Posts

Showing posts from June, 2023

सर्व कार्यालयांचे ‘फायर ऑडिट’ करावे - जिल्हाधिकारी पवनीत कौर

Image
  सर्व कार्यालयांचे ‘फायर ऑडिट’ करावे -     जिल्हाधिकारी पवनीत कौर   अमरावती, दि. 30 : जिल्ह्यातील शासकीय विभाग, सर्व कार्यालय, निमशासकीय कार्यालय, स्थानिक स्वराज्य संस्था, विद्यापीठ, विद्यालय तसेच शाळा यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून ‘फायर ऑडिट’ करण्यात यावे. तसेच आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण, रंगीत तालीम घेऊन जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे. 00000

पेरणीची घाई करू नका; कृषी विभागाचा शेतकरी बांधवांना सल्ला

  पेरणीची घाई करू नका; कृषी विभागाचा शेतकरी बांधवांना सल्ला  जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राहूल सातपुते यांनी केले आहे. अमरावती जिल्ह्यातील सरासरी 145.7 मि.मि. पर्जन्यमानाच्या तुलनेत दि. 27 जूनअखेर  54 मि.मि. अर्थात सरासरीच्या 37.1 टक्के पाऊस झाला आहे. मान्सूनच्या आगमनास विलंब व हवामान बदलामुळे सामान्यपणे पाऊस येण्याचा कालावधी पुढे सरकला आहे. भारतीय हवामान विभागाने आज दिलेल्या हवामान अंदाजानुसार दि. 2 ते 8 जुलै दरम्यान कमी पाऊस पडण्याची व पावसात खंड निर्माण होण्याची शक्यता वर्तविली आहे.  त्यामुळे शेतकरी बांधवांनी पेरणीसाठी घाई करु नये. सर्वसामान्यतः 80 ते 100 मिमि. पर्यत पाऊस पडल्याशिवाय पेरणी करु नये. जमिनीत पेरणीसाठी योग्य ओल असल्याची खात्री करावी. पावसाचा अंदाज घेऊनच पेरणी करावी. ज्या शेतक-यांनी पेरणी केली आहे, त्यांनी पिकांसाठी संरक्षित सिंचनाचा वापर करावा. जमिनीतील ओलाव्याचे संवर्धन करण्यासाठी आच्छादनासारख्या (मल्चिंग) तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन एसएओ श

भातकुली तालुक्यासाठी नियंत्रण कक्षातील दूरध्वनी क्रमांक जाहीर

  भातकुली तालुक्यासाठी नियंत्रण कक्षातील दूरध्वनी क्रमांक जाहीर  सद्यस्थितीत पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर (जुनी) भातकुली तहसील कार्यालय, कॅम्प, अमरावती येथे आठवड्याचे सात दिवस तसेच चोवीस तास सुरु असणाऱ्या नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. हा नियंत्रण कक्ष 30 सप्टेंबर 2023 पर्यंत कार्यान्वित राहणार आहे. या नियंत्रण कक्षामध्ये 0721-2991946 हा दूरध्वनी क्रमांक आपत्कालीन परिस्थितीतील मदतीसाठी कार्यान्वित करण्यात आला आहे. याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन भातकुली तहसीलदार यांनी केले आहे. 0000

परिवहन कार्यालयातर्फे एका जप्त वाहनाचा 17 जुलैला लिलाव

  परिवहन कार्यालयातर्फे एका जप्त वाहनाचा 17 जुलैला लिलाव  प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे जप्त केलेल्या एका वाहनाचा लिलाव दि. 17 जुलै रोजी सकाळी 11 वाजता होईल. पाहणीसाठी वाहन कार्यालयाच्या आवारात उपलब्ध आहे.               वायुवेग पथकाने थकित कर, तसेच विविध गुन्ह्यांखाली अडकवून ठेवलेल्या वाहनाच्या मालकाला त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर पंजीबध्द डाकेने नोटीस पाठविण्यात आली आहे. लिलावाच्या तारखेपर्यंत वाहन कर व पर्यावरण कर भरण्याची संधी वाहनमालकाला राहील.   वाहनाचा क्रमांक एमएच 27सी0724 असून प्रकार एचजीव्ही टिप्पर, चासिस क्र.  403121सीव्हीझेड711992, इंजिन क्रमांक 497डी44 सीव्हीझेड871875 व रंग रूबी रेड आहे.  वाहनाची नोंदणी 17 एप्रिल, 2004 रोजीची व बनावट – टाटा मोटर्स लि. यांची आहे.    ई-लिलावात सहभागी होण्यासाठी दि. 3 ते 10 जुलैदरम्यान सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत  www.eauction.gov.in  या संकेतस्थळावर, तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय, अमरावती येथे 17 हजार रू. रकमेचा आरटीओ, अमरावती या नावाने अनामत धनाकर्षासह (डिमांड ड्राफ्ट) नाव नोंदणी करुन प्रत्यक्ष येऊन पूर्तता करावी. अर्जदार जीएसटीधारक

सैनिकी मुलां-मुलींच्या वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

  सैनिकी मुलां-मुलींच्या वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू      माजी सैनिक, वीरपत्नी ज्यांचे पाल्य अमरावती येथे उच्च शिक्षण घेत आहे, त्या पाल्यांच्या शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहातील प्रवेशाची प्रक्रिया सुरु झाली आहे. अमरावतीमध्ये माजी सैनिकी मुलांचे वसतिगृह, नवसारी, जवाहर नवोदय विद्यालयाचे मागे, अमरावती येथे आहे. या वसतिगृहामध्ये एकूण 48 मुलांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था आहे. तसेच सैनिकी मुलींचे वसतिगृह, नंदनवन कॉलनी, भातकुली तहसीलमागे असून या वसतिगृहामध्येही एकूण 48 मुलींची राहण्याची तसेच भोजनाची व्यवस्था आहे. माजी सैनिकांच्या पाल्यांना माफक दरात सैन्याच्या रॅंक प्रमाणे भाडे आकारले जाते व वीरपत्नींच्या पाल्यांना या वसतिगृहमध्ये विनामूल्य प्रवेश देण्यात येतो. प्रवेशासाठी प्रवेश पुस्तिका वसततिगृह अधीक्षक, अधीक्षिका व कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत. तरी इच्छुक माजी सैनिक व वीरपत्नींच्या पाल्यांनी वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी संबंधित अधीक्षक, अधीक्षिका यांचे कडून प्रवेश पुस्तिका खरेदी करून आपला अर्ज त्यांचेकडे सादर करावा, तसेच सैनिकी  मुलांचे वसतिगृह, नवसारी अ

सैनिकी मुलांच्या वसतिगृहात माजी सैनिकांना नोकरीची संधी

  सैनिकी मुलांच्या वसतिगृहात माजी सैनिकांना नोकरीची संधी  सैनिकी मुलांचे वसतिगृह, अमरावती येथील अशासकीय वसतिगृह अधीक्षक (मानधनाचे पद) या पदाचा कालावधी दि. 15 जुलै 2023 रोजी संपुष्टात येत असल्याने रिक्त होत आहे. तरी माजी सैनिक सुभेदार, नायब सुभेदार व हवालदार संर्वगातून ‘वसतिगृह अधीक्षक’ या एका पदासाठी जागा भरावयाची आहे. हे पद अशासकीय, तात्पुरत्या स्वरूपाचे व एकत्रित मानधनावर असून त्यासाठी दरमहा 29 हजार 835 रूपये  इतके मानधन अदा करण्यात येईल. माजी सैनिकास सैनिकी मुलांचे वसतिगृह, अमरावती येथे निवासी रहावयाचे आहे. शैक्षणिक अर्हता 10 वी अथवा  12 वी पास असलेल्या इच्छुक माजी सैनिकांनी  आपले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह बुधवार, दि. 5 जुलै 2023 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण  कार्यालय, अमरावती येथे सादर करावेत. 5 जुलैनंतर अर्ज स्विकाराण्यात येणार नाही. अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 0721-2661126 या क्रमांकवर संपर्क साधावा. तसेच नायब सुभेदार व सुभेदार संवर्गातून उमेदवार उपलब्ध न झाल्यास हवालदार या प्रवर्गातून पद भरण्याबाबत विचार करण्यात येईल. इच्छुक माजी सैनिकांनी विहित कालमर्यादेत अर्ज सा

जिल्हा दक्षता समितीची बैठक संपन्न

Image
  जिल्हा   दक्षता   समितीची बैठक संपन्न अमरावती , दि. 27: अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ अंतर्गत जिल्हा   दक्षता   व नियंत्रण   समितीची सभा निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.विवेक घोडके यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज संपन्न झाली. यावेळी शहरी व ग्रामीण विभागात अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यातंर्गत घडलेले गुन्हे तसेच प्रलंबित गुन्ह्यांबाबत चर्चा करण्यात आली.  सहायक पोलीस आयुक्त अर्जुन ठोसरे, गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक    तपन कोल्हे, पोलीस निरीक्षक पी. पाचकवडे, शासकीय अभियोक्ता गजानन खिल्लारे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते .   दक्षता   समितीच्या बैठकीमध्ये माहे एप्रिल २०२३ पर्यंतच्या प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा आढावा घेण्यात आला . तसेच माहे मे मध्ये एकुण 8 प्रकरणे दाखल झाली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. न्यायालयात प्रलंबित प्रकरणे, अर्थसहाय्यासाठी प्रलंबित प्रकरणे तसेच जिल्हा दक्षता समितीवर अशासकीय सदस्य घेण्याबाबतचा आढावा  यावेळी घेण्यात आला.                 निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. घोडके यांनी प्रलंबित प्रकरणांचा लवकरात लवकर तपास

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे सामाजिक न्याय दिन साजरा

Image
  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे   सामाजिक न्याय दिन साजरा           अमरावती, दि. 26: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, अमरावती येथे राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांचा जन्म दिवस ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून आज साजरा करण्यात आला.            सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून सकाळी समता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. समता दिंडीमध्ये सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास मान्यवरांच्या हस्ते पुष्पार्पण करण्यात आले. त्यानंतर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त जया राऊत यांनी समता दिंडीस हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केले. समता दिंडीमध्ये सामाजिक न्याय विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचे फलक दर्शविणाऱ्या रथाचा समावेश होता. तसेच आज (दि. 26 जून) आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन विरोधी दिन असल्याने जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद मार्फत व्यसनमुक्ती व अंमली पदार्थ सेवन विरोधी जागरुकता निर्माण करण्यासाठी चित्ररथ तयार करण्

शहरात कलम 37 (1) व (3) लागू

  शहरात   कलम 37 (1)   व (3) लागू अमरावती, दि. 26 :   शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस आयुक्त   (अमरावती शहर) यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. सदर प्रतिबंधात्मक आदेश शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा, याकरिता अमरावती पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात आज दि. 26 जूनपासून लागू करण्यात आला असून दि. 10 जुलै 2023 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त (अमरावती शहर)   नविनचंद्र रेड्डी   यांनी कळविले आहे. 00000

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज दाखल करण्याची मुदत 15 जुलैपर्यंत

  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज दाखल करण्याची मुदत 15 जुलैपर्यंत   अमरावती, दि. 26 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित अमरावती जिल्हा कार्यालयांतर्गत जिल्ह्यातील मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. या योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सन 2022-23 या शैक्षणिक वर्षामध्ये 10 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी सरासरी 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहे, अशा विद्यार्थ्यांना गुण क्रमांकानुसार जिल्ह्यातील प्रथम 3 ते 5 विद्यार्थ्यांस निधीच्या उपलब्धतेनुसार प्रोत्साहनपर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. गरजू विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, गुणपत्रिका, बोनाफाईड, दोन छायाचित्र, आधार कार्ड इत्यादी कागदपत्रांसह दि. 15 जुलै 2023 पर्यंत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पोलिस आयुक्त कार्यालयामागे, अमरावती येथे कार्यालयीन वेळेत येऊन प्रस्ता

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या अनुदान योजनेसाठी अर्ज आमंत्रित

  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या अनुदान योजनेसाठी अर्ज  आमंत्रित               अमरावती, दि. 26 : जिल्ह्यातील मातंग समाजाच्या अर्जदारांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी व समाजातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी महाराष्ट्र शासनाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची स्थापना केली आहे. त्याअंतर्गत मातंग समाजातील 12 पोट जातीतील लोकांना आर्थिक सहाय्य दिले जाते. चालु आर्थिक वर्षात बीजभांडवल योजनेंतर्गत 50 हजार एक ते 7 लक्ष रूपये पर्यंत जिल्ह्याला 50 कर्ज प्रकरणांचे उदिष्ट प्राप्त झाले आहे. यामध्ये महामंडळाचा सहभाग (अनुदानासह 45 टक्के) लाभार्थी सहभाग 5 टक्के तसेच बॅंकेच्या कर्जाचा सहभाग 50 टक्के असतो. महामंडळाच्या बीजभांडवल रकमेवर 4 टक्के व्याज दर आकारण्यात येतो. अनुदान योजनेंतर्गत पन्नास हजार रूपयेपर्यंतचे कर्ज प्रस्ताव बॅंकेला पाठविण्यात येतात. त्यामध्ये महामंडळाचे अनुदान दहा हजार रूपये असून उर्वरित कर्ज बॅंकेचे असते.             या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा मातंग समाज व त्यातील 12 पोटजातीतील असावा. वयोमर्यादा 18 ते 50 असावी. जातीचा दाखल

जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन

Image
जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन अमरावती,दि.26: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. अधीक्षक निलेश खटके यांनी छत्रपती शाहु महाराजांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन अभिवादन केले. उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांनी यावेळी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.   00000

प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये आतापर्यंत 103 उमेदवारांना रोजगार प्राप्त

  प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये आतापर्यंत 103 उमेदवारांना रोजगार प्राप्त             अमरावती, दि. 26 : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करिअर सेंटर, अमरावती मार्फत सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतींसाठी स्थानिक स्तरावर नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा (प्लेसमेंट ड्राईव्ह) प्रत्येक महिन्यात तिसऱ्या मंगळवारी आयोजित करण्यात येतो. प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये आतापर्यंत 103 उमेदवारांना रोजगाराची संधी प्राप्त झाली आहे. प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये जिल्ह्यातील स्थानिक नामांकित उद्योजक कंपन्या सहभागी होऊन त्यांच्याकडील रिक्तपदे अधिसूचित करतात. उद्योजकाव्दारे सदर पत्रे www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर अधिसूचित झाल्यानंतर पात्र उमेदवारांना या पदांना ऑनलाईन पध्दतीने अप्लाय करता येते. रिक्त पदांची माहिती सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना मिळावी, यासाठी नोकरी इच्छुक उमेदवारांचा व्हॉट्सॲप ग्रुप, फेसबुक, टेलिग्राम, गुगल फॉर्मसाठी क्यूआर कोड तयार करण्यात आला आहे. या क्यूआर कोडच्या माध्यमातून महास्वयंम पोर्टलवर उमेदवाराने नोंदणी केल्यानं

विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात जागतिक योग दिन संपन्न

  विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात जागतिक योग दिन संपन्न            अमरावती, दि. 26 : विभागीय संदर्भ सेवा रूग्णालय येथे जागतिक योग दिवस नुकताच साजरा करण्यात आला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे तसेच विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.           रुग्णालयामध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये योगक्रियेविषयी जनजागृती व्हावी यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती आजीवन अध्ययन व विस्तार विभाग योग शिक्षका प्रा. राधिका खडके यांनी मार्गदर्शनातून योग अभ्यासाचे महत्त्व सांगितले.          निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिता हिवसे, डॉ. माधवी कासदेकर, डॉ. श्याम गावंडे, डॉ. सपना गुप्ता, डॉ. गावंडे, डॉ. पटवे, प्रतिक्षा सोळंके आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन समुपदेशक दिनेश हिवराळे यांनी केले. ***

जिल्हा सामान्य रुग्णालयात जागतिक योग दिन संपन्न

  जिल्हा सामान्य रुग्णालयात जागतिक योग दिन संपन्न        अमरावती, दि. 26 : जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये जिल्हा सामान्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांचे मार्गदर्शनाखाली 9 वा   जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. जिल्हा आयुष अधिकारी डॉ. मनीषा सुर्यवंशी, सहायक जिल्हा आयुष अधिकारी डॉ. विपिन टोंगळे तसेच डॉ. अब्दुल मतीन, डॉ. रेहान खान, डॉ. संदीप खांडे, डॉ. प्रियंका मडावी, डॉ. प्रिती मोरे तसेच अधिसेविका ललिता अटाळकर, कविता देशमुख आदी उपस्थित होते.          योग प्रशिक्षक अमोल भातकुलकर यांनी योग प्रशिक्षण दिले. रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते. मालती सरोदे, संदीप भस्मे यांनी सहकार्य केले. 00000

प्राणी क्लेश प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा - निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके

Image
  प्राणी क्लेश प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा -          निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके -           अमरावती, दि. 26 : जास्तीत जास्त गोवंशाना टॅग करुन जनावरांसाठी सुरक्षितता निर्माण करण्यात यावी. गोवंशाच्या रक्षणासाठी पोलीस प्रशासन व पशुसंवर्धन विभागाने समन्वयाने काम करावे. प्राणी क्लेश प्रतिबंध कायद्याची जिल्ह्यात काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके यांनी आज दिल्या. जिल्हास्तरीय प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची त्रैमासिक बैठक निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसुल भवनात आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा पशु संवर्धन उपायुक्त डॉ. संजय कावरे, महापालिकेचे पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन बोंद्रे, जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) तपन कोल्हे, पोलीस आयुक्त कार्यालयाचे प्रतिनिधी अनिल कुरळकर, पंचायत समिती सहायक आयुक्त डॉ. राजीव खेरडे तसेच अशासकीय सदस्य, प्रादेशिक परिवहन अधिकारी सिध्दार्थ ठोके, जिल्हा परिषदेचे डॉ. पुरुषोत्तम सोळंके आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. येत

राज्यपाल रमेश बैस यांचे अमरावतीत आगमन

Image
  राज्यपाल रमेश बैस यांचे अमरावतीत आगमन   अमरावती, दि. २४ : राज्यपाल रमेश बैस यांचे अमरावती येथे शासकीय विश्रामगृह येथे आगमन झाले. आमदार रवी राणा, आमदार प्रताप अडसड, विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडेय, जिल्हाधिकारी पवनीत कौर, विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा, पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी , पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, सहायक जिल्हाधिकारी रिचर्ड यांथन आदींनी स्वागत केले. 00000

‘मिशन मेळघाट’अंतर्गत दीर्घकालीन विकास आराखडा - प्र. जिल्हाधिकारी विजय भाकरे

Image
‘मिशन मेळघाट ’ अंतर्गत दीर्घकालीन विकास आराखडा -   प्र. जिल्हाधिकारी विजय भाकरे   अमरावती, दि. 16 : ‘मिशन मेळघाट ’ मध्ये चिखलदरा व धारणी  या दोन तालुक्यांसाठी गाव व पाडे हे एकक मानून समग्र विकास आराखडा आकारास येत असून, दीर्घकालीन उपाययोजना हाती घेण्यात येणार आहेत, असे प्र. जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी सांगितले. मिशन मेळघाट, गाभा समितीची बैठक व गावोगाव विविध अधिका-यांच्या भेटी असा कार्यक्रम नुकताच झाला. त्यातील निर्णयानुसार मेळघाटाची विशिष्ट भौगोलिक संरचना लक्षात घेऊन सामाजिक, आर्थिक बाबींच्या अनुषंगाने आताच्या व भविष्यातील आवश्यक सुविधांसाठी 2047 पर्यंतचे नियोजन करण्यात येत आहे. मेळघाटातील कुपोषण, आरोग्य, रोजगार, शिक्षण, पाणीपूरवठा, वनहक्क कायदा व पेसा कायदा यानुसार हा आराखडा तयार होणार असून, जिल्हा नोडल अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिका-यांना जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तालुकास्तरीय नोडल अधिकारी   दोन्ही तालुक्यांचे तहसीलदार व गटविकास अधिकारी असतील, अशी माहिती जिल्हाधिका-यांनी दिली.      ते म्हणाले की, याबाबत कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. मेळघाटात उपलब्ध सुविधांची

विभागीय आयुक्तांकडून कौंडण्यपूर विकास आराखड्यातील कामांची पाहणी उर्वरित कामे पूर्ण करण्याचे निर्देश

Image
  विभागीय आयुक्तांकडून कौंडण्यपूर विकास आराखड्यातील कामांची पाहणी उर्वरित कामे पूर्ण करण्याचे निर्देश                   अमरावती, दि. 16 : तीर्थक्षेत्र कौंडण्यपूर विकास आराखड्यातील प्रलंबित कामे पूर्णत्वास जाण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज येथे दिले.            श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथे भेट देऊन विभागीय आयुक्तांनी विकास आराखड्यांतर्गत विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी, तसेच आढावा आज घेतला. त्यांनी जिल्हाधिका-यांशीही चर्चा करून उर्वरित कामांना वेग देण्याचे निर्देश दिले. तहसीलदार वैभव फरताडे व कार्यान्वयन यंत्रणेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.                विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय म्हणाल्या की, कौंडण्यपूर विकास आराखड्यातील अनेक कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, मंदिर परिसरातील भक्त निवास, तसेच वाहनतळ, नदी घाट व इतर स्थापत्य कामे अद्यापही अपूर्ण आहेत. ही अपूर्ण कामे पूर्ण होण्यासाठी प्रभावी नियोजन आवश्यक आहे. त्यासाठी याबाबत आढावा बैठकही लवकरच घेतली जाईल. याबाबत विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिका-यांशी चर्चा करून कामे वेगाने पूर्ण होण्य

मेळघाट टँकरमुक्त करण्यासाठी जलसंधारणाच्या योजना भरीवपणे राबवा - प्र. जिल्हाधिकारी विजय भाकरे

Image
  मेळघाट टँकरमुक्त करण्यासाठी जलसंधारणाच्या योजना भरीवपणे राबवा -      प्र. जिल्हाधिकारी विजय भाकरे              अमरावती दि. 16 : मेळघाट टँकरमुक्त करण्यासाठी भूजलपातळी सुधारणा उपाययोजना व जलस्त्रोतांचे बळकटीकरण आवश्यक आहे. त्यामुळे वनक्षेत्रानजिकच्या टँकरग्रस्त गावांच्या परिसरात जलसंधारणाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे निर्देश प्र. जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी दिले आहेत.    तसे पत्रही जिल्हाधिका-यांनी सिपना वन्यजीव विभागाचे उपवनसंक्षक दिव्याभारती एम. यांना दिले आहे. मेळघाटात नवसंजीवनी,  गाभा समितीची सभा व विविध गावांना अधिका-यांची भेट असा कार्यक्रम नुकताच झाला. मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात आकी, मोथा, खोगडा, रायपुर, सोमवारखेडा, बगदरी, धरमडोह, खडीमल, एकझीरा या गावांमध्ये एकूण 12 टँकरद्वारे सद्य:स्थितीत पाणीपुरवठा सुरु आहे. पाणी टंचाई आराखड्यानुसार एकूण 19 गावे टॅंकरग्रस्त असून, या गावांसाठी जिल्हापरिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा योजना प्रस्तावित आहे.                     ही सर्व गावे आदिवासीबहुल क्षेत्रातील आहेत. स्थानिक आदिवासी बांधवांचे जीवनम

कुंड सर्जापूर रस्त्याच्या बांधकामामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद पर्यायी रस्ता वापरण्याचे आवाहन

  कुंड सर्जापूर रस्त्याच्या बांधकामामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद पर्यायी रस्ता वापरण्याचे आवाहन अमरावती दि 16: अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील अमरावती कुंड सर्जापूर रस्त्याच्या तवक्कल किराणापासून लालखडी चौकापर्यंत रस्ता काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. यामुळे कुंड सर्जापूर रस्त्याच्या तवक्कल किराणापासून लालखडी चौकापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण व पुलाच्या बांधकामासाठी हा रस्ता दिनांक 5 जुलै 2023 पर्यंत वाहतुकीस बंद करण्यात येत आहे. यासाठी नागरिकांनी वाहतुकीसाठी पर्यायी खुल्या मार्गाचा वापर करून सहकार्य करण्याचे आवाहन सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अभियंता यांनी केले आहे. 00000

महिला लोकशाही दिन सोमवारी

  अमरावती, दि. 16 : महिलांना त्यांच्या तक्रारी दाखल करता याव्यात म्हणून महिला लोकशाही दिनाचे आयोजन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी करण्यात येते. याकरिता या महिन्याचा तिसरा सोमवार दि. 19 जून 2023 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, सभागृह क्र. 1, अमरावती येथे महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या महिलांना महिला लोकशाही दिनात तक्रारी दाखल करावयाच्या आहेत, त्यांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, दत्तात्रय सदन, दसरा मैदान रोड, भुतेश्वर चौक, देशपांडेवाडी, अमरावती येथे किंवा जिल्हाधिकारी कार्यालय, सभागृह क्र. 1 अमरावती येथे तक्रारी दाखल कराव्यात.             न्याय प्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यातील अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, सेवा विषयक, आस्थापना विषयक बाबी तसेच वैयक्तिक स्वरुपाची तक्रारी निवेदने, अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. ज्या महिलांचे तालुकास्तरीय महिला लोकशाही दिनात तक्रारीचे निरसन झाले नाही, त्याच तक्रारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनी सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, अमरावती यांनी केले आहे.

वडगाव माहोरे येथे आरोग्य शिबिर संपन्न

  वडगाव माहोरे येथे आरोग्य शिबिर संपन्न अमरावती, दि. 16 : विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयामार्फत आयोजित महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत आरोग्य वर्धिनी (वडगाव माहोरे) येथे नुकतेच आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले. आरोग्य तपासणी शिबिरामध्ये बालरोग, मुत्रपिंड संबंधित आजार, किडनी ट्रान्सप्लांट, कर्करोग, हृदयरोग, प्लास्टिक सर्जरी, मेंदूसंबंधीत आजार, मधुमेह, रक्तदाब इत्यादी आजारांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर संशयित रुग्णांना विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय परिसर येथे पुढील उपचारासाठी संदर्भीत करण्यात आले. आरोग्य शिबिराच्या यशस्वीततेसाठी डॉ. मंगेश मेंढे, डॉ. शाम गावंडे, डॉ. दिव्यानी मुंदाने, डॉ. पायल गौपाल यांनी मार्गर्शन केले. शिबिराचे उद्घाटन वडगाव माहोरे सरपंच माला माहोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र सिरसाट यांची विशेष उपस्थिती होती. आरोग्य तपासणी शिबिरात तपासणी करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. हिवसे, डॉ. सपना गुप्ता, समु

कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 20 जून रोजी

  युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 20 जून रोजी 71 रिक्तपदांवर होणार भरती               अमरावती, दि. 16 : अमरावती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी दर महिन्याच्या, तिसऱ्या मंगळवारी ‘पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मोहिमे’चे आयोजन करण्यात येत आहे. त्या अंतर्गत ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 20 जून 2023 रोजी होणार आहे. स्थानिक तसेच अन्य जिल्ह्यातील नामवंत खाजगी कंपन्या, कारखाने आणि उद्योग समूहामध्ये काम करण्याची संधी या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.           जिल्हयातील युवक-युवतींना नोकरीच्या संधी मिळवून देण्याच्या उद्देशाने जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगार मेळाव्यामधून नोकरी देण्याचा प्रयत्न जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे करण्यात येतो. त्याचाच पुढील टप्पा म्हणून आता प्रत्येक महिन्याच्या तिस-या मंगळवारी "जागेवरच निवड" (On Spot Selection) मोहीम आयोजित करण्यात येत आहे. त्यात विविध उद्योजकांना आ

वनहक्क दावे कालमर्यादेत निकाली काढा - विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

Image
  विभागीय वनहक्क समिती बैठक सपन्न वनहक्क दावे कालमर्यादेत निकाली काढा -          विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय   दाखल 46 पैकी 39 वनहक्क दावे निकाली   अमरावती, दि. 15 : अनुसूचित जमाती आणि इतर पारंपारिक वनवासी (१३ डिसेंबर २००५ पूर्वी किमान तीन पिढ्यांपासून मुख्यत्वेकरून वनात राहणारा आणि उपजीविकेसाठी वनांवर किंवा वन जमिनीवर अवलंबून असणारे) यांना त्यांच्या पूर्वजांपासून कसत असलेल्या वनातील जमीनीचा वैयक्तिक व सामूहिक वनहक्क अधिकार ‘अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्क मान्य करणे) अधिनियम २००६’नुसार मिळाला आहे. या अनिनियमानुसार स्थापित वनहक्क समितीकडे दाखल झालेले वनहक्क दाव्यांचे अर्ज कालमर्यादेत निकाली काढण्यासाठी संबंधित यंत्रणांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे, असे निर्देश विभागीय वनहक्क समितीचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज येथे दिले.             विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात विभागीय वनहक्क समितीची बैठक श्रीमती पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. प्र. मुख्य वनसंरक्षक जयोती बॅनर्जी, आदिवासी विकास अपर आयुक्त

किसान सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीसाठी शिबिरांना सुरूवात

Image
  शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे.   माहिती तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात अनेकविध सोयी-सुविधा निर्माण झाल्या; पण सर्च इंजिनवर अन्नधान्य   डाऊनलोड होत नसते. शेतकरी बांधव भूमीत रक्तघाम गाळून अन्नधान्याचे उत्पादन करतो. त्यामुळे त्यांच्याप्रती संवेदनशीलता बाळगून योजनांची अंमलबजावणी व्हावी. त्यांची अडवणूक होता कामा नये. तांत्रिक त्रुटी असल्यास तिची पूर्तता करून घेऊन त्यांना लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश प्र. जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी यावेळी दिले. किसान सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीसाठी शिबिरांना सुरूवात अमरावती, दि. 14 : ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत जिल्हा प्रशासनाकडून विविध योजनांच्या   अंमलबजावणीसाठी ठिकठिकाणी शिबिरे, मेळावे घेण्यात येत आहेत. याच उपक्रमात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या शिबिरांनाही आजपासून सुरूवात झाली. पात्र असूनही प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ न मिळालेल्या व्यक्तींना तो मिळवून देण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी शिबिरे घ्यावीत, असे निर्देश प्र. जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी दिले होते. त्यानुसार योजनेत प्रलंबित अर्जांची संख्या जास्त असलेल्या गावांमध्ये