राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीत एकदिवसीय बदल

 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त

राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीत एकदिवसीय बदल

 

अमरावती दि. 11 (जिमाका) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा 54 वा पुण्यतिथी महोत्सव शुक्रवार दि. 14 ऑक्टोबर 2022 रोजी मोझरी येथील गुरुदेव नगर येथे साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त दरवर्षीप्रमाणे मौन श्रध्दांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी सुमारे एक ते दीड लाख भक्तगण समाधीस्थळी जमतात. या कार्यक्रमादरम्यान होणारी गर्दी पाहता कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील वाहतुक व्यवस्थेत एकदिवसीय बदल करण्यात आला आहे. यानुसार अमरावतीकडून तिवसा तालुक्यातील मोझरी - गुरुदेव नगर मार्गे नागपूरकडे जाणारी वाहतूक (एसटी बसेस, रुग्णवाहिका व अग्निशमन वाहन वगळून) नांदगाव पेठ पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून मोर्शीमार्गे नागपूरकडे वळविण्यात येत आहे.

            नागपूरकडून अमरावतीकडे येणारी वाहतूक (एसटी बसेस, रुग्णवाहिका व अग्निशमन वाहन वगळून) तिवसा शहरातील पंचवटी चौकातून कुऱ्हा मार्गे अमरावतीकडे वळविण्यात येत आहे. ही वाहतूक व्यवस्था दि. 14 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत वरील मार्गाने वळविण्यात येत आहे. या अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्या विरुध्द मोटार वाहन कायदा व मुंबई पोलीस कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाअधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती