विभागीय संदर्भ सेवा रूग्णालयात जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन








विभागीय संदर्भ सेवा रूग्णालयात जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन

          अमरावती, दि. 1 : आजच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे उद्भवाणारे आजार तसेच  संसर्गजन्य, असंसर्गजन्य रोगांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी विभागीय संदर्भ सेवा रूग्णालयात जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वैद्यकीय अधीक्षक  डॉ. अमोल नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली चालविलेल्या उपक्रमांचा लाभ रूग्णालयात उपचारासाठी येणारे रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी घेतला. जागतिक उच्च रक्तदाब पंधरवडा 17 ते 31 मे या कालावधीत  तसेच 31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून विविध जनजागृतीपर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. 

          या उपक्रमामध्ये उपचारासाठी येणारे रूग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांना मार्गदर्शन तसेच समुपदेशन पथनाटय, शपथ इत्यादी माध्यमातून जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमासाठी रूग्णालयातील विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश मेंढे, वैद्यकीय तज्ज्ञ, निवासी वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी अधिपरिसेविका, कर्मचारी वर्ग तसेच सरस्वती नर्सिंग स्कूलचे प्रशिक्षक व विद्यार्थीं यांचे सहकार्य लाभले. एन. सी. डी. वैद्यकीय अधिकारी डॉ. सपना गुप्ता, समुपदेशक दिनेश हिवराळे, अधिपारीचारिका प्रतिभा सोळंके, पुनर्वसन कर्मचारी रेश्मा गोरले, प्रयोगशाळा तज्ज्ञ प्रियंका वानखडे यांनी सहकार्य केले. 

0000

 


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती