Monday, June 26, 2023

प्राणी क्लेश प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा - निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके

 



प्राणी क्लेश प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा

-         निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके

-         

अमरावती, दि. 26 : जास्तीत जास्त गोवंशाना टॅग करुन जनावरांसाठी सुरक्षितता निर्माण करण्यात यावी. गोवंशाच्या रक्षणासाठी पोलीस प्रशासन व पशुसंवर्धन विभागाने समन्वयाने काम करावे. प्राणी क्लेश प्रतिबंध कायद्याची जिल्ह्यात काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके यांनी आज दिल्या. जिल्हास्तरीय प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची त्रैमासिक बैठक निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसुल भवनात आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.

जिल्हा पशु संवर्धन उपायुक्त डॉ. संजय कावरे, महापालिकेचे पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन बोंद्रे, जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) तपन कोल्हे, पोलीस आयुक्त कार्यालयाचे प्रतिनिधी अनिल कुरळकर, पंचायत समिती सहायक आयुक्त डॉ. राजीव खेरडे तसेच अशासकीय सदस्य, प्रादेशिक परिवहन अधिकारी सिध्दार्थ ठोके, जिल्हा परिषदेचे डॉ. पुरुषोत्तम सोळंके आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

येत्या गुरुवारी बकरी ईद सण येत असून जिल्हा पशु संवर्धन विभागाने मनुष्यबळाचे नियोजन करुन जिल्ह्यातील अधिकृत पशुवधगृहामध्ये जनावरांची तपासणी करावी. जनावरे विक्रीबाबतची माहिती पोलीस प्रशासनाने घेऊन त्यावर तात्काळ कार्यवाही करावी. प्राणीक्लेश प्रतिबंध कायद्यानुसार अधिकाधिक कारवाया करण्यात याव्यात. याबाबत जनजागृती करण्यासाठी शहरी तसेच ग्रामीण भागातील स्थानिक नागरिकांचा सहभाग घ्यावा, असे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम 1995 तसेच प्राण्यांना क्रुरतेने वागविणास प्रतिबंध अधिनियम 1960 च्या तरतूदीनुसार संपूर्ण गोवंश हत्याबंदी कायदा लागू झालेला आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा गोवंश जसे गाय, वळू, बैल या प्राण्यांची कत्तल करण्यास संपूर्ण मनाई करण्यात आली आहे. या कायद्याचे पालन करण्यासाठी सदर समितीच्या सदस्यांमध्ये चर्चा करण्यात आली. अमरावती महानगरपालिका पशु संवर्धन विभाग यांनी पशु पालकांना नियमांची माहिती दिली. तसेच सभेमध्ये अशासकीय सदस्यांनी जनावरांना टॅगिंग करण्याबाबत कार्यवाही करण्याची मागणी केली. त्यावर उपायुक्त पशु संवर्धन डॉ. संजय कावरे यांनी महानगरपालिका क्षेत्रामध्ये जिल्हा पशु वैद्यकीय सर्व चिकित्सालय, अमरावती येथे पशुंना टॅगिंग करण्यात येत असल्याचे सांगितले. यासाठी संबंधित पशु पालकांनी स्वत:चे आधार कार्ड तसेच जनावर त्यांच्या मालकीचे असल्याचा पुरावा देणे आवश्यक आहे. बकरी ईदच्या अनुषंगाने शहरात जनावरांच्या तपासणीसाठी बॉर्डर सिलींग ठिकाण व कत्तलखान्यावर तपासणीकरिता पशुधन विकास अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पशुधन विकास अधिकारी यांची नावे व संपर्क क्रमांक

वलगाव पोलीस ठाण्यांतर्गत रेवसा नाका येथे बॉर्डर सिलींग ठिकाण निर्माण करण्यात आले असून पशुधन विकास अधिकारी डॉ. सागर ठोसर (9049071500), नांदगाव पेठ पोलीस ठाण्यांतर्गत नांदगाव पेठ टोलनाका येथे बॉर्डर सिलींग ठिकाण निर्माण करण्यात आले असून पशुधन विकास अधिकारी डॉ. देवराव हटकर (8208505740), खोलापुरी गेट पोलीस ठाण्यांतर्गत भातकुली नाका येथे बॉर्डर सिलींग ठिकाण निर्माण करण्यात आले असन पशुधन विकास अधिकारी डॉ. अरुण इंगळे (9850868524), गाडगे नगर पोलीस ठाण्यांतर्गत कठोरा जकात नाका येथे बॉर्डर सिलींग ठिकाण निर्माण करण्यात आले असून पशुधन विकास अधिकारी डॉ. स्वप्निल माळनकर (7709248583), फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यांतर्गत एस.आर.पी. कॅम्प वडाळी नाका येथे बॉर्डर सिलींग ठिकाण निर्माण करण्यात आले असून पशुधन विकास अधिकारी डॉ. अनिल मोहोड (9890469676), बडनेरा पोलीस ठाण्यांतर्गत बडनेरा जुनी वस्ती, रेल्वे फाटकाजवळ येथे बॉर्डर सिलींग ठिकाण निर्माण करण्यात आले असून पशुधन विकास अधिकारी डॉ. अनिल किटुकले (7678760112), राजापेठ पोलीस ठाण्यांतर्गत भानखेडा तलाव परिसर येथे बॉर्डर सिलींग ठिकाण निर्माण करण्यात आले असून पशुधन विकास अधिकारी  डॉ. सचिन राऊत (8600579809), फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यांतर्गत मार्डी रोड येथे बॉर्डर सिलींग ठिकाण निर्माण करण्यात आले असून पशुधन विकास अधिकारी डॉ. उदयकांत तायडे (8275307561) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

प्राणी संरक्षण कायद्याचे पालन करुन सर्वांनी शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन श्री. घोडके यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...