात सलग उत्पादन करणारे लघु उद्योग घटक या योजनेसाठी पात्र ठरतील. उद्योग घटक कुठल्याही वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीत एकदिवसीय बदल

  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीत एकदिवसीय बदल   अमरावती दि. 11 (जिमाका) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा 54 वा पुण्यतिथी महोत्सव शुक्रवार दि. 14 ऑक्टोबर 2022 रोजी मोझरी येथील गुरुदेव नगर येथे साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त दरवर्षीप्रमाणे मौन श्रध्दांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी सुमारे एक ते दीड लाख भक्तगण समाधीस्थळी जमतात. या कार्यक्रमादरम्यान होणारी गर्दी पाहता कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील वाहतुक व्यवस्थेत एकदिवसीय बदल करण्यात आला आहे. यानुसार अमरावतीकडून तिवसा तालुक्यातील मोझरी - गुरुदेव नगर मार्गे नागपूरकडे जाणारी वाहतूक (एसटी बसेस, रुग्णवाहिका व अग्निशमन वाहन वगळून) नांदगाव पेठ पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून मोर्शीमार्गे नागपूरकडे वळविण्यात येत आहे.             नागपूरकडून अमरावतीकडे येणारी वाहतूक (एसटी बसेस, रुग्णवाहिका व अग्निशमन वाहन वगळून) तिवसा शहरातील पंचवटी चौकातून कुऱ्हा मार्गे अमरावतीकडे वळविण्यात येत आहे. ही वाहतूक व्यवस्था दि. 1

तात्पुरते फटाका दुकानांना परवाना देण्यासाठी नियमावली जाहिर

  तात्पुरते फटाका दुकानांना परवाना देण्यासाठी नियमावली जाहिर   अमरावती, दि. 11 (जिमाका) : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर फटाके दुकानांसाठी तात्पुरता परवाना देण्याचे अधिकार उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. विस्फोटक अधिनियम व नियमांचे पालन करुनच परवाने वितरित करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले आहेत. त्यानुसार तात्पुरते फटाके दुकाने यांचेकडील दुकानांमध्ये फटाके ठेवण्यासाठी लाकडी साहित्य तसेच कापडी पडद्यांचा वापर करण्यात येऊ नये. फटाके दुकानांमध्ये सुरक्षित अंतरावर ठेवावी. जेणेकरुन आग लागण्याच्या दुर्घटनांवर वेळीच प्रतिबंध करता येईल. फटाके सुरक्षित आणि ज्ज्वलनशील नसलेल्या सामग्रीच्या शेडमध्ये ठेवण्यात यावे. फटाके विक्रीसाठी असलेली तात्पुरती दुकाने ही एकमेकांपासून तीन मीटर अंतरावर आणि संरक्षित ठिकाणांपासून 50 मीटर अंतरावर राहतील, याची दक्षता घ्यावी. फटाके विक्रीसाठी असलेली तात्पुरती दुकाने समोरासमोर लावण्यात येऊ नये. तात्पुरते फटाके दुकानांमध्ये प्रकाशासाठी कोणत्याही प्रकारचे तेल दिवे, गॅस दिवे अथवा उघडे असलेले विद्युत दिवे लावण्यात येऊ नये. जर कोणत्याही विद्युत वाहिन

सर्व आस्थापनांनी ई-आर 1 विवरण सादर करावे

  सर्व आस्थापनांनी ई-आर 1 विवरण सादर करावे            अमरावती, दि. 10 : कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता आयुक्तालय यांच्या कडून पुरविण्यात येणाऱ्या रोजगार विषयक सर्व सेवा आता ऑनलाईन करण्यात आलेल्या आहेत. या सुविधा ऑनलाईन मिळणार असून त्यासाठी  www.rojgar.mahaswayam.gov.in  हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. तसेच उद्योजक / आस्थापना यांनी सेवायोजना कार्यालय (रिक्त पदे अधिसूचित करण्याची सक्ती करणार) कायदा 1959 व नियमावली 1960 कलम 5 (2) अन्वये त्रैमासिक ई- आर 1 ऑनलाईन सादर करणे बंधनकारक आहे.  सप्टेंबर 2022 अखेर संपणाऱ्या त्रैमासिक करिता ई- आर 1 या प्रपत्राची माहिती वरील संकेतस्थळावर सर्व शासकीय,निमशासकीय,खाजगी उद्योजक,आस्थापना यांनी त्यांचे युजर आयडी व पासवर्डच्या माध्यमातून लॉगिन करून ऑनलाइन सादर करावयाची आहे. व त्याबाबतचे प्रमाणपत्र संकेतस्थळावरून प्राप्त करून घ्यावयाचे आहे. ऑनलाइन ई- आर 1 सादर करताना काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा दूरध्वनी क्र. 0721- 2566066 या क्रमांकावर संपर्क साधावा. ई आर 1 सादर करण्याची

बेरोजगार युवक युवतींना नामांकित कंपनीमध्ये नोकरीची सुवर्ण संधी

  बेरोजगार युवक युवतींना नामांकित कंपनीमध्ये नोकरीची सुवर्ण संधी अमरावती, दि. 10 (जिमाका) : सुशिक्षित उमेवारांना शासकीय नोकरीच्या पुरेशा संधी उपलब्ध नसल्यामुळे खाजगी क्षेत्रात असलेल्या रोजगाराच्या संधीचा शोध घेऊन बेरोजगारांना त्या उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती व शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, गाडगे नगर, व्ही.एम.व्ही. रोड, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींसाठी महाराष्ट्र स्टार्ट अप, रोजगार व उद्योजकता सप्ताह निमित्त पंडीत दिनदयाल उपाध्याय ऑफलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन शनिवार दि. 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, गाडगे नगर, व्ही.एम.व्ही. रोड, अमरावती येथे करण्यात आले आहे. या मेळाव्यामध्ये उमेदवारांची मुलाखतीव्दारे प्राथमिक निवड होणार असून अंदाजित 1094 पदे उपलबध आहेत. सदर मेळाव्यामध्ये लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, अमरावती या उद्योजक कंपनीसाठी इन्शुरन्स ॲडव्हायझर एकुण 100 पदे स्त्री/पुरुषकरीता उपलब्ध्य असून शैक्षणिक पात्रता एस.एस.सी. व वयोमर्यादा 18 त

संत्रा फळबागधारकांना सहभागासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत

  संत्रा फळबागधारकांना सहभागासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत   आंबिया बहारासाठी फळपीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन अमरावती, दि. 10 - विभागातील पाचही जिल्ह्यांत आंबिया बहारासाठी पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना राबविण्यात येत आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी बांधवांसाठी ही योजना ऐच्छिक आहे. नुकसानीच्या परिस्थितीत आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी अधिकाधिक शेतकरी बांधवांनी योजनेत सहभाग घेण्याचे आवाहन कृषी सहसंचालक किसनराव मुळे यांनी केले आहे. यंदा आंबिया बहारासाठी संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष, प्रायोगिक तत्वावर स्ट्रॉबेरी व पपई या नऊ फळपीकांसाठी विमा योजना लागू आहे. फळपीकासाठी २० हेक्टरहून अधिक उत्पादनक्षम क्षेत्र असलेल्या महसूल मंडळांना अधिसूचित करून ही योजना राबवली जाते. केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षण लागू होते. त्यानुसार फळपिकाचे उत्पादनक्षम वय संत्रा व मोसंबी पीकाचे ३ वर्ष, डाळिंब व द्राक्ष पिकाचे २ वर्ष व आंबा पिकाचे ५ वर्ष असणे आवश्यक आहे.  अमरावती, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यासाठी  रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी, अकोला जिल्ह्यासाठी एचडीएफसी एर्गो ज

अनुदान तत्वावर मिनी ट्रॅक्टर मिळण्यासाठी गटांनी अर्ज करण्याचे आवाहन अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांसाठी योजना

अनुदान तत्वावर मिनी ट्रॅक्टर मिळण्यासाठी गटांनी अर्ज करण्याचे आवाहन अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांसाठी योजना अमरावती, दि. 10 - अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या बचत गटांना अनुदान तत्वावर  साडेतीन लाख रू. मर्यादेत किमान 9 ते 18 अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व रोटाव्हेटर, ट्रेलर मिळण्यासाठी समाजकल्याण कार्यालयाकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. योजनेत 90 टक्के शासकीय अनुदान व 10 टक्के स्वयंसहायता बचत गटाचा हिस्सा अशी तरतूद आहे. बचत गटातील किमान 80 टक्के सदस्य, तसेच अध्यक्ष, सचिव अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील असावेत,  गटातील सदस्य महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असावेत.  मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांची खरेदी मर्यादा साडेतीन लाख रू. असेल. या मर्यादेच्या रकमेच्या 10 टक्के (35 हजार रू.)  स्वहिस्सा गटाने भरल्यावरच उर्वरित 90 टक्के हिस्सा अर्थात कमाल 3.15 लाख रू. शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील. प्राप्त अर्जांचा आढावा घेऊन लॉटरी पद्धतीने सोडत होईल.  यापूर्वी पॉवर टिलरचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.  इच्छूक गटांनी दि. 20 ऑक्टोबरपूर्वी सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, डॉ