Friday, October 21, 2022

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत अधिकाधिक प्रस्ताव मंजूर करा - विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे

 



प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत अधिकाधिक प्रस्ताव मंजूर करा

-          विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे

अमरावती, दि. 21 : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत अधिकाधिक प्रस्तावांना मंजुरी देऊन प्रकल्प उभे राहण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी येथे दिले.

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत खरेदीदार- विक्रेता मेळावा येथील बचतभवनात बुधवारी झाला. त्याचे उद्घाटन करताना डॉ. पांढरपट्टे बोलत होते. जिल्हाधिकारी पवनीत कौर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान, योजनेचे राज्य नोडल अधिकारी सुभाष नागर, स्मार्ट प्रकल्पाचे नोडल अधिकारी राहूल सातपुते, ‘आत्मा’च्या प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक जितेंद्र झा, महिला आर्थिक विकास महामंडळाचे सुनील सोसे, संदीप चंदनशिवे, गजाजन देशमुख आदी उपस्थित होते.  

खरेदीदार व विक्रेते एकाचठिकाणी आल्याने उत्पादन दर्जा, ग्राहक पसंती, मूल्य आदींबाबत विचारांचे आदान-प्रदान होते. त्यामुळे अशा उपक्रमांत सातत्य ठेवावे जेणेकरून उत्पादने अधिक दर्जेदार होतील व बाजारपेठ उपलब्ध होईल, असे डॉ. पांढरपट्टे यांनी यावेळी सांगितले. प्रस्ताव मंजुरीत बँकांची भूमिका महत्वाची आहे. बँकांनी प्रस्ताव मंजूर सुटसुटीत प्रक्रिया राबवावी व अधिकाधिक प्रस्ताव मंजूर करावेत, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले. श्री. नागर, श्री. खर्चान यांचीही भाषणे झाली.

वाशिम जिल्ह्यातील संशोधन व्यक्ती गोपाळ मुधाळ, अर्चना वाढिवे, अमरावती जिल्ह्यातील दीपक झंवर यांना यावेळी गौरविण्यात आले. राहूल ठाकरे यांनी सूत्रसंचालन केले.

०००

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...