मागेल त्याला शेततळे योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा - जिल्हाधिकारी
प्रशिक्षणासाठी  300 ट्रॅक्टर चालकांची नोंदणी

       अमरावती, दि. 16 (जिमाका) : शेतकरी व शेतीचा विकास हा शासनाचा अग्रक्रम आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवार योजना यशस्वी ठरली आहे.मात्र खारपाणपट्यात जमीनाचा पोत नरम असल्याने या भागातील शेतकऱ्यांनी मागेल त्यांना शेततळे योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी केले.
          जलयुक्त शिवार योजना व प्रमोद महाजन कौशल्य व उदयोजकता विकास अंतर्गत  प्रभा मंगलम कार्यालय, अंजनगाव येथे आयोजित ट्रॅक्टर चालक प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, उपसंचालक कौशल्य विकास महेश देशपांडे,  सहायक संचालक कौशल्यविकास अशोक पाईकराव ,तहसिलदार पुरुषोत्तम भुसारी उपस्थित होते.
           जिल्हयात सदय परिस्थीतीत शेततळे तयार करण्यासाठी राजस्थानी लोक येतात.स्थानिकांना त्याप्रमाणे कौशल्य प्राप्त नसते.स्थानिकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी ट्रॅक्टर डॉयव्हरना प्रशिक्षण देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.                         
          अंजनगाव दर्यापूर व भातकुली या तालुक्यामध्ये खारपाणपट्टा आहे. 22 गावातील खारपाणपट्टयातील गावांना शेततळ्याची गरज आहे. जिल्ह्यात 4500 शेततळयाचे उदिष्ट्ये असून त्यापैकी 2500 हे अंजनगाव दर्यापूर तालुक्यामध्ये करायचे आहे. वैज्ञानिक पद्धतीने शेततळे केले तर जास्तीत जास्त  अर्धा एकर पर्यंत शेत जाऊ शकते. मात्र त्यातून उर्वरित  शेताला संरक्ष‍ित सिंचन देऊन पिकाची उत्पादकता वाढवता येते. रामागड  व नरदोडा या गावांमध्ये शेततळ्यांच्या माध्यमातून हरबऱ्याच्या पिकात लक्षणिय वाढ झाली आहे. जिल्ह्यात 506 गावामध्ये जलयुक्त शिवार योजना राबविण्यात आली असून येत्या एप्रिल मध्ये 250 गाव आणखी जलयुक्त शिवार मध्ये घेण्यात येणार आहे. जिल्ह्यात 2500 विहिरी धडक सिंचन मोहिमेत घेण्यात आल्या आहेत. मार्च 2016 अखेरपर्यंत विज जोडणीसाठी जवळपास 1700 शेतकऱ्यांना विज जोडणी देण्यात आली आहे. अशी माहिती या कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
 या कार्यक्रमात जिल्ह्यातील पहिला डिजीटल स्वाक्षरी असलेला सात बारा दोन शेतकऱ्यांना देण्यात आला. तर  शेततळ्याची निर्मिती करुन वाढीव उत्पन्न घेणाऱ्या विलास टाले नरदोडा व विजय लांजूळकर या दोन शेतकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आशुतोष गोळे या शेतकऱ्याला ट्रॅक्टरची चावी जिल्हाधिकारी महोदयांच्या हस्ते देण्यात आली.
शेततळे तयार करण्याचे उद्दिष्ट असल्याने त्यासाठी ट्रॅक्टर सह कुशल मनुष्यबळ तयार करणे हे सुध्दा आवश्यक आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातुन प्रशिक्षीत टॅक्ट्रर डॉयव्हर तयार झाल्यास भविष्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल. या कौशल्य विकास कार्यक्रमात 300 ट्रॅक्टर चालकांची नोंदणी झाली.
                    या कार्यशाळेत कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता विभागाचे अधिकारी महेश अग्रवाल संचालक, करिअर कॅम्प्युटर ॲन्ड टेक्नीकल इन्स्टीटयुट दर्यापुर व तसेच कार्यशाळेत तालुक्यातील महसुल विभागाचे लिपीक, तलाठी मंडळ अधिकारी उपस्थित होते.
000000

वाघ/बारस्कर/सागर/16-02-2017/19-05 वाजता







Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती