Thursday, February 16, 2017

सालबर्डी यात्रेच्या पूर्वतयारीचा
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

       अमरावती, दि. 16 (जिमाका) : महाराष्ट्र मध्यप्रदेश सिमेवरील सालबर्डी येथे दरवर्षी महाशिवरात्री निमित्त सालबर्डी यात्रा असते. यावर्षी 24 फेब्रुवारी ते 2 मार्च 2017 दरम्यान ही यात्रा होणार आहे. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीचा आढावा आज जिल्हाधिकारी किरण गित्ते, बैतुल जिल्हाधिकारी शशांक मिश्र, बैतुल पोलीस अधिक्षक राकेश जैन, अतिरिक्त पोलीस अधिक्षक एम.एम. मकानदार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जे.एन.आभाळे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.
          यात्रेकरुंना यात्रेसाठी  जाण्यासाठी पोचरस्त्याची देखभाल दुरुस्ती करण्यात यावी, पोलीस स्टेशन, दवाखाने, विद्युत व्यवस्था, परिवहन व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आ‍दी सेवा अमरावती जिल्हा परिषदच्या यात्रा व्यवस्थानामार्फत करण्यात याव्या, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी  दिले.
 दापोरी, डोंगरयावली ते सालबर्डी या 6 किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात यावे, तर डोंगरयावली ते हिवरखेड या 3 कि.मी. रस्त्याचे काम जिल्हा परिषदेने करावे. यात्रेच्या जागेची गटविकास अधिकारी व उपविभागीय अधिकारी मुलताई यांनी संयुक्त पाहणी करावी. या यात्रेदरम्यान जिल्हापरिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत पशूप्रदर्शनीचे आयोजन करण्यात येणार आहे.
सालबर्डीला क तिर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त्‍ आहे तेव्हा येथील सोयीसुविधा वाढवून  ब दर्जासाठी य हा तिर्थक्षेत्र विकास आढावा सादर करावा असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. सालबर्डी येथे यात्रेकरुंसाठी  सभागृह व विश्रामगृह बांधण्यात येईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी दोन्ही जिल्हयातील अधिकाऱ्यांनी यात्रास्थळाची पाहणी केली.
000000

वाघ/बारस्कर/सागर/16-02-2017/19-20 वाजता






No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...