अनुदान तत्वावर मिनी ट्रॅक्टर मिळण्यासाठी गटांनी अर्ज करण्याचे आवाहन अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांसाठी योजना

अनुदान तत्वावर मिनी ट्रॅक्टर मिळण्यासाठी गटांनी अर्ज करण्याचे आवाहन

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांसाठी योजना


अमरावती, दि. 10 - अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या बचत गटांना अनुदान तत्वावर  साडेतीन लाख रू. मर्यादेत किमान 9 ते 18 अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व रोटाव्हेटर, ट्रेलर मिळण्यासाठी समाजकल्याण कार्यालयाकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

योजनेत 90 टक्के शासकीय अनुदान व 10 टक्के स्वयंसहायता बचत गटाचा हिस्सा अशी तरतूद आहे. बचत गटातील किमान 80 टक्के सदस्य, तसेच अध्यक्ष, सचिव अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील असावेत,  गटातील सदस्य महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असावेत.  मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांची खरेदी मर्यादा साडेतीन लाख रू. असेल. या मर्यादेच्या रकमेच्या 10 टक्के (35 हजार रू.)  स्वहिस्सा गटाने भरल्यावरच उर्वरित 90 टक्के हिस्सा अर्थात कमाल 3.15 लाख रू. शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील. प्राप्त अर्जांचा आढावा घेऊन लॉटरी पद्धतीने सोडत होईल.  यापूर्वी पॉवर टिलरचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

 इच्छूक गटांनी दि. 20 ऑक्टोबरपूर्वी सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चांदूर रेल्वे मार्ग, अमरावती येथे संपर्क साधून विहित अर्ज  कार्यालयीन वेळेत सादर करण्याचे आवाहन सहायक आयुक्त माया केदार यांनी केले आहे.

०००

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती