Monday, June 26, 2023

प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये आतापर्यंत 103 उमेदवारांना रोजगार प्राप्त

 

प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये आतापर्यंत 103 उमेदवारांना रोजगार प्राप्त

            अमरावती, दि. 26 : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करिअर सेंटर, अमरावती मार्फत सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतींसाठी स्थानिक स्तरावर नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा (प्लेसमेंट ड्राईव्ह) प्रत्येक महिन्यात तिसऱ्या मंगळवारी आयोजित करण्यात येतो. प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये आतापर्यंत 103 उमेदवारांना रोजगाराची संधी प्राप्त झाली आहे.

प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये जिल्ह्यातील स्थानिक नामांकित उद्योजक कंपन्या सहभागी होऊन त्यांच्याकडील रिक्तपदे अधिसूचित करतात. उद्योजकाव्दारे सदर पत्रे www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर अधिसूचित झाल्यानंतर पात्र उमेदवारांना या पदांना ऑनलाईन पध्दतीने अप्लाय करता येते. रिक्त पदांची माहिती सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना मिळावी, यासाठी नोकरी इच्छुक उमेदवारांचा व्हॉट्सॲप ग्रुप, फेसबुक, टेलिग्राम, गुगल फॉर्मसाठी क्यूआर कोड तयार करण्यात आला आहे. या क्यूआर कोडच्या माध्यमातून महास्वयंम पोर्टलवर उमेदवाराने नोंदणी केल्यानंतर विविध कंपन्यांनी प्रसिध्द केलेल्या जाहिराती पाहून पदांना सहज अप्लाय करून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.

जिल्ह्यातील स्थानिक उद्योजक कंपन्यांचा सहभाग या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये प्राधान्याने होत असल्याने बेरोजगार युवक व युवतींसाठी स्थानिक स्तरावर नोकरी मिळविण्यासाठी प्लेसमेंट ड्राईव्ह महत्त्वपूर्ण ठरत आहे. पहिल्या प्लेसमेंट ड्राईव्हपासून आजपर्यंत 103 उमेदवारांना नोकरी प्राप्त झाली आहे. प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये अमरावतीमधील उमेदवारांशिवाय वर्धा, अकोला, यवतमाळ, वाशीम येथूनही उमेदवार मुलाखतीसाठी येत आहेत. थेट मुलाखतीव्दारे जागेवरच निवड होत असल्याने बेरोजगारांमध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा (प्लेसमेंट ड्राईव्ह) विषयी जागरूकता निर्माण झाली आहे. बेरोजगार उमेदवारांकडून रोजगार मिळाल्याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

            माहे फेब्रुवारी 2023 पासून आतापर्यंत एकुण 5 प्लेसमेंट ड्राईव्ह संपन्न झाले आहेत. त्याव्दारे आतापर्यंत 381 उमेदवारांची प्राथमिक निवड होऊन त्यापैकी 103 उमेदवारांची अंतिम निवड झाली आहे. याचाच भाग म्हणून नुकतेच जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे प्लेसमेंट ड्राईव्ह घेण्यात आला होता. त्यामध्ये एकुण 3 उद्योजकांनी सहभाग घेऊन 71 रिक्त पदे अधिसूचित केली होती. मुलाखतीसाठी एकुण 128 उमेदवार प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये सहभागी झाले असून 101 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. त्यापैकी 46 उमेदवारांची अंतिम निवड झाली आहे.

            या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये उद्घाटन समारंभ व अन्य कार्यक्रम न घेता थेट मुलाखतींना प्राधान्य देण्यात येते. प्लेसमेंट ड्राईव्हसाठी एकंदरीतच उमेदवारांचा उस्फूर्त सहभाग मिळत आहे. तसेच उमेदवार व उद्योजकांकडून या उपक्रमाबाबत सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे.

***

No comments:

Post a Comment

विशेष लेख - गडांचा राजा : राजगड

  गडांचा राजा : राजगड   सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छ...