जिल्हा लोकशाही दिनात 10 तक्रारी प्राप्त

 

जिल्हा लोकशाही दिनात 10 तक्रारी प्राप्त

 अमरावती, दि. 6 : जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा लोकशाही दिन नुकताच आयोजित करण्यात आला होता. जिल्हाधिकारी  विजय भाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या जिल्हा लोकशाही दिनात चालु महिन्यात प्राप्त तक्रारी, मागील महिन्यातील प्रलंबित प्रकरणे तसेच वेळेवर प्राप्त तक्रारींवर सुनावणी घेण्यात आली. भूमि अभिलेख उपअधीक्षक यांचे कार्यालयाशी संबंधित अर्जदार नितनवार भीमराव सीताराम यांच्या स्वीकृत तक्रारींवर सुनावणी घेण्यात आली असून नव्याने प्राप्त दहा तक्रारी स्विकारण्यात आल्या.

 

          जिल्हा लोकशाही दिनात प्राप्त निवेदनांवर संबंधित कार्यालय प्रमुखांनी तातडीने कार्यवाही करून अर्जदाराने समाधान करण्याबाबत जिल्हाधिकारी श्री. भाकरे यांनी निर्देश दिले. अमरावती शहर पोलीस आयुक्त, अधीक्षक अभियंता उर्ध्व वर्धा सिंचन मंडळ अमरावती, उपअधीक्षक भूमि अभिलेख, पोलीस उपअधीक्षक अमरावती ग्रामीण, कृषी उपसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा परिषद लघुलेखक, सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक, शहर पोलीस आयुक्तालय सहायक पोलीस आयुक्त प्रशासन आदी विभाग प्रमुख उपस्थित होते.

 

          जिल्हा लोकशाही दिनासाठी जिल्हास्तरावरील सर्व अधिकारी तसेच आंतर विभागीय अधिकारी यांनी उपस्थित राहावे जेणेकरुन सर्व शासकीय विभागांमध्ये समन्वय साधणे सोयीचे होईल, अशी सूचनाही श्री. भाकरे यांनी यावेळी केली.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती