जिल्हा उद्योग केंद्रामार्फत जिल्हा पुरस्कार योजनेसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज आमंत्रित

 जिल्हा उद्योग केंद्रामार्फत

जिल्हा पुरस्कार योजनेसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज आमंत्रित

 

अमरावती, दि. 11 (जिमाका) : उद्योग संचालनालयामार्फत लघु उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा पुरस्कार योजना 2022 साठी पात्र उद्योजकांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी पात्र उद्योजकांनी 31 ऑक्टोबरपूर्वी जिल्हा उद्योग केंद्रात अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापकांनी केले आहे.

लघु उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे. अर्जाचा विहित नमुना महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, अमरावती यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत विनामुल्य उपलब्ध आहे.

जिल्हा पुरस्कार योजनेत सहभागी होण्यासाठी लघु उद्योजकांनी काही अटींची पुर्तता करणे आवश्यक आहे. यानुसार लघु उद्योग घटक हा जिल्हा उद्योग केंद्रात 1 जानेवारी 2019 पुर्वी स्थायी नोंदणी / उद्योग आधार नोंदणी झालेला असावा. मागील तीन वर्षात सलग उत्पादन करणारे लघु उद्योग घटक या योजनेसाठी पात्र ठरतील. उद्योग घटक कुठल्याही वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच महिला उद्योजकास यास विशेष गुण दिले जातील. यासाठी जास्तीत जास्त लघु उद्योजकांनी जिल्हा पुरस्कार योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याबाबत जिल्हा उद्योग केंद्रामार्फत कळविण्यात आले आहे.  

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती