Friday, October 14, 2022

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना लाभार्थ्याला 2 लाखाचा धनादेश वितरीत




 प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना

लाभार्थ्याला 2 लाखाचा धनादेश वितरीत

 

अमरावती, दि. 13 : प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही मुदत स्वरुपाची विमा योजना आहे. कुटूंबातील कर्त्या व्यक्तीच्या मृत्यूपश्चात कुटूंबियांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागु नये यासाठी ही योजना राबविण्यात येते. त्यात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातुन नुकतेच पत्निचा आधार गमावलेल्या लाभार्थ्याला या योजनेअंतर्गत आर्थिक लाभ मिळवून देण्यात आला. रायपुरच्या पांढरी येथील गजानन दवंगे यांना त्यांच्या पत्नि अलका दवंगे यांच्या मृत्यूपश्चात 2 लाख रुपये विम्याची रक्कम या योजनेअंतर्गत प्रदान करण्यात आली. श्री दवंगे वार्षिक 456 रुपये हफ्ता अदा करत होते. त्यांच्या विम्याची रक्कम दोन लाख रुपये असुन धनादेश स्वरुपात देण्यात आली.

स्टेंट बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक संजोग भागवतकर यांनी श्री दवंगे यांना 2 लाख रुपयांचा धनादेश वितरीत केला. यावेळी सहायक महाप्रबंधक प्रवीणकुमार, मुख्य प्रबंधक लीलाधर नेवारे, प्रबंधक अमोल चावरे, कौस्तूभ राऊत, मीनाक्षी अबरुक आदी उपस्थित होते.

या योजनेअंतर्गत विमा धारकांना दरवर्षी 330 रुपये किंवा त्याहुन अधिक विमा भरावा लागतो. 330 रुपयांच्या प्रिमियमवर 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते. विमाधारक व्यक्तिचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास दाव्याची 2 लाख रुपयांची रक्कम कुटूंबियांना दिली जाते. ही योजना एलआयसी मार्फत सुरु करता येत असून बॅकेत देखील याबाबतची माहिती घेता येते. 18 ते 50 वर्ष वयोगटातील लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. यासाठी बॅकेत खाते असणे गरजेचे आहे, अशी माहिती श्री नेवारे यांनी दिली.

0000000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...