महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत प्रोत्साहनपर रक्कम जमा करण्यास प्रारंभ अमरावती येथे 55 शेतकरी बांधवांचे प्रातिनिधीक स्वरूपात स्वागत

 





महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत प्रोत्साहनपर रक्कम जमा करण्यास प्रारंभ

अमरावती येथे 55 शेतकरी बांधवांचे प्रातिनिधीक स्वरूपात स्वागत

 

अमरावती, दि. २०: नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत ५० हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम जमा करण्याचा शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे थेट प्रसारण नियोजनभवनात करण्यात येऊन प्रातिनिधीक स्वरूपात अमरावती जिल्ह्यातील 55 शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यात रकमा जमा होऊन या सर्वांचे स्वागत जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये ही कार्यवाही गतीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिले आहेत. त्यानुसार मोठ्या प्रमाणावर खात्यांमध्ये रकमा जमा होण्यास आरंभ झाला आहे.

 

 

शासनातर्फे आज एकाच वेळी राज्यातील ६ लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे २५०० कोटी रुपये जमा करण्यात आले. अशा प्रकारे एकाचवेळी थेट खात्यात रक्कम जमा करणारे महाराष्ट्र पहिले राज्य असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीमुळे बळीराजाने खचून जाऊ नये राज्य सरकार पाठीशी असल्याची ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. दरम्यान, शेतीच्या नुकसानीचे पंचनामे उपग्रह आधारीत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करतानाच त्याची भरपाई ऑटोपायलट मोडच्या माध्यमातून देण्यासाठी यंत्रणा निर्माण करण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. योजनेचा लाभ देण्यासाठी पात्र शेतकऱ्यांच्या आधारक्रमांकाचे प्रमाणीकरण करण्यात आले असून सध्या सुमारे ८ लाख शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाचे प्रमाणीकरण झाले आहे. त्यापैकी ६ लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात आज थेट रक्कम जमा करण्यात आल्याचे सहकार मंत्री श्री. सावे यांनी सांगितले.  

 

 

नियोजनभवनात जिल्ह्यातील ५५ शेतकरी बांधवांच्या खात्यात रक्कम जमा करून त्यांचे स्वागत करण्यात आले. जिल्हा उपनिबंधक डॉ. महेंद्र चव्हाण, लीड बँक व्यवस्थापक जितेंद्रकुमार झा सहायक निबंधक भालचंद्र पारिसे, स्वाती गुडधे आदी उपस्थित होते.

  

 

00000

 

 

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती