Friday, October 14, 2022

मधुरा, पुर्वशा व सांजली ला राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त

 मधुरा, पुर्वशा व सांजली ला राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त

       अमरावती,दि. 13 : गुजरात येथे आयोजित 36 व्या राष्ट्रीय स्पर्धेत एकुण 36 क्रीडा प्रकारात महाराष्ट्र राज्याने सहभागी होवून 140 पदके प्राप्त करून महाराष्ट्र तालीकेमध्ये द्वितीय स्थान मिळविलेले आहे. या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये अमरावती येथील जलतरण खेळाडू सांजली राजेंद्र वानखडे तर धनुर्विद्या खेळाडू पुर्वशा शेंडे व मधुरा धामणगावकर यांनी 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करतांना सुवर्ण पदक प्राप्त केले. सांजली वानखडे या खेळाडूने जलतरण या क्रीडा प्रकारात वॉटरपोलो या बाबीमध्ये सुवर्णा पदक प्राप्त केले आहे. यापुर्वी सुध्दा सांजली वानखडे या खेळाडूने 5 वेळेस राष्ट्रीय स्पर्धेत तर 2 वेळा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 8 वी आशियन एज ग्रुप बॅकॉक येथे संपन्न झालेल्या स्पर्धेत सहभागी झालेली होती. तसेच साऊथ ऐशियन जलतरण स्पर्धा श्रीलंका येथे झालेल्या स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केलेले होते. सांजली ही खेळाडू नियमितपणे श्री. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे जलतरण तलावावर नियमितपणे सराव करीत असते. तिला प्रमुख मार्गदर्शक म्हणुन प्रा.डॉ. लक्ष्मीकांत खंडागळे, प्रा. डॉ. योगेश निर्मळ, प्रतिभा भोंडे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. सद्यस्थितीत सदर खेळाडू ही श्री. शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय अमरावती येथे शिकत असून प्रा. डॉ. अंजली ठाकरे, यांचे सुध्दा प्रोत्साहन सांजली वानखडे प्राप्त झालेले आहे.

            धनुर्विद्या या क्रीडा प्रकारातील कंपांऊड या बाबीमध्ये पुर्वशा शेंडे या खेळाडुने 36 व्या राष्ट्रीय क्रीडा  स्पर्धेत धनुर्विद्या सांघीक या क्रीडा प्रकारात महाराष्ट्रचे प्रतिनिधीत्व  करून सुवर्ण पदक प्राप्त केले. या पूर्वी 19 वेळा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये सहभागी होऊन प्राविण्य प्राप्त केलेले आहे. तसेच जागतिक स्पर्धा, आशियाई स्पर्धा, साऊथ आशियाई स्पर्धा, एशियन स्पर्धा, युथ वर्ड चॉम्पियनशिप इ. आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये 17 वेळा सहभागी होऊन प्राविण्य प्राप्त केलेले आहे. पुर्वशाच्या यशात तिचे वडील श्री. सुधिर शेंडे  यांच्या मार्गदर्शनात ती सराव करीत आहे.

            धनुर्विद्या या खेळात कंपांऊड या क्रीडा प्रकारात मधुरा धामणगावकर या खेळाडूने सुध्दा 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत धनुर्विद्या सांघीक या खेळात सुवर्ण पदक प्राप्त केले. या पुर्वी मधूराने 9 वेळा राष्ट्रीय स्पर्धा, आखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धामध्ये सहभागी होऊन प्राविण्य प्राप्त केले आहे. तसेच 3 वेळा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आशियाकप, युथवर्ड चॉम्पीयनशिप, वर्ल्ड कप चॉम्पीयनशिप मध्ये सहभागी झालेली आहे.खेळाडूंना भारतीय धनुर्विद्या संघटनेचे प्रमोद चांदुरकर, महाराष्ट्र ऑलम्पीक संघटनेचे प्रशांत देशपांडे,गुरूकुल अकादमीचे तुषार भारतीय, प्रशिक्षण पवन तांबट, गणेश विश्र्वकर्मा, नितेश मागरूळकर, प्रफुल डांगे यांचे सुध्दा मार्गदर्शन लाभत आहे.

            अमरावती जिल्ह्यातील 3 ही खेळाडूांचे  जिल्हाधिकारी श्रीमती पवनीत कौर, उपसंचालक क्रीडा व युवक सेवा, विजय संतान, जिल्हा क्रीडा अधिकारी वर्षा साळवी, जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्था,एकविध खेळ संघटना, शारीरिक शिक्षण संघटना यांनी पुढील वाटचालीसाठी तसेच भविष्यात स्पर्धाकरीता शुभेच्छा देण्यात आल्या.

00000

--

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...