Monday, June 26, 2023

विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात जागतिक योग दिन संपन्न

 

विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात जागतिक योग दिन संपन्न

           अमरावती, दि. 26 : विभागीय संदर्भ सेवा रूग्णालय येथे जागतिक योग दिवस नुकताच साजरा करण्यात आला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे तसेच विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

          रुग्णालयामध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये योगक्रियेविषयी जनजागृती व्हावी यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती आजीवन अध्ययन व विस्तार विभाग योग शिक्षका प्रा. राधिका खडके यांनी मार्गदर्शनातून योग अभ्यासाचे महत्त्व सांगितले.

         निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिता हिवसे, डॉ. माधवी कासदेकर, डॉ. श्याम गावंडे, डॉ. सपना गुप्ता, डॉ. गावंडे, डॉ. पटवे, प्रतिक्षा सोळंके आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन समुपदेशक दिनेश हिवराळे यांनी केले.

***

No comments:

Post a Comment

DIO NEWS 25-01-2026

  मंत्री दादाजी भुसे यांचा जिल्हा दौरा *प्रजासत्ताक दिनी करणार ध्वजारोहण अमरावती,   दि. 25 (जिमाका) : शालेय शिक्षण मंत्री दा...