Posts

Showing posts from February, 2017
Image
चिखलदऱ्यामध्ये पायाभूत सुविधा निर्माण करू                                                     - प्रविण पोटे ·         चिखलदरा पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन           अमरावती, दि 25 (जिमाका)  : निसर्गाचं वरदान लाभलेले, विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण म्हणून परिचीत असलेले चिखलदरा, पर्यटनाच्या बाबतीत   मात्र माघारले आहे. या थंड हवेच्या ठिकाणाची   देशभर उत्तम पर्यटन स्थळ म्हणून ओळख   निर्माण होण्यासाठी   चिखलदरा पर्यटन महोत्सवा सोबतच येथे चांगल्या   पायाभूत   सुविधा निर्माण करण्यावर भर देऊ अशी हमी पालकमंत्री प्रविण   पोटे यांनी दिली.           चिखलदरा पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन आज चिखलदरा येथे खासदार आनंदराव अडसूळ यांचे हस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानावरून श्री.पोटे   बोलत होते.   या कार्यक्रमाला आमदार सर्वश्री प्रभुदास भिलावेकर,   डॉ.अनिल बोंडे, रमेश बुंदिले, नगराध्यक्ष राजेंद्रसिंह सोमवंशी, विभागीय आयुक्त जे. पी. गुप्ता, मुख्य वनसंरक्षक संजीव गौड, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, धारणी उपविभागीय अधिकारी शण्‍मुखराजन, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक प्रशांत
Image
जिल्हाधिकारी कार्यालयात  छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी       अमरावती, दि.19 (जिमाका): छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात आज साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.           याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अन्य अधिकारी कर्मचारी यांनी ही पुष्प वाहुन छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले. 00000 वाघ/सागर/दि.19-02-2017/14-40 वाजता
Image
सालबर्डी यात्रेच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा        अमरावती, दि. 16 (जिमाका) : महाराष्ट्र मध्यप्रदेश सिमेवरील सालबर्डी येथे दरवर्षी महाशिवरात्री निमित्त सालबर्डी यात्रा असते. यावर्षी 24 फेब्रुवारी ते 2 मार्च 2017 दरम्यान ही यात्रा होणार आहे. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीचा आढावा आज जिल्हाधिकारी किरण गित्ते, बैतुल जिल्हाधिकारी शशांक मिश्र, बैतुल पोलीस अधिक्षक राकेश जैन, अतिरिक्त पोलीस अधिक्षक एम.एम. मकानदार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जे.एन.आभाळे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.           यात्रेकरुंना यात्रेसाठी  जाण्यासाठी पोचरस्त्याची देखभाल दुरुस्ती करण्यात यावी, पोलीस स्टेशन, दवाखाने, विद्युत व्यवस्था, परिवहन व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आ‍दी सेवा अमरावती जिल्हा परिषदच्या यात्रा व्यवस्थानामार्फत करण्यात याव्या, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी  दिले.  दापोरी, डोंगरयावली ते सालबर्डी या 6 किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात यावे, तर डोंगरयावली ते हिवरखेड या 3 कि.मी. रस्त्याचे काम जिल्हा परिषदेने करावे
Image
मागेल त्याला शेततळे योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा - जिल्हाधिकारी प्रशिक्षणासाठी  300 ट्रॅक्टर चालकांची नोंदणी        अमरावती, दि. 16 (जिमाका) : शेतकरी व शेतीचा विकास हा शासनाचा अग्रक्रम आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवार योजना यशस्वी ठरली आहे.मात्र खारपाणपट्यात जमीनाचा पोत नरम असल्याने या भागातील शेतकऱ्यांनी मागेल त्यांना शेततळे योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी केले.           जलयुक्त शिवार योजना व प्रमोद महाजन कौशल्य व उदयोजकता विकास अंतर्गत  प्रभा मंगलम कार्यालय, अंजनगाव येथे आयोजित ट्रॅक्टर चालक प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, उपसंचालक कौशल्य विकास महेश देशपांडे,  सहायक संचालक कौशल्यविकास अशोक पाईकराव ,तहसिलदार पुरुषोत्तम भुसारी उपस्थित होते.            जिल्हयात सदय परिस्थीतीत शेततळे तयार करण्यासाठी राजस्थानी लोक येतात.स्थानिकांना त्याप्रमाणे कौशल्य प्राप्त नसते.स्थानिकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी ट्रॅक्टर डॉयव्हरना प्रशिक्षण देण्यास
Image
धारणी तालुक्यातील 163 गावे प्रकाशमय 132 केव्ही नेपानगर-धारणी आंतरराज्यीय एकल परिपथ वाहिनी सुरू अमरावती, दि.11 :   धारणी  येथे 132 केव्ही  वीजेचे उपकेंद्र व या उपकेंद्राला विज पुरवठा करण्याकरीता लागणारी 132 केव्ही नेपानगर-धारणी आंतरराज्यीय एकल परिपथ वाहिनी 60 किमी वि द्यु त वाहीनी कालपासुन सुरू झाली. मेळघाटच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा या प्रकल्पामुळे धारणी तालुक्यातील एकुण 163 गावे व एकुण 11063 घरगुती वीज ग्राहकांना व 3181 कृषी पंपाना वीज उपलब्ध होणार आहे. यामुळे मेळघाट परिसरातील विजेचा काळोख दुर होणार आहे. 132 केव्ही धारणी उपकेंद्र कार्यान्वीत झाल्याने हा प्रकल्प धारणी परिसरातील विकासासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. धारणी उपकेंद्र यशस्वी पुर्ण करण्याकरीता नेहा कन्स्ट्रकशंन नागपूर व प्रतिभा इलेक्टीकल्स पुणे या एजन्सीनी काम केले.महाराष्ट्र पारेषण कंपनीचे मुख्य अंभियता सुरेश पाटील, अतीउच्च दाब प्रकल्प अधिक्षक अभियंता वंदनकुमार मेंढे, अधिक्षक अभियंता चाचणी मंडळ रुपेश फरकाडे, अधिक्षक अभियंता स्थापत्य अविनाश कसबेकर, कार्यकारी अभियंता प्रमोद पखाले, कार्यकारी अभियंता प

अमरावती पदवीधर मतदान फोटो

Image